आयुष्यभराचा जोडीदार निवडणं इतकं सोपं असतं का?
मिनल वरपे
इतकं सहज असते का एखाद्या व्यक्तीला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवड करणे???
लव मॅरेज असो की अरेंज मॅरेज आपण एखाद्याला वरवर बघून त्याच्यातल्या गुणांची पारख न करता जास्त वेळ न घालवता जोडीदार म्हणून स्वीकारतो.
आपल्याला आपल्या करिअर बद्दल किती काळजी आणि दक्षता असते.मला पुढे कोणत्या क्षेत्रात जायचं आहे आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे आणि त्या क्षेत्रात जाण्याचा आपला निर्णय योग्य आहे की नाय याची चाचपणी करण्यासाठी आपण किती धडपड करतो.आणि सगळी माहिती मिळाल्यानंतर त्यामधे प्रवेश करतो.
आपण आपल्या करिअरला इतकं महत्त्व देतो कारण आपलं भविष्य त्यावर अवलंबून असते.आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य योग्य रित्या पार पाडण्यासाठी आपण आधीच योग्य क्षेत्र निवडून त्यामध्ये आपलं करिअर करतो.
जर करिअर आपल्या भविष्यासाठी इतका महत्त्वाचा भाग असेल तर लग्न नाही का???
ओळख झाली, मैत्री झाली आणि मग आमचं प्रेम झाल.. त्यानंतर आम्ही लग्नाच्या गाठीत अडकलो पण पुढे काय???
योग्य निवड असेल तर नक्कीच आयुष्य सुखकर होते.पण योग्य ती निवड केली नाही तर मात्र सतत एकमेकांना कायम दोष देणे, वाद, ताण-तणाव यामुळे सतत स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास होतो.
१) ती व्यक्ती जशी आपल्यासोबत प्रेमळ वागते खरचं ती इतरांशी सुद्धा तशीच प्रेमळ वागते का याच निरीक्षण करणे.कारण सुरवातीला नविन नातं असल की कोणीही प्रेमळ वागून मन जिंकण्याचा प्रयत्न करते.
२) ती व्यक्ती घराच्या जबाबदाऱ्या मनापासून स्वीकारते की नाही, कर्तव्यदक्ष आहे की नाही याची ओळख करून घेणे.
३) ती व्यक्ती नोकरी करत असेल किंवा व्यवसाय पण त्याठिकाणी त्या व्यक्तीची असलेली वर्तणूक आणि भविष्यासाठी केलेलं नियोजन याची आपण माहिती घ्यावी.
४) नाती जपणे हे सर्वांनाच जमत नाही. पण जी व्यक्ती आई वडिलांचा तसेच मोठ्या माणसांचा आदर करते त्यांना मान देते ती व्यक्ती एक उत्तम माणूस म्हणून समजण्यात येते. म्हणून ज्यामधे आपण आपला जोडीदार समजतो ती व्यक्ती त्याच्या आई वडिलांचा तसेच इतर नात्यांचा किती आदर करते याची ओळख आपल्याला असावी.
क्षणिक सुखात अडकून आयुष्यभराचे निर्णय घेणे कायम चुकीचे असते. प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसावं. एकमेकांच्या गुणांची पारख करून त्यानंतर खरचं ही व्यक्ती माझ्या आयुष्यभराची जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याची ओळख करावी.
एखादी व्यक्ती मित्र म्हणून जरी योग्य वाटत असेल तरी तीच व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेलच असे नाही.. म्हणून घाईगडबडीत, भावनेच्या भरात, कोणाच्या सांगण्यावरून आणि क्षणिक सुखात अडकून लग्नं या आयुष्याच्या मोठ्या निर्णयात चूक करू नका…..


