ज्या व्यक्ती तुम्हांला कमी लेखतात, त्यांना असं हॅण्डल करा!

तुम्हांला कमी लेखणाऱ्यांना असं हँडल करा!!


मिनल वरपे


“अरे तू हे काय करतोस… तुला जमेल का???”

अरे तू जे करतोस ते मी कधीच करून बघितलं पण नाही होत मला तर अजिबात जमलं नाही आणि ते सहज कोणाला जमत नाही.. बघ हा वेळ, पैसा आणि ऊर्जा सगळं वाया जाईल तुझ…

नक्कीच हे वाक्य आपण आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर.. नविन काही करत असताना.. भविष्याचे निर्णय घेताना म्हणजेच कधी नोकरी साठी तर कधी शिक्षणासाठी, आपलं करिअर असो वा संसार कधी ना कधी हे असे नकारात्मक विचार पसरविणारे माणसं आपल्या आजूबाजूला असतातच.. त्यांचा हेतू त्यांनाच माहीत असणार पण त्याचे परिणाम मात्र आपल्यावर होतात.

जगात अस काही आहेका जे कधीच कोणालाच जमलं नाही??? जमतेच… जेव्हा आपण सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट करायला सुरुवात करू..

कोणतीही व्यक्ती जन्मत: सर्व गुण घेऊन आलेली नसते जस जशी आपली शारीरिक वाढ होते तसाच आपल्यात बौद्धिक विकास सुद्धा होत असतो. आपल्या क्षमता, आपल्यातील कला आणि आपल्याकडे असणारा विश्वास हा इतरांपेक्षा आपल्याला स्वतःला जास्त चांगला माहीत असतो.

पण तरीसुद्धा आपण नव्याने काही करायचं ठरवलं तर नकारात्मक विचार करणाऱ्यांचा आपण आधी विचार करतो आणि मग स्वतःवरच शंका घेतो. काहीवेळेस निर्णय बदलतो तर काहीवेळेस भीतीमुळे माघार घेतो. पण हे कितपत योग्य आहे???

छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्याकडे जास्त सैन्य नसताना कुठेच न डगमगता आणि कोणत्याच नकारार्थी विचारांना थारा न देता त्यांनी गड किल्ले जिंकले कारण त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा परिस्थितीला शरण न येता असलेल्या परिस्थितीला मात देत दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून यश मिळवून पूर्ण जगाला प्रेरणा दिली.

पण आपण मात्र कोणी थोड जरी नकारार्थी बोललं की लगेच गडबडतो… जर कोणी बोललं की तुला नाही जमणार किंवा ही गोष्ट करणं अशक्य आहे तर अशावेळी आपण त्या नकारार्थी विचारांना बाजूला सारून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायचं.

आपल्यातील विश्वास आपल्याला कायम प्रेरणा देईल.. कोणाच्या बोलण्याने आपले निर्णय अजिबात बदलायचे नाहीत. जास्तीत जास्त काय होणार अपयश मिळणार पण त्यातून शिकवण घेऊन पुढच्या प्रयत्नात आपल्याला नक्कीच यश मिळणार.

कोणाच्या सांगण्यावरून विचार बदलायचे नाहीत तर आपण घेतलेलं काम पूर्ण करून स्वतःला सिद्ध करायचं.. चुकीच्या विचारांना महत्त्व देऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

आपणच ठरवायचं की नकारार्थी विचार करणाऱ्यांना महत्त्व देऊन आलेली संधी गमवायची की आपल्या ध्येयाकडे सकारात्मकतेने बघून ते पूर्ण करून स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करायचं.Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

One Reply to “ज्या व्यक्ती तुम्हांला कमी लेखतात, त्यांना असं हॅण्डल करा!”

  1. मॅनेज कसे करायचे ते नाही सांगितले?

Leave a Reply

Your email address will not be published.