माझ्या मनातली भिती खरंच निघून जाईल का?
टीम आपलं मानसशास्त्र
ज्या दिवसापासून मी तो प्रसंग पाहिला आहे, अगदी तसंच माझ्या बद्दल झालं तर काय ? आणि पुढे मग माझ्या बायका-मुलांचं कसं होणार ? याचा विचार करूनच अंगाचा थरकाप उडतो.
दिड वर्षाआधी एका जिवंत बाईला मी जळताना पाहिलं. मी तर नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसच्या दिशेने प्रवास करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे निघालो होतो. समोरून पाचव्या मजल्यावरून एका आगीने जळणाऱ्या बाईकडे माझं लक्ष गेलं.
मी जोरात ओरडणार तेवढ्यात तिने पाचव्या मजल्यावरून उडी मारली आणि संपली. मी इथे तर अगदी ३० ते ४० फुटावर तिचं प्रेत. मी अक्षरशः गळून पडलो होतो. चक्कर येऊन. तीन तासानंतर शुद्धीवर आलो.
पण त्या बाईच्या जळक्या आकृतीने मन अक्षरशः पोखरून काढलं. त्या दिवसानंतर मला जवळपास २ महिने शांत झोप लागली नसावी. त्या जळलेल्या बाईच्या चेहऱ्यांमध्ये कधी माझ्या आज्जीचे, आईचे आणि बायकोचे चेहरे येऊ लागले.
तेव्हा माझ्या हृदयाची धडधड अतिशय वेगाने वाढत असे. अंग थरथरत होतं. नको तितका घाम फुटत होता. पुष्कळ वेळेस इतरांना कळू नये म्हणून मी तो लपवत गेलो. ते लपविण्याचे परिणाम आज मी भोगत आहे.
आज तीव्रता कमी जरी झाली असली तरी त्या प्रसंगाने माझं सामाजिक किंबहुना व्यक्तिगत जीवन फार संकुचित करून सोडलं होतं. पण याला कारणीभूत तो प्रसंग मुळीच नव्हता.
कारण तो प्रसंग पाहणारा मी एकटाच तिकडे नव्हतो. इतरही अनेक लोक ते पाहत होते. त्या सर्वांना सुद्धा माझ्यासारखी समस्या निर्माण झाली असेल, याबद्दल काहीच हमी देता येत नाही.
माझ्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जात नव्हता, त्या नंतर येणाऱ्या अतिविचारांनी मला खूप त्रास दिला आणि मी सुद्धा त्या एका कोषामध्ये स्वतःला कोंडून ठेवलं. त्यामुळे त्या अनुभवाबद्दल मनामध्ये नकारात्मकता पसरत गेली आणि त्या बाईमध्ये मला माझी बायको दिसू लागली.
पसरलेल्या या नकारार्थी भावभावनांचं सामान्यीकरण होत गेलं आणि माझी मानसिक समस्या एका आकार-उकारात साचत गेली. ज्याला मानसशास्त्रीय भाषेत भोबिया असं नाव आहे.
माझ्या निरर्थक आणि विचारांच्या चुकीच्या पद्धतीतून ही समस्या वाढली आहे, वाढत आहे हे कळतंय, पण यासाठी मी काय करायला हवं हेच मला सुचत नाही.
मी यातून बाहेर पडेल का ? कृपया मला मार्गदर्शन करा.
आपल्या आयुष्यात आपल्या आवाक्याबाहेरचे असे अनेक प्रसंग घडत असतात. त्यातले बरेच प्रसंग हे इतरांसाठी सामान्य असतात परंतु आपल्यासाठी ते फार भयंकर असतात.
पुढे चालून हेच प्रसंग आपल्या ठिकाणी मानसिक समस्या निर्माण करण्याची ताकद ठेवतात. पण एकदा जर सवयी बिघडल्या, विचार करण्याची दिशा चुकली आणि अनेक दिवसांपासून या मानसिकतेत आपण दिवस ढकलले तर मानसशास्त्र तज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घेतल्याशिवाय गत्यंतर नसते.
म्हणून योग्य वेळ ओळखून समुपदेशन करून घेणे केव्हाही उपगुक्त असेल. समुपदेशनासाठी आमच्या ‘आपलं मानसशास्त्र’ टीमला संपर्क साधा. खाली एक फॉर्म दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तो वाचून काढा आणि मग भरा.
आमची टीम तात्काळ तुम्हाला संपर्क करेल!!
माझ्या मनातील भीती कशी कमी होईल…