टीका सहन करण्यापेक्षा या ७ टिप्स वापरून पहा!

टीका सहन करण्यापेक्षा या ७ टिप्स वापरून पहा!


मिनल वरपे


टीका करणे आणि टीका सहन करणे दोन्ही गोष्टी अयोग्य आहेत. आपण चुकीचं वागलो, एखादा अपराध आपल्याकडून घडला अशावेळी तर आपल्यावर सहज टीका होतेच पण त्याशिवाय आपण कोणतीही नविन गोष्ट केली, वेगळं काही केले किंवा जे कोणाला जमत नाही अस काही चांगलं आपण करून दाखवलं तर अशावेळी सुद्धा आपल्यावर टीका करण्याचं प्रमाण वाढलेले दिसून येते.

आपला जर टीका करण्याचा स्वभाव असेल तर तो आपण बदलू शकतो पण होणाऱ्या टीका थांबवणे आपल्या हातात नसते. बहुतेक लोक टीकांना वैतागून चुकीचे मार्ग निवडतात.

तसेच होणाऱ्या टीका असहाय्य झाल्या की नैराश्य, तणाव, एकटेपणा यासारख्या मानसिक समस्यांमध्ये अडकतात.काही लोक तर न जगण्याचा मार्ग निवडतात.

आपल्यावर जर टीका होत असतील तर अशावेळी काय करावे जेणेकरून आपल्यावर त्या टीकांचा कुठेच वाईट परिणाम होणार नाही तर त्यासाठी काही साध्या सरळ उपयुक्त टिप्स:

१) दुर्लक्ष करणे

दुर्लक्ष करणे यासारखा सोप्पा आणि सरळ उपाय दुसरा कोणताच नाही. कोणी आपल्यावर टीका करत असेल तर अशावेळी त्याकडे आपण जास्त लक्ष दिलं तर आपल्याला त्याचा त्रास हा होणारच. पण होणाऱ्या टीकांकडे तसेच टीका करण्याकडे आपण दुर्लक्ष केले तर आपल्याला काही बोलले तरी काही फरक पडत नाही असा अर्थ त्यांना कळेल आणि आपण काही न बोलता आपोआपच त्यांचं त्यांना उत्तर मिळेल.

२) प्रतिउत्तर देऊ नये.

ते म्हणतात ना चिखलात दगड टाकलं तर आपल्याच अंगावर चिखल उडतो मग अशावेळी शांत राहणे कधीही योग्यच. एखादी व्यक्ती आपल्या बद्दल वाईट बोलत असेल तर त्याला उलट प्रश्न विचारून किंवा प्रतिउत्तर देऊन ती कधीच शांत राहणार नाही.

आपण जर प्रतिउत्तर दिले तर ती व्यक्ती आपल्याला अजून त्रास देईल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्यायची नसेल तर अशावेळी आपण प्रतिउत्तर न देता शांत राहिलेलं अतिउत्तम.

३) आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे.

आपल्यावर टीका केल्या तर आपलं आपल्या कामात लक्ष लागणार नाही आणि आपली अधोगती होईल असा हेतू ठेवून मुद्दाम आपल्या बद्दल वाईट बोलून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न होत असतो.

अशावेळी आपण होणाऱ्या टिकांचा विचार बाजूला ठेवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आपण आपल्या कामाला महत्त्व दिलं तर असल्या नकोत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळसुद्धा मिळणार नाही.

४) सुधारणा करणे.

ज्या गोष्टीबद्दल आपल्यावर टीका होत असेल ती जर खरच चुकीची असेल तर आपण त्यामधे सुधारणा करणे गरजेचे असते.कधीतरी चुकून आपल्या हातून काही चुकी घडते किंवा आपलं वागणं चुकते पण नेमकी तीच गोष्ट टीका करणाऱ्यांच्या नजरेत येते.

म्हणून आपल्याला कोणी वाईट बोलेल, आपल्यावर कोणी बोट दाखवेल अस वागणं सोडून जास्तीत जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा.

५) प्रगती करणे

आपल्या होणाऱ्या प्रगतीमुळे बहुतेक लोकांना त्रास होत असतो. आपलं लक्ष कस भरकटेल याची ते आतुरतेने वाट बघत असतात आणि त्याच साठी आपण चांगलं वागत असताना सुद्धा ते आपल्याबद्दल नकोत्या वाईट गोष्टी इतरांना सांगतात.पण तिकडे दुर्लक्ष करून आपण आपली जास्तीत जास्त प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यावं.

६) टीका मनावर घेऊ नयेत.

बहुतेक लोक त्यांच्यावर होणाऱ्या टीकांचा इतका विचार करतात आणि स्वतःला त्रास करून घेतात की त्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. पण कोणी आपल्याबद्दल काहीही बोलुदेत ते किती मनावर घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असते.

कोणी आपल्यावर विश्वास करो अथवा न करो आपला आपल्या स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे. जर आपल्याला आपल वागणं बोलणं माहीत असेल, स्वतःची चांगली ओळख असेल तर इतरांच बोलणं मनावर घ्यायची गरज पडणार नाही.

७) टीकेला प्रेरणा बनवा.

टिकेकडे नकारार्थी स्वरूपात पाहण्यापेक्षा सकारात्मकतेने पाहून त्याचे प्रेरणेंत रूपांतर करा. जितकी जखम देणारी टीका असेल किंवा टीकेची तीव्रता ही जितकी मोठी असेल तितकी ती आयुष्यात पुढे सरकण्याची प्रेरणा बनू शकते.Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.