Skip to content

नवरा-बायकोमधील परिपक्व नात्याची काही लक्षणे!!

नवरा-बायकोमधील परिपक्व नात्याची काही लक्षणे!!


टीम आपलं मानसशास्त्र


पती-पत्नीमध्ये ज्यावेळी परिपक्व नाते असते, त्यावेळी त्या दोघांचेही भविष्य फार उज्वल स्वरूपाचे असते. ती दोघेही ज्यावेळी भविष्याकडे पाहतात आणि दोघांच्याही एकत्रित आयुष्याचा विचार करतात, त्यावेळी नक्कीच दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलते आणि दोघांनाही जाणीव होते कि आपण योग्य जोडीदारासोबत आहोत.

सुरुवातीच्या काही लहान-सहान घडलेल्या घटनेनंतर जेव्हा शेवटी दोघांनाही एकमेकांच्या परिपकव नात्याची जाणीव होते तेथून पुढे शक्यता मोठ-मोठी भांडणे यशस्वीरीत्या टाळली जातात किंवा सोडवली जातात. हेच कोणत्याही परिपक्व नात्याचे एक मोठे लक्षण आहे.

आपल्या नात्यामध्ये परिपक्वता आलेली आहे कि नाही, हे काही वेळेस प्रत्यक्षपणे दोघांनाही कळत नाही. परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे कि, ती आलेली परिपक्वता कळो अथवा न कळो तरी नात्यांमधली मधुरता दोघेही अनुभवत असतात.

तर काही जोडप्यांच्या नात्यांमध्ये अजूनही ती पारिपक्वता आलेली नसते. असमजूतदारपणा, सतत वाद, चिडचिडेपणा, गृहीत धरण्याची वृत्ती, संशय इ. गोष्टी जेव्हा दोघांपैकी एकाच्या किंवा दोघांच्याही बाजूने दिसायला आणि वाढायला लागतात, त्याठिकाणी परिपक्वता नाही, असे समजावे.

हि परिपक्वता आणण्यासाठी काही टिप्स पाहूया..

१) एकमेकांना आवडता, हे मान्य करणे.

तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे अप्रत्यक्षपणे का होईना ज्यावेळी तुम्ही मान्य करता तेव्हा तुमच्या नात्यांमधल्या परिपक्वतेची ती एक सुरुवात होते. अर्थात सुरुवातीच्या दिवसात घरच्यांनी ठरवलेल्या लग्न प्रकारात एकमेकांमध्ये प्रेम आहे कि नाही हे लवकर सांगणे कठीण आहे. कारण आपल्यासाठी आपला जोडीदार योग्य आहे कि नाही हे ठरविण्याचा तो एक रोमांचक काळ असतो.

पण काही प्रसंगात मात्र ती वेळ येते, ज्यामध्ये दोघांनी शांतपणे बसून नात्यासंबंधीचा ठोस निर्णय घ्यायचा असतो. दोघांमध्ये परिपक्व नाते निर्माण होण्याची ती एक सुरुवात असते.

सुरुवातीलाच समंजसपणा नसेल आणि मानत कुठेतरी शंका असतील आणि त्या बोलून दाखवता येत नसतील तर नात्याबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक ठरते. पुढे जायचे कि याच टप्प्यावर विचारमंथन करायचे हे ठरवावे लागते.

२) एकमेकांची मते माहिती असणे.

दोघांनाही कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे दोघांच्याही लक्षात यायला हवे. त्यापुढे जाऊन एखादी गोष्ट तुम्हाला आवडते परंतु जोडीदाराला आवडत नाही आणि एखादी गोष्ट जोडीदाराला आवडते पण तुम्हाला आवडत नाही, याबद्दल एकमेकांना माहिती असावी. या गोष्टी माहिती असणे याचाच अर्थ परिपक्वतेच्या तुम्ही जवळ आहात.

कारण कुठे थांबायचे याबद्दल तुम्हाला माहिती असते. तिथून पुढे संसाराचा विचार सुरु होतो. अर्थात या सगळ्या वाटचालीत आणि नंतरही आयुष्यभराच्या साथीमध्ये परस्परांवरील विश्वास अतिशय महत्वाचा असतो. विश्वासातूनच नात्याचे बंध घट्ट होत जातात.

३) आर्थिक अडचणींचा वाटा उचलणे.

दोघांनीही एकत्रित संसाराच्या यशस्वी वाटचालीसाठी आर्थिकरित्या एकमेकांचा विश्वास संपादन करणे जरुरीचे आहे. कित्येक स्त्रिया आर्थिकतेबद्दल सक्षमता येण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दिसतात. अशावेळी घरातल्या बहुतेक जबाबदाऱ्या या पुरुषांनी उचलल्या तर स्त्रियांना समाधान करिअर करताना हेळसांड होत नाही.

याबद्दल दोघांनीही एकमेकांना साहाय्य केल्यास किंवा आर्थिकतेबद्दल विश्वास संपादन केल्यास परिपक्वता टिकून राहण्यास मदत होते.

४) संवादात प्रगल्भता असावी.

दोघांच्याही संवादामध्ये तोचतोचपणा असू नये. तुमच्या गप्पांमध्ये सुद्धा काहीतरी नाविन्यता किंवा प्रगल्भ अशा गोष्टी यायला हव्यात. सतत तीच भांडणे आणि एकमेकांना कमी लेखणे यांमधून  दोघांमधले नाते कमजोर बनत जाते. एकमेकांच्या मुद्यावर असहमती जरी असेल तरी एकमेकांचा आदर ठेऊन योग्य संवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोघांचीही नाराजी उरत नाही.

५) नात्यांच्या भविष्याबद्दल चिंता करू नका.

आपल्या नात्याचे पुढे कसे होईल. जर आपण एकमेकांना सांभाळू शकलो नाही तर मग काय करायचे. असे नकारार्थी विचार भवितव्य बिघडवत असतात. तसेच असलेली परिपक्वता सुद्धा नष्ट करतात. त्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यांबद्दल चिंता करत बसण्यापेक्षा आहे ती सद्यस्थिती स्वीकारून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न व्हायला हवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “नवरा-बायकोमधील परिपक्व नात्याची काही लक्षणे!!”

  1. नमस्कार,
    मी सद्ध्या एक कमी टेंशन असणारी नोकरी पाहत आहे, सद्ध्या फायनान्स आय टी कंपनी मध्ये आहे पण तिथे खूप जास्त प्रेशर आहे तसेच रात्रपाळी ही आहे त्यामुळे मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही त्रास होत आहे…
    मला शैक्षणिक क्षेत्रात देखील अनुभव आहे पण सद्ध्या तिथे नोकरी मिळत नाही आणि
    मिळालीच तर पगार वेळेवर होत नाहीये ..
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!