इतरांसाठी जरूर झटा, पण आधी स्वतःवर प्रेम करा!
मिनल वरपे
खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी असे अनेक व्यक्तिमत्त्व आपण पाहिले आहेत. कोणाचंही यश बघितलं किंवा जिद्दीने प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा स्वभाव पाहिला की आपल्याला खरचं खूप नवल वाटते.
पण असे व्यक्तिमत्त्व पाहताना आपण फक्त त्यांचं वरवर दिसणार कर्तुत्व पाहतो पण मुळात असे व्यक्तिमत्त्व कस निर्माण होत असेल याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते.
आपण कायम कोण काय बोलेल याचा विचार करून माघार घेतो. लोकांच्या भीतीने कोणतीही गोष्ट करताना ती दडपणात करून त्यामधे अपयश मिळवतो. सतत इतरांचा विचार करून स्वतःवरील विश्वास कमजोर करतो.
आणि मग शेवटी आयुष्याला कंटाळून नैराश्य, भीती यासारख्या समस्यांना आमंत्रण देतो. आयुष्याकडे आशावादी दृष्टीकोनाने बघण्याची आपल्यातील इच्छाच मरते.
कोणतीही गोष्ट मनात आली की ती पूर्ण करायचीच असा स्वभाव त्यांचाच असतो जे इतरांवर प्रेम करतातच पण सर्वात आधी ते स्वतःवर प्रेम करतात.
जेव्हा आपण स्वतःच्या इच्छा, स्वतःची आवड आणि स्वतःकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षा यांना सर्वाधिक महत्व देतो तेव्हाच ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात निर्माण होते. आणि जिथे जिद्द असेल तिकडे आपल्याला हवं असलेलं मिळवणं अवघड जात नाही.
आत्तपर्यंत किंवा आजसुद्धा आपल्याला कोणी विचारलं की तुझ कोणावर प्रेम आहे तर आपण एक मोठी लिस्ट सांगतो…मग त्यामधे आई, वडील, भाऊ, बहिण असतील, काही नातेवाईक तर कधी मित्र मैत्रिणी.
पण आपल्या या प्रेमाच्या लिस्ट मधे आपण कधीच स्वतःला सामावून घेत नाहीत. मुळात आपल्याला आपण आधी स्वतःवर प्रेम करावं हेच कळत नाही.
एक अगदी सहज म्हणायचं झालं तर, जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. एखादी अशक्य गोष्ट असेल तरी ती सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण करतोच. आणि बहुतेकदा आपण ते करतोच ज्या गोष्टी आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याला आवडत असतात.
जर दुसऱ्यांवर प्रेम करून त्यांच्यासाठी हवं ते करण्याची आपली तयारी असेल तर आपण जर स्वतःवर प्रेम केलं तर नक्कीच आपण स्वतःला जे हवं ते मिळवण्याच्या प्रयत्न करणारच….फक्त आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे.
जर आपल्याला काही मिळवायचं आहे, जगावेगळं असो नाहीतर नसो पण काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे तर पहिले स्वतःवर प्रेम करा. जर आपण स्वतःवर प्रेम करू तर आपल्यातील आत्मविश्वास वाढेल. आशावादी दृष्टीकोनाने आपण पूर्ण जगाला बघू.



Copy pest option on thewa na