Skip to content

लग्न झालं म्हणजे नातं घट्ट झालं असं नसतं !!

लग्न झालं म्हणजे नातं घट्ट झालं असं नसतं !!


मिनल वरपे


लग्न झालं म्हणजे आपलं नात घट्ट झालं असे नसते तर या नात्याचा पाया भक्कम करायचा असेल तर सुरवातीपासूनच काही गोष्टीची काळजी घ्यावी.

एकमेकांना पुरेसा वेळ द्या.

नवरा बायकोच नात हे सर्वात वेगळं नात असते. आणि हे नात जर भक्कम असेल तर घरातील सर्वच नाती चांगली राहतात. पण नवरा बायकोचं नात हे चांगलं होत असेल तर ते एकमेकांना वेळ देऊन.

आपण आपल्या कामाच्या गडबडीत इतके अडकून जातो की एकमेकांना पुरेसा वेळ देणं सुद्धा अवघड होऊन जाते. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव ओळखायला जमत नाही आणि पुढे त्याचा परिणाम नात्यावर होतो.म्हणून एकमेकांना वेळ देऊन एकमेकांची चांगली ओळख करून हे नात सुंदर बनवायचं .

समजून घेण्याचा प्रयत्न करा.

आपल्या जोडीदाराचं काहीही म्हणणं असेल तर ते ऐकून त्याबद्दल योग्य विचार करून समजून घ्यायचं.समजून घेण्याचा आपला स्वभाव नसेल तर सतत मतभेद होत राहणार. आपल्याला जोडीदाराची प्रत्येक गोष्ट पटेलच अस जरी नसलं तरी जास्तीत जास्त आपल्या जोडीदाराचं मत,त्याच्या इच्छा, त्याच वागणं समजून घेतलं की पुढे कोणत्या गोष्टी अवघड जाणार नाहीत.

अपेक्षा करणे टाळा.

अपेक्षा आल्या की कोणतंही नात्यात कुठेना कुठे वाईटपणा येतोच.याचा अर्थ असा नाही की आपण अपेक्षा करणेच बंद करावे. आपण ज्या अपेक्षा करतोय त्या आपल्या जोडीदाराला कळत आहेत का..त्याच्यापर्यंत त्या अपेक्षा पोहचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

कारण काहीवेळेस आपण काही न बोलता अपेक्षा पूर्ण होण्याची वाट बघतो आणि अशावेळी आपण नाराज होतो.म्हणून आपल्या सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा करणे शिवाय अपेक्षा करण्याचं जास्तीत जास्त टाळता आले तर उत्तमच.

एकमेकांवर मत लादण्याचा प्रयत्न करू नका.

आपलं मत आपल्या जोडीदारावर लादण्याचा जर आपला स्वभाव असेल तर नक्कीच त्यामधे बदल करावा. कारण नवरा बायको जस माझं तुझ अस काही नसते तसच काहीही ठरवताना एकट्याने ठरवणे हे सुद्धा तेवढच अयोग्य. संसाराची ही दोन चाकं जर सुरळीत रहावीत असे वाटत असेल तर एकमेकांवर मत लादण्यापेक्षा एकमेकांना गृहीत न धरता प्रत्येक गोष्टीत एकमेकांची मते जाणून पुढे जायचं.

वैयक्तिक स्वातंत्र्य द्या.

वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याची, निर्णय घेण्याची तसेच जे आवडीच क्षेत्र आहे त्यामधे करिअर ते निवडण्याची मोकळीकता. कारण एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाला स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे पण नवरा बायको या नात्यात मात्र बहुतेक बंधन ठेवली जातात पण अशी बंधन न ठेवता आपल्या जोडीदाराला मोकळं जगू द्या.

विश्वास

माझ्यावर विश्वास ठेव असा अट्टाहास करून विश्वास मिळत नाही तर विश्वास हा निर्माण होतो.आणि जर एकमेकांवर तसेच आपल्या नात्यावर विश्वास असेल तरच नात कायमच टिकते. विश्वास का कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असते.

शांत रहा

एकमेकांशी मतभेद हे तर कधी ना कधी होणारच.आणि नवरा बायको मधे तू तू मैं मैं होत असतेच पण अशावेळी शब्दाला शब्द न लावता शांत राहिलेलं केव्हाही उत्तम.कारण आपण रागात असलो की आपण काय बोलतो याच भान आपल्याला राहत नाही आणि क्षणिक रागात आपण कायमच मनाला लागेल अस वागतो.

म्हणून असा त्रास आपल्याला तसेच आपल्या जोडीदाराला तसेच कुटुंबाला देण्यापेक्षा शांत राहाव.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!