Skip to content

मागे पाहून पुढे जगता येत नाही…

मागे पाहून पुढे जगता येत नाही.


मिनल वरपे


जीवन म्हंटल की वेगवेगळ्या घटना या घडतच असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट.. सतत गोड खाल्ल की आपल्याला तिखट चमचमीत खावस वाटते आणि तिखट लागलं की गोड हवहवस वाटते कारण एकच गोष्ट आपल्याला कायम आवडत नाही वेगवेगळं असेल तर जिभेला चव राहते… अगदी तसच आयुष्य म्हंटल की चांगल्या वाईट आठवणी आल्याचं…

आपण जर वर्तमानात जगत असू तरच आपण जिवंत आहोत असे समजायचं… कारण भूतकाळातील आठवणीत अडकून राहील आणि भविष्याची काळजी करत बसलो की आज जे समोर आहे त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही..

अशी कोणतीच व्यक्ती नाही जिच्या आयुष्यात कायम आनंद असेल… शिक्षणासाठी तगमग, नोकरीसाठी धडपड, लग्न जमत असताना येणारे अडथळे, संसारातील वेगवेगळ्या अडचणी, आजारपण तर कधी कोणाचं मरण… अशा असंख्य अडचणींवर मात करत आपण पुढे जात राहतो.

पण बहुतेक वेळी आपण कमजोर पडतो… येणाऱ्या दुःखाना जरी आपण त्यावेळी सामोरे गेलो तरी त्या आठवणीत मात्र आपण गुरफटून जातो. आज जे चाललंय त्यामधे आपल्याला अजिबात रस नसतो. आपण भूतकाळात अडकून राहतो. आणि आपल्या अशा वागण्यामुळे आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना त्रास मात्र वाढतो.

भूतकाळ, घडलेल्या घटना कितीही कटू असल्या तरी आजचा दिवस मात्र जगायलाच लागतो. आणि आजचा हा दिवस जगायचा असेल तर मागचं सार मागेच ठेवावे लागते.

आपण जिवंत आहोत म्हणजे जगत आहोत असे असेल तर आपल्या जगण्याला अर्थच राहत नाही.आठवणी तर प्रत्येकाकडे असतातच पण त्या आठवणीत न अडकता त्यामधून अनुभव घेऊन पुढे जायचा प्रयत्न करायला हवा.

जर आपल्याला पुढे जायचं असेल तर पुढेच बघावं.. चालतं असताना जर आपण मागे पाहून चाललो तर आपल्याला ठेच लागू शकते, आपण धडपडू शकतो म्हणून आपण कायम पुढे बघूनच चालतो. अगदी तसच आयुष्याच्या या वाटेवर सुद्धा मागे पाहून पुढे चालता येत नाही…

जर पुढे जायचं असेल तर मागचं मागे ठेवून नव्याने आयुष्याची सुरुवात करावी. रोजचा दिवस नविन समजून जगलो तरच आपण कायम न डगमगता पुढे जाणार…



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “मागे पाहून पुढे जगता येत नाही…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!