नवरा-बायकोने बेडवर या गोष्टी सांभाळायला हव्यात !!
टीम आपलं मानसशास्त्र
नवरा आणि बायकोचं नातं हे सकारात्मक रीतीने पाहिल्यास अनेक प्रकारचे यशस्वी उच्चांक गाठणारं आहे. मग ते करिअर असो, नातेसंबंध असो किंवा संसारातल्या इतर काही मूलभूत गोष्टी असो. दोघेही याबद्दल एकमेकांना समजून घेणारे असतील तर संसारात येणारी मोठी अडचण सुद्धा सोडवण्याची गैरसोय होत नाही.
मानसिकतेसोबतच शारीरिक समाधान हे या नात्यामध्ये गरजेचे मानले जाते. ठठीकाणी असमाधानता येऊन चालत नाही. निदान या विषयावर दोघांनाही एकमेकांशी मोकळ्यामनाने बोलता यायला हवं. कारण यामधली वाढत चाललेली असमाधानकारकता दैनंदिन जीवनातील ताण आणि चिडचिडे स्वभाव उत्पन्न करायला कारणीभूत ठरत असते.
पुष्कळ वेळेस या जगण्याच्या धावपळीत शारीरिक सुख हवं त्यावेळी मिळणे हे महाकठीण होऊन बसले आहे. एखाद्या वेळेस तिला हवेहवेसे वाटत असेल तर तो थकून आलेला असतो, त्याला लवकर झोपून पुन्हा सकाळी लवकर जायचे असते. याउलट त्याला ज्यावेळी अपेक्षा असते तर ती मनमारून तयार होते.
म्हणजेच ती तयार जरी झाली तरी हवं ते समाधान घेता येत नाही. दोघांपैकी जर कोणी नुसतंच वरचेवर तयार होत असेल तर त्याचा परिणाम त्या संबंधावर होतो आणि दोघांच्याही ठिकाणी असमाधानकारकता निर्माण होते.
नवरा-बायको जेव्हा बेडवर त्यांचा वेळ घालवतात त्यावेळी एकमेकांना वेळ तर देणे महत्वाचे आहेच शिवाय बाकीच्या मूलभूत गोष्टी जपणे हे सुद्धा दोघांचेही कर्तव्य आहे. संशोधनाअंती आढळलेली काही मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे.
१) एकमेकांना दिनक्रम सांगावा.
कितीही कंटाळा आलेला असला तरी दोघांचेही हे कर्तव्य आहे कि दिवसभरात आज तुम्हाला कोणत्या गोष्टींचा आनंद झाला, कोणत्या गोष्टी तुमच्या बाबतीत नकारार्थी घडल्या आणि त्यातल्या किती गोष्टी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल एकमेकांना सांगावे.
२) शारीरिक सुखाबद्दल मोकळे व्हा.
तुम्ही दोघे कितीही थकलेले जरी असले तरी तुमच्या अंदाजानुसार आणि अनुभवानुसार आपण एकमेकांना शारीरिक सुखासाठी अमुक अमुक दिवसापासून वेळ दिलेला नाहीये, हे ओळखून निदान या विषयावर एकमेकांशी बोला. कारण संशोधनानुसार प्रत्यक्ष क्रिया जरी करता आलेली नसली तरी ज्यावेळी पती-पत्नी एकमेकांशी या विषयावर बोलतात तेव्हा त्या संबंधित भावना मोकळ्या होतात.
आणि असेही आढळलेले आहे कि, या विषयावर बोलल्यानंतर आधीचा सर्व थकवा शांत होऊन तुम्ही शारीरिक सुखासाठी प्रत्यक्ष क्रिया करायला तत्पर व्हाल.
३) अनावश्यक गोष्टी टाळा.
जेव्हा तुम्ही दोघे पूर्ण दिवसभराचा व्यस्त दिनक्रम पूर्ण करून रात्री एकत्र बेडवर येता, त्यावेळी तेव्हा रात्री एकमेकांना न आवडणारे, अनावश्यक किंवा निरर्थक मुद्दे अजिबात काढू नका. कारण तुमचा मेंदू त्या दररोजच्या रात्रीची वाट पाहत असतो. ती रात्र जर अशीच वाया जाणारी असेल तर मेंदू उलट वागायला आणि प्रतिकार करायला लागतो.
तुमची शारीरिक सुख घेण्याची सुरुवात हि अनावश्यक बडबड न करण्यापासून व्हायला हवी. कारण त्याचा मोठा परिणाम हा तुमच्या संबंधावर होण्याची शक्यता हि दाट असते.
४) बेडवर एकमेकांना समजून घ्या.
दोघांपैकी खरंच जर एकाची अजिबात इच्छा होत नसल्यास तर त्यावेळी एकाने नक्कीच समजून घ्यायला हवं. यामध्ये पुरुषांचा टक्का मोठा आहे. पत्नीची इच्छा होत नसली तरी पुष्कळ नवरे पत्नीला जबरदस्ती तयार होण्यास उद्युक्त करतात. परंतु याठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे तुम्ही जरी पुरेसे समाधान मिळवू शकलात तरी तुमची पत्नीला मात्र ते समाधान मिळतच असेल यात काहीच वास्तवता नाही.
म्हणून या ठिकाणी एकमेकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. तरच दोघेही समाधानी राहू शकता.
५) केवळ संबंधासाठी जवळ येऊ नका.
केवळ शारीरिक सुखासाठी एकमेकांना गृहीत अजिबात धरू नका. यामुळे संबंध आणखीन बिघडत जातील. तसेच तुम्ही पुन्हा एकत्र बेडवर पुन्हा त्याच विश्वासाने येऊ शकणार नाही. तुमच्या दोघांचीही तोंडे एकमेकांच्या विरुद्धच असतील. आणि हि बाब एका समाधानी संसाराला अजिबात शोभणारी नसेल. म्हणून आधी एकमेकांच्या मानसिकतेवर काम करा. तुम्ही शारीरिक रित्या जवळ येतच राहाल.
Good for knowledge
Nice post
१००% बरोबर.