Skip to content

सतत चिंता केल्याने समस्या संपणार नाहीत !!

सतत चिंता केल्याने समस्या संपणार नाहीत !!


टीम आपलं मानसशास्त्र


एखाद्या प्रसंगाविषयी मनात दाटून येणारी चिंता आणि त्यातून समस्या निर्माण करण्यासंबंधी येणारे विचार आणि त्यातून उत्पन्न होणारी कृती यांचा समतोल साधला जाणे आवश्यक आहे. केवळ चिंता निर्माण होऊन विचारांवरच थांबावे लागत असेल तर त्या चिंतेला काहीही अर्थ नाही.

म्हणजेच कृतीतून ती चिंता व्यक्त व्हायला हवी. म्हणून केवळ चिंता केल्याने समस्या तर अजिबात सुटत नाहीत उलट त्या वाढतात. एक कथा वाचूया..

एक तरुण राजस्थानच्या एका शहरात राहत होता. आणि एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. जीवनाला कंटाळलेला होता. त्याच्या आयुष्यात त्याने आनंदी हि भावना फार काळ अनुभवलेली नव्हती. तो सारखा आपल्या समस्येविषयी विचार करत बसायचा.

एकदा शहरात खूप लांबून एक महात्मा आले. खूप लोक त्यांच्याजवळ आपली समस्या घेऊन जात असे. तो तरुण सुद्धा तेथे गेला. तो तरुण त्या महात्म्याला म्हणाला, ‘बाबा मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे. प्रत्येक वेळी मला समस्येने जखडलेले असते. कधी ऑफिसचं टेन्शन, कधी कटकट, तर कधी आरोग्याची समस्या…

एक असा उपाय सांगा कि माझ्या सर्व समस्या संपतील, मी सुखाने जगू शकेल.’

बाबा हसून म्हणाले, ‘तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्या देईल, त्या आधी तू माझं एक काम करशील का ?’ तो म्हणाला, ‘नक्की करेल’,

‘आपल्याकडे १०० उंट आहेत, त्यांची काळजी घेणारा आज आजारी पडलाय, म्हणून मला असं वाटतं कि, आजची रात्र त्यांची काळजी तू घ्यावीस. फक्त एक अट अशी आहे कि, तेव्हाच झोपायचं जेव्हा सर्व उंट बसलेले असतील.’

दुसऱ्या दिवशी बाबाने त्याला विचारलं, ‘चांगली झोप लागली का तुला ?’ तो, ‘नाही बाबा, एक क्षणही झोपू शकलो नाही, कोणता ना कोणता उंट उभाच होत होता.’

‘मला माहित होतं हे असंच घडणार तुझ्याबाबतीत. आजपर्यंत असं झालं नसेल कि हे सर्व उंट एकाचवेळी बसलेले असतील. त्यावर तो तरुण नाराजीच्या स्वरात म्हणाला, ‘मग तुम्ही मला हे काम का करायला सांगितले.’

बाबा म्हणाले, ‘काळ रात्री तुला अनुभव आला असेल कि कितीही प्रयत्न केले तरी सर्व उंट सोबत बसू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आयुष्यातील सर्व समस्या सुद्धा कधी संपत नाहीत. विचार कर काळ रात्री काय झालं. काही उंट रात्र झाल्यावर स्वतःचं बसले, काहींना तू बसवण्याचा प्रयत्न केला असशील. काही आधी बसले आणि काही नंतर स्वतःच बसले.

समस्या सुद्धा अशाच असतात. काही आपण प्रयत्न करून संपवत असतो, तर काही खूप प्रयत्न करूनही संपत नसतात. अशा सर्व प्रकारच्या समस्यांना काळावर किंवा वेळेवर सोडून द्यायला शिकलं पाहिजे.

त्या समस्येची एक्स्पायरी डेट जवळ आली कि स्वतःच संपेल. याउलट त्याचा अतिविचार करून करून आपणच त्याची एक्स्पायरी डेट वाढवून ठेवतो. जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत श्वास सुरु आहे, तोपर्यंत आयुष्यात समस्या येत राहणार आणि जात राहणार. फक्त चिंता करून त्यांना थांबवून ठेवायचं नाही.

ज्या व्यक्ती चिंता विनाकारण थांबवून ठेवतात, त्यांना पुढे सरकता येणार नाही. म्हणजेच त्यांना जर उंट सांभाळायला दिला तर ते कधीच शांत आणि समाधानी झोपू शकणार नाही.’



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!