Skip to content

अजुनही मी तरुणच ! लेख वाचल्यावर तुम्हालाही feel येईल !

अजुनही मी तरुणच !


सविता दरेकर
चांदवड,नाशिक


कधी म्हातारे होते मन…!
जेव्हा थकते वैचारीक धन…!
कधी वाटते एकाकी जेव्हा
बोलुन टाकावं मनातलं तेव्हा
आपल्यातल्याच हृदयातल्या तरुण मनाशी …!
का केलय त्या मनाला निराश
ते कधीच होत नसते हताश
आपणच करता त्याला उदास
अपेक्षांच्या ओझ्यांखाली…!
प्रपंच्याच्या ,आर्थिकतेच्या जबाबदारीच्या नावाखाली…

किती ते कष्ट घेतले मुलाबाळासाठी घरादारासाठी…
बघितले नाही स्वतःच्या आरोग्याकडे तेव्हा…
अन् आता कशाला आधार हवा…
मनातल्या कोपऱ्यात असतो उतारवयात ध्यास नवा…
त्याला आता जागवा…
प्रेरणा भरा ,हसा,हसवा…
जगा प्रत्येक दिवस भरभरुन नवा…!
प्रपंच पडलाय मागे,नातवंडे खेळवा अन् लहानही व्हा त्यांच्याबरोबर …
सारे दुःख वेदना
पळुन जातील तेव्हा….

शरीर थकते मन नाही …!
शरीर झिजते मन नाही ….!
ओळखावी स्वतःच्या आतली
कला अन् जागवा तो कलावंत
तरुणाईतला…देईल साहस ,प्रेरणा
तो म्हातारपणाला…म्हणाल मग
अजुनही मी तरुणच…!
अजुनही मी तरुनच…!


पालकांच्या व्हाट्सऍप समूहात सामील व्हा !

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

2 thoughts on “अजुनही मी तरुणच ! लेख वाचल्यावर तुम्हालाही feel येईल !”

  1. खूप छान! खरच,शरीर थकत मन नाही. मनाला ऊर्जा मिळली?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!