एकदा तरी भांडावं
नात्याला रिफ्रेश करण्यासाठी म्हणून,
नात्यातील ओलावा तसाच टिकून राहावा म्हणून,
जवळच्या माणसांनी ‘आपला त्यांच्यावर हक्क आहे’ हे विसरू नये म्हणून,
काही दिवस न बोलल्याने बोलायला एकदम नवीन विषय मिळावेत म्हणून,
मैत्रीत प्रेमाने भांडणं Must आहे म्हणून,
भावा-बहिणीशी भांडणं तर प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून,
बायको सोबत भांडणानंतर पुढचे चार दिवस तरी सूचना,प्रश्नांच्या भडीमाराला खंड पडतो म्हणून,
आईसोबत दिवसभरात एकदाही वादावादी झाली नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं म्हणून,
मी घरात असतानाही ‘घरात इतकी शांतता कशी?’ असा प्रश्न कोणालाही पडू नये म्हणून,
तिरकस बोलण्याचे कौशल्य दिवसागणिक वाढत राहावे म्हणून,
सततच्या चांगुलपणाचा लेबल आपल्यावर लागू नये म्हणून,
जवळच्या माणसांबद्दल मनात अढी ठेवण्यापेक्षा हक्काने भांडून, जाब विचारून मन मोकळं करावं,
गोड गोड वागून नात्याला कुणाची तरी नजर लागेल म्हणून भांडावं,
‘दुराव्याने प्रेम वाढतं’ या वाक्याला न्याय देण्यासाठी म्हणून का होईना प्रत्येकाने एकदा तरी भांडावं……
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
Mast