विवाहबाह्य संबंध केवळ क्षणिक सुख देतात.


मिनल वरपे


अंतर वाढते… ते कधी जेव्हा समज गैरसमज करून आपण निर्णय घेतो. त्याच लग्न झाल, एकत्र कुटुंब आणि लग्नात आलेल्या पाहुण्यांची वस्ती त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता आला नाही.

त्यानंतर पाहुणे हळूहळू गेले पण मनात एकमेकांची वाढलेल्या ओढीने एकमेकांना वेळ नाही दिल्याने गैरसमज निर्माण केले.

Advertisement

या घरी कायम असच असणार, सतत सगळे आजूबाजुला, बघावं तेव्हा सर्वांच्या गप्पा यामुळे तिला खूप वैताग आलेला कारण ती लहान कुटुंबात वाढलेली होती.म्हणून एकत्र कुटुंब काय असते हे फक्त ऐकून होती आणि प्रेमात सगळं स्वीकारण्याची हिम्मत दाखवणारे आपण वस्तुस्थितीला सामोरे जाताना मात्र माघार घेतो.

घरात जे काही वातावरण आहे त्याबददल उगाच मनात नकोते गैरसमज करून तिने इताराविषयी स्वतःच मत बनवलं.आणि ती तशीच वागत होती पण याचा त्रास मात्र त्याला झाला.

लग्नाआधी एकमेकांकडून अपेक्षा केल्या तस काहीच घडत नाही असा विचार करून दोघं सुद्धा एकमेकांना समजून घ्यायचं टाळत गेले आणि यामुळे मात्र दोघांमधील अंतर वाढलं. एकमेकांविषयी असलेली ओढ कमी झाले, सतत राग रुसवा, लहान सहान गोष्टींवरून भांडण हे सतत घडत होत.

Advertisement

हे एक साधं सरळ उदाहरण आहे ज्यामधे फक्त इतकंच सांगायचं आहे की अस जर होत राहील तर नवरा असो नाहीतर बायको … त्यांचं मन भरकटत जाते. आणि अशा या भरकटलेल्या आणि गैरसमज करून स्वतःला कमजोर केलेल्या मनाला कोणी नविन व्यक्ती किंवा जुने मित्र मैत्रीण भेटले की त्यांचा मार्ग चुकतो.

आपल्या संसारात जे काही घडतेय त्यामुळे आपण बाहेर संबंध करतो. पण हे योग्य असते का???

बाह्यसबंध हे क्षणिक सुख देत असले तरी समाधान मात्र कधीच देणार नाहीत. मनात कायम भीती आणि दडपण घेऊन बाह्यसंबंध ठेवण्यापेक्षा आपल्या जोडीदाराला समजून ते नात चांगलं करण्याचा प्रयत्न का केला जात नाही???

Advertisement

जे घडतेय ज्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत आहेत त्याचा दोघांनी विचार करून एकमेकांना समजून, एकमेकांचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सतत एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय याकडे लक्ष देऊन आपली चूक आपण सुधारली तर उत्तमच.

काहीही झालं म्हणजेच मनात जर कोणतेही चुकीचे विचार आले की गैरसमज झाले तर ते एकमेकांशी बोलून दूर करण्याचा प्रयत्न केला तर एकमेकांवरील विश्वास वाढत जातो.

Advertisement

आपल्या जोडीदाराला जे आवडत नाही ते खरचं चुकीचं आहेका याची आपण तपासणी केली पाहिजे आणि जर चुकीचं आहे तर ते वागणं बदललं पाहिजे.आणि आपण जे वागतोय विचार करतोय ते जर योग्य असतील तरी जोडीदाराला आवडत नसतील तर त्यामागचा उद्देश काय आणि त्याची कारण पटवून देण्याच काम आपण करायला हवं.

दोघांमधले कोणत्याही गोष्टी चांगल्या अगर वाईट इतरांना सांगून आपण नात्यात कटुता निर्माण करत असतो.जे झालं ते स्वतःपुरते मर्यादित ठेवले आणि त्यावर मार्ग काढला तर एकमेकांविषयी मत बनवायची गरज पडणार नाही.

आपल्या घरात मोठी माणसं असतात जर अगदीच गरज पडली तर त्यांच्याशी बोलून मन मोकळं करायचं.कारण त्यांना आलेल्या अनुभवातून ते नक्कीच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील.

Advertisement

संशय येईल अस वागायलाच नको. आपल्या वागण्यातून जोडीदाराला संशय वाटत असेल तर आपलं वागणं नक्कीच चुकीचं आहे. मित्र मैत्रिणी नक्कीच गरजेचे आहेत पण त्यांच्याशी किती बोलावं आणि काय बोलावं याची मर्यादा आपण ओळखून वागल पाहिजे.

जरी आपण बाहेर असलो तरी आपल्या वागण्यामुळे जोडीदाराची फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.आपल्या जोडीदाराला कोणी कितीही काही सांगितल तरी त्याचा विश्वास कुठेच डगमगनार नाही अशी आपली वर्तणूक असेल तरच आपल नात घट्ट होते.

एकमेकांना दोष न देता, एकमेकांच्या चुका माफ करत समजून घेत,एकमेकांच्या गरजा, आवडीनिवडी लक्षात घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तम संवाद ठेवला तर बाह्यसबंध ठेवण्याची गरज कोणालाच पडणार नाही.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Advertisement

6 Replies to “विवाहबाह्य संबंध केवळ क्षणिक सुख देतात, पण समाधान देत नाही.

  1. खुपच चांगली माहिती दिली. धन्यवाद

  2. खूप मस्त, उपयुक्त माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.