बिघडलेला ‘मूड’ असा फ्रेश ठेवा !!
टीम आपलं मानसशास्त्र
अनेकवेळा लहान-सहान गोष्टीसुद्धा आपला मूड खराब करण्याचे कारण ठरत असतात. त्यामुळेच आपण चांगल्या काळात आनंद घेऊ शकत नाही. अशा वेळेस स्वतःला चांगल्या मूड मध्ये ठेवण्यासाठी या दिलेल्या टिप्सचा फायदा होऊ शकतो.
आनंदी लोकांशी संवाद साधा.
कोणत्याही कारणाने तुमचा मूड खराब झाला असेल अशावेळी कोना अशा व्यक्तीशी संवाद साधण्याने तुम्हाला चांगले वाटत असेल जी सकारात्मक विचार करत असेल, बोलत असेल, तिची वागणूक सकारात्मक असेल किंवा ती आनंदी राहत असेल त्या व्यक्तीसोबत जास्तीत वेळ घालवावा.
हि व्यक्ती तुमचा कोणी मित्र किंवा घरातील एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते. संशोधन सांगतात कि, कोणाला भेटून समोरा-समोर बोलण्याने शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स रिलीज होते, जे तुमचा मूड अधिक आनंदी करण्यासाठी मदत करते.
आपल्या जवळच्या लोकांशी संभाषण करण्याचा दीर्घकालीन आरोग्य लाभ होऊ शकतो. त्यामुळेही तुमचा तणाव कमी होऊ शकतो.
स्वतःला हास्याची भेट द्या.
मूड चांगला नसेल तर निश्चितच तुम्हाला हसणे अत्यंत कठीण काम होऊन बसते. पण तुम्ही जर सर्व गोष्टींना दूर सारून हसत आरशासमोर उभे राहिलात तर ते एका टॉनिकप्रमाणे तुमच्यासाठी काम करेल. आरशासमोर जाऊन स्वतःला पहा आणि स्वतःसाठी हसा.
संगीत ऐका किंवा गा.
जर मूड खराब असेल तर संगीत ऐकने किंवा गाणे हे मूर्खपणाचे वाटत असले तरी संशोधनानुसार संगीत ऐकल्याने किंवा गायल्याने आपल्या मूडमध्ये अनेक सकारात्मक बदल घडतात. संगीतात कोणाचाही मूड बदलण्याची क्षमता असल्याचे मानले जाते.
संशोधनामध्येही त्याला आनंदाशी जोडलेले आहे, विशेषतः कोणत्या खास प्रकारच्या संगीताला! त्यासाठी मूड चांगला होण्यासाठी एक चांगले आरामदायक गाणे ऐका.
असे केल्याने तुमच्या शरीरातील एंडोर्फिन हॉर्मोन रिलीज होईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची कोंडी सोडविल्यानेही मूड चांगला राहतो. यामुळे डोपामाईनचा स्त्राव होतो जो आपल्याला संतुष्टी आणि आनंदाची भावना देतो.
वरील ते ३ टिप्स अत्यंत इफेक्टिव्ह मानले गेले आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा आणखीन इतर गोष्टी आपण करू शकतो. परंतु या केवळ या तीनच केल्यास आपल्या मूड मध्ये सकारात्मकता येण्याची शक्यता हि वृद्धिंगत होण्यास लवकर मदत मिळते.


