Skip to content

शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना असा वाढवावा !!

शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना असा वाढवावा !!


टीम आपलं मानसशास्त्र


उत्तम स्टॅमिना केवळ खेळाडूंनाच असतो असे नाही. त्या खेळाडूंनी सुद्धा अथक प्रयत्न करून ती ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण केलेली असते. हा स्टॅमिना आपल्याला येणारा पूर्ण दिवसभराचा थकवा नष्ट करतो. आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये असणारी छोटी-मोठी कामे करताना आळस-कंटाळा येत नाही.

स्टॅमिना म्हणजे काय ?

एखादे काम करण्यासाठी एका ठराविक वेळेपर्यंत ज्या ताकद व ऊर्जेची गरज असते त्याला स्टॅमिना असे म्हणतात. नेहमी खेळ व व्यायामासाठी स्टॅमिनाचा उल्लेख केला जातो. पण कोणतेही काम करण्यासाठी लागणारी मानसिक ऊर्जाही स्टॅमिनातच मोजली जाते. दीर्घकाळ सुदृढ राहण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या स्टेमिनाची गरज असते.

२०१७ मधील एका अध्ययनात थकवा जाणवणाऱ्यांच्या शरीरावर व्यायामाचा परिणाम पाहिला गेला. व्यायाम सुरु करणाऱ्या लोकांमध्ये ६ आठवड्यांतच कामाच्या क्षमतेत वाढ आढळून आली. गाढ झोप, हुशारी व निर्णय घेण्याचे कौशल्य सुधारल्याचे आढळले.

तसेच थकवा जाणवू लागल्यावर अनेकजण व्यायाम सोडतात जे योग्य नाही. जर व्यायाम करताना वेदना जाणवत असतील तर हळूहळू शारीरिक क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे.

हा स्टॅमिना वाढवण्याचे काही उपाय :

वॉकने सुरुवात :

नव्याने सुरुवात करणाऱ्यांनी सर्वप्रथम चालायला सुरुवात केली पाहिजे. दहा मिनिटांत सामान्यतः ८००-९०० पावले पूर्ण होतात. जर दिवसातून ३-४ वेळा चालाल तर तीन ते चार हजार पावले सहज पूर्ण कराल. हि स्टॅमिना वाढवण्याची उत्तम सुरुवात असेल.

उड्या मारणे :

उड्या मारताना हृद्य वेगाने धडधडते व रक्ताभिसरण उत्तम होते. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा उत्तम प्रकारे होतो. यामुळे स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. रिकाम्या पोटी १००-१५० वेळा उड्या मारू शकता. सामान्यतः या प्रक्रियेला १-२ मिनिटे लागतात. उड्यांसोबत थोडा वेळ पळाल्यामुळे आपले गुडघे मजबूत होतात.

बर्पीस आणि स्कॉट्सने होतो फायदा :

जम्पिंग करता आल्यानंतर बर्पीस व स्कॉट्सही सामील करा. हे आपण ऍसिस्टेड एक्सरसाईज म्हणून करू शकता. बर्पीसविषयी बोलायचे तर दिवसातून १०-१५ वेळा बर्पीस केल्यामुळे स्टॅमिना वाढतो. बर्पीस एक्सरसाईजमुळे छाती, ट्रायसेप्स, मांड्या, जांघेचे स्नायू कसदार व बळकट होतात.

जिने चढा :

दैनंदिन कामांसाठी जिन्यांचा वापर करा ५-७ वेळा जिने चढा व उतारा. जिना चढताना जरा जास्त श्रम करू इच्छित असाल तर सोबत स्प्लिटसही मारा. यामुळे स्टॅमिना प्रभावीपणे वाढवता येऊ शकतो. स्प्लिट्सने पाठ, मांड्या, गुडघे व पायांचे स्नायू मजबूत होतात.

शरीराची क्षमता वाढवण्यासाठी धावणेही उत्तम असते. धावताना स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रथम १०० पावले धावा, नंतर २०० पावले चाला. यामुळे शरीराला आरामही मिळतो व स्टेमिनाही टिकून राहतो. याशिवाय बेत ट्रेनिंगनेही मदत मिळते.

कार्डिओ एक्सरसाईज आवश्यक :

कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम म्हणजेच बाइकिंग, एरोबिक्स व जॉगिंग इत्यादी मुळे फुप्फुसे सुदृढ राहतात. तसेच हृदयही उत्तमरीत्या काम करते.

योगही फायदेशीर :

योग व ध्यानाने स्टॅमिना व शारीरिक क्षमता खूप प्रमाणात वाढवता येऊ शकते. योग व ध्यानाद्वारे स्नायूंची ताकद वाढते. तीव्र वेदना मुडमधील चढ-उतार व तणाव इ. कमी करण्यासाठी मदत मिळते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!