आयुष्यात काही व्यक्तींना फार ‘Lightly’ घ्या!!
टीम आपलं मानसशास्त्र
आयुष्याला गंभीर रूप देऊन जगायचं नसतं, हे जरी सर्वमान्य असलं तरी सुद्धा पुष्कळ व्यक्तींना प्रॅक्टिकली हि थेअरी हाताळायला खूप जड जाते. बोलणं सोपं आहे पण करणं कठीण हे स्वीकारून ते परिस्थितीच्या आणखीन खोलवर जातात.
पण आजच्या या लेखाचा मूळ मुद्दा हा आहे कि ‘Lightly’ म्हणजे नेमकं काय करायचं ?? हे समजून घेण्यासाठी काही केस स्टडी आपण घेऊया म्हणजे शेवटी ‘Lightly’ या शब्दाची प्रचिती येण्यास मदत मिळेल.
किरण आपल्या बोस ला खूप घाबरते. त्यांचे शिस्तीचे कडक नियम अक्षरशः तिच्या डोक्यात जातात. कामावरून घरी जरी आली तरी तिच्या बॉस चा चेहरा काही तिचा पिच्छा नाही सोडत. अत्यंत हातचलाखीने करणाऱ्या कामांमध्ये किरण आजकाल क्षुल्लक चुका करायला लागलीये. तिचा आत्मविश्वास खूप डाऊन झालेला दिसतोय. बोलताना शब्दांचे तारतम्य नसतं.
सोप्पी कामे तिच्यासाठी खूप अवघड बनत चालली आहेत. जुन्या कामात पगार कमी होता ते बरं होतं. या कामात काय मजाच नाही. म्हणून तिच्याकडून पुष्कळ वेळा कामावर पोहोचण्याचा उशीर व्हायचा.
कृणाल हा पहिल्यांदाच एका मुलीला प्रपोस करणार होता. त्यासाठी त्याने त्याच्या मित्रांची खूप मदत घेतली होती. म्हणूनच कि काय त्या मुलीने कृणालला स्पष्ट नकार दिला असावा. जो मुलगा मित्रांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही, तो पुढे मला कसा सांभाळणार, हे तिचे शेवटचे शब्द कृणालच्या मनाला लागून गेले.
परिणामी फाइनल वर्षाला तो नापास झालाच. परंतु त्या मित्रांची संगतही त्याने कायमची सोडली. आज तो ते शहरही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. आई-वडिलांच्या समाधानासाठी मिळेल ती नोकरी करण्याचा बेत त्याने आखलाय.
माधुरी आणि सासूबाईचे अनेक कारणांवरून कायम खटके उडत असत. तिचा एक वर्षांपूर्वीचा प्रेम विवाह झाला आहे. सासूबाईचा स्वभाव याआधीही तिला माहित होता. प्रेमाखातीर सर्व जुळवून घेण्याची तयारी तिने स्वतः दर्शवली होती.
आपण कल्पना केलेली स्थिती आणि वास्तव स्थिती याची जाणीव माधुरीला झाली होती. माधुरीचे पती माधुरीला खूप समजून घेत असे. तू करिअरकडे लक्ष दे, मुलाखती दे हवा तसा वेळ ते माधुरीला देत असे. त्या दिवशी सासूसोबत मोठे भांडण झाले, त्याचा राग तिने पतीवर काढला. नको ते नको ते बोलून गेली.
त्यामुळे परिस्थिती आणखीन माधुरीच्या बाजूने बिकट झाली. आज दीड महिने झाले माधुरी तिच्या माहेरी आहे. सासरचे तिला अजिबात बोलावून घेत नाहीत आणि नवरा सुद्धा.
वरील या ३ प्रसंगांची व्यवस्थित केस स्टडी केल्यास काही वेळेस काही व्यकींसाठी ‘Lightly’ जगणं किती आवश्यक असतं हे चांगलंच तुम्हाला जाणवेल.
विशिष्ट व्यक्तींविषयी किंवा एखाद्या प्रसंगांविषयी मनात जेव्हा कडकपणा येतो आणि तो खूप वेळ टिकतो तेव्हा तो खूप काही नष्ट करून जातो. त्यावेळी रबर थोडा सैल ठेवण्यातच शहाणपण आहे.
आणि हा शरणागती पत्करण्याचा कोणताही मार्ग नसून तुमचं व्यक्तिगत, सोशल, प्रोफेशनल आणि सायकॉलॉजिकल आयुष्याला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून अवलंबविलेला एक सय्यमीपणा आहे.
म्हणूनच, आयुष्यात काही व्यक्तींना फार ‘Lightly’ घ्या!!


