Skip to content

नको त्या अपेक्षा ठेवल्या की सगळं बिघडतंय !!

दृष्टीकोन…


नम्रता कुलंगी


एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन हा त्या व्यक्तीच्या वर्तणूकीपेक्षा जास्त महत्वाचा असू शकतो, असं का नाही वाटत आपल्याला..??.. प्रत्येक व्यक्ती ही ज्याच्या-त्याच्या स्वभावानुसारच वागत असते, आपल्याशी “असं” वेगळं आणि त्याच्याशी “तसं” वेगळं हा असा “इतका” फरक नसतोच मग तरीही आपण स्वत:ची खोटी समजूत का करून घेतो..??..

हा बाबा.!!.. ती व्यक्ती “माझ्याशी” तसं वागते… ती व्यक्ती फक्त आणि फक्त “माझ्याशीच” तसं वागत असेल… “माझ्याशीच” असं बोलत असेल.. हा असा इतका मोठा गैरसमज कशासाठी?

(हो.!.मान्य आहे मला की काही लोकांसोबत वेगळं बोलणं होत असतं पण ‘हे’ ती समोरची व्यक्ती स्वत:हून दाखवून देते तेव्हांच… नाहीतर आपण ठरवण्यात काय अर्थए.?.)

आणि एखाद्या दिवशी आपल्याला कळतं की, अरे..!!..
ती व्यक्ती तर सगळ्यांशीच तसं वागते, सगळ्यांशीच असं बोलते, त्या व्यक्तीचा स्वभावच तो आहे…

तेव्हा आपण आपल्या “दृष्टीकोनाला” किंवा झालेल्या “समजाला” काहीच नाही बोलत उलट तेंव्हाही तोंडातून निघणारं भलं-बुरं हे त्या समोरच्या व्यक्तीसाठीच असतं.. नाही का?

“बोलण्याची सुरवात नको तितकी तारिफ करून आणि शेवट अनपेक्षित कटूतेनं करण्याची रित तर नाहीय ना”..??.. प्रत्येक गोष्टीत चांगले-वाईट असे दोन्ही गुण असतात, मग तरीही आपण त्या गोष्टीला एकाच बाजूने का पारखतो?

“त्या व्यक्तीनं असं वागायला हवं होतं, तसं वागून त्यानं खूप मोठी चूक केली, निदान त्याच्याकडून तरी तशा वागण्याची अपेक्षा नव्हती”…
अरे… हो.. हो..!!.. थांबलं पाहिजे आपण कुठेतरी…

किती त्या अपेक्षा? कसली ती उठाठेव?
आपण आपल्या आयुष्यातला बहुमुल्य वेळ हा दुस-याच्या वागण्यातील उणिवा काढण्यातच घालवतो, असं का बरं नाही वाटत आपल्याला?

एखाद्या व्यक्तीचा त्याच्या वागण्यावरून न्याय करण्याचा आणि त्याच्याकडून नसत्या अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आपल्याला दिलाच कुणी?

असो…..

एका सुंदर फुलाच्या झाडाखालून जाताना फुलांचा सडा अंगावर पडला या गोष्टीवर खूश होणं योग्य आहे, की तो सडा माझ्याच अंगावर का पडला याचा विचार करण्यात अर्थ आहे हे आपलं आपणच ठरवावं.
दोन्ही गोष्टींमधील एका समजामुळं अख्खी परीस्थिती बदलू शकते, इतकी साधी गोष्ट तर नक्कीच लक्षात येते आपल्या… हो की नाही?

एकंदरीत काय तर दृष्टीकोन महत्वाचा… मग तो कोणत्याही गोष्टीबद्दल असेल आणि तो जर सकारात्मक असेल तर गोष्टी बिघडण्याची भीतीच कशाला.. नाही का..??..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!