Skip to content

मानसिक आयुष्य ‘बॅलेन्स’ ठेवा, समाधानाची पातळी उंचावेल !!

मानसिक आयुष्य ‘बॅलेन्स’ ठेवा, समाधानाची पातळी उंचावेल !!


टीम आपलं मानसशास्त्र


आयुष्य जगणारी प्रत्येकी व्यक्ती हि समाधानाच्या शोधात असते. कुठूनतरी समाधान मिळेल म्हणून ती सतत धडपडत असते. त्यासाठी ती अथक प्रयत्न आणि संघर्ष सुद्धा करत असते. परंतु आपण सगळ्यांनी समाधानासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आपल्याला सुखावणारी हि समाधानाची पातळी भौतिक जगात कोठेही बाहेर नसून तर ती आपल्या अंतर्मनात दडलेली असते. दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी आपण आपल्या घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत नित्यनेमाने करत असतो.

या सर्व व्यक्तींशी मानसिक व्यवहार करताना काही कौशल्ये जर वापरत नसू तर तेथूनच वैफल्याची निर्मिती होते. जी काही काळानंतर मानसिक समस्येला कारणीभूत ठरते.

यासाठी खाली काही टिप्स देण्यात आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला स्वतःमध्ये रुजवायच्या आहेत. आणि इथून पुढेही त्याचे पालन करायचे आहे.

१) आपली वागणूक हि इतरांशी अगदी तशीच हवी जी अपेक्षा आपण कायम इतरांकडून करीत असतो. प्रसंगानुसार आपल्याला ज्या-ज्या लोकांकडून ज्या-ज्या वागणुकीच्या पद्धतीची अपेक्षा असते, आपणही त्यांना अगदी तशीच वागणूक द्यायला हवी.

२) सतत नवनवीन सहकारी आपल्याला जोडता आले पाहिजेत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत, गंभीर परिस्थिती हाताळण्याचा प्रकार यामध्ये भिन्नता असते. म्हणून सतत नवनवीन लोकांसोबत तुम्हाला स्वतःला अड्जस्ट होता आले पाहिजे. हे करताना जुने मित्र आणि सहकारी सुद्धा सांभाळता आले पाहिजे.

३) मानसीक दृष्टिकोनातून घडलेली एखादी चूक स्वीकारण्याची आणि जबाबदारी घेण्याची धमक ठेवायला हवी. इतरांच्या मनावर छाप पाडण्यासाठी नव्हे तर तुम्ही इतरांचे केलेले वेळेचे नुकसान याबाबत आपण कृतज्ञ असायला हवं. म्हणून सर्वांसमोर चूक कबुल करायला अजिबात कचरू नका.

४) दिवसभरात अनेक किरकोळ का असेना अनेकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत आपल्याला मिळते. त्याबद्दल ‘धन्यवाद’ म्हणायची सवय लावायला हवी. ते म्हणताना सुद्धा आपली देहबोली आणि बोलण्याची पद्धत खूप मॅटर करते. म्हणून त्या गोष्टीही पाळायला हव्यात.

५) ऐकण्याची सवय लावायला हवी. तुम्हाला आयुष्यात किती का अनुभव आलेले असेना परंतु तुम्ही जर केवळ बोलतच राहिलात तर इतरांकडून पटकन वैतागले जाल. म्हणून समोरचा व्यक्ती माझे ऐकून घेतोय, हि भावना फार आदर आणि सन्मान देणारी असते.

६) इतरांच्या मनातला आशावाद कधीही संपवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला सुद्धा याची कदाचित कल्पना नसावी कि त्यांचे आयुष्य त्या आशेवर जिवंत असेल. म्हणून त्या आशेशी संबंधित तुम्ही काही मदत करू शकत असाल तर नक्की करा.

७) आपण रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलण्याची तयारी ठेवते. ज्याचा मानसिक त्रास हा त्यावेळी जरी आपल्याला होत नसला तरी नंतर मात्र नक्की होतो. म्हणून रंगाच्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कोणतेही पाऊल उचलू नका.

८) कोणत्याही वायफळ गप्पांमध्ये आपला वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया घालवू नका. तसेच तुम्ही तुमच्या ध्येयानुसार काही गोष्टी ठरवत जरी असाल तरी इतरांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याची आखणी केलेली असते. म्हणून हे असंच असतं, असायला पाहिजे असे सल्ले त्यांना न देणं हे केव्हाही उत्तमच.

९) ‘हे काम मला पूर्णपणे येत नाही, मी प्रयत्न करून पाहतो’ हे बोलायला अजिबात कमीपणा मानू नका. कारण तुम्ही खोटे बोलून आज काम हातात घेता पण कालांतराने ते काम तसेच रखडून पडते. म्हणून याबद्दल स्पष्टपणा असायला हवा.

वरील हे ९ नियम किंवा टिप्स आपल्याला आपल्या आयुष्याचं बॅलेन्स करण्यासाठी मदत करतील. कारण या मूलभूत गोष्टींमध्ये क्षुल्लकता आल्यास पुढचं सर्वकाही अवघड आणि कंटाळवाणे होऊन बसते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मानसिक आयुष्य ‘बॅलेन्स’ ठेवा, समाधानाची पातळी उंचावेल !!”

  1. ज्ञानेश्वर लक्ष्मण उकांडे

    खूप छान माहितीपूर्ण लेख असतात आपल्या साईटवर….

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!