Skip to content

या ८ टिप्स व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मदत करतील!

या ८ टिप्स व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मदत करतील!


मिनल वरपे


प्रत्येक व्यक्तीला स्वतःच व्यक्तिमत्त्व हे उत्तम असावं असच वाटते, काही साधे आणि सोप्पे नियम पाळले किंवा आपल्या आचरणात आणले तर नक्कीच आपलं एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडेल.पण आपण अशा बहुतेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून काळजी, चिंता करत बसतो.

एखादी व्यक्ती चांगला परफॉर्मन्स देत असेल तर आपल्याला कौतुक वाटते तर कधी त्या व्यक्तीचा द्वेष कारण ती आपल्यापुढे जात असते. पण आपण सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो हे आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही. जर आपल्याला व्यक्तिमत्त्व विकास करायचा असेल तर खालील टिप्स नक्कीच वाचा आणि आचरणात आणा.

१) पूर्ण झोप.

ज्यावेळी झोप पूर्ण होते त्यावेळी आपल्याला एकदम उत्साही वाटते.पण जर झोप पूर्ण झाली नसेल तर आपल्याला पूर्ण दिवस आळस येत राहतो. कामात लक्ष लागत नाही.कमीत कमी ६ आणि जास्तीत जास्त ८ तासाची झोप असेल तर मन आणि शरीर ताजेतवाने राहते. गरज नसताना टीव्ही बघून, मोबाईल मधे वेळ घालवत जागरण करणे टाळावे. झोप पूर्ण असेल तर नवनविन गोष्टी अगदी आवडीने करतो.

२) कामाचे व्यवस्थापन.

आपलं काम नेहमीच ठरलेलं असते पण कधी अचानक कामाचा प्रेशर वाढतो आणि अशावेळी ते काम कस करावं, काम वेळेत पूर्ण होईल की नाही अशा चिंतेमुळे काम करायचं प्रयत्न जरी केला तरी लक्ष लागत नाही .मग अशावेळी कोणतीही चिंता न करता आपल्याकडून जेवढं होईल तेवढं काम पूर्ण करण्यासाठी सुरवात करायची.एकदा आपण सुरवात केली की ते काम कधी आणि कस पूर्ण होईल हे आपलं आपल्याला कळणार सुद्धा नाही.

३) तत्परता.

बहुतेक वेळा आपल्याला कंटाळा आला की आपण आजच काम उद्यावर ढकलून त्या क्षणासाठी मोकळं होतो.पण आपल्या या आळसाचा परिणाम म्हणजे आपली काम वाढत जातात.आजच उद्या, उद्याच परवा अस केलं की एक दिवस सर्वच काम करण्याची पाळी येते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो.म्हणून असा आळस करण्यापेक्षा ज्या त्या वेळेत ती काम तत्परतेने केलेच पाहिजेत.

४) घरचं वातावरण.

आपण ज्या वातावरणात राहू त्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो.जर आपल्या घरातील वातावरण ताण तणावाचं असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो.त्यामुळे घरातलं वातावरण नेहमीच उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा.

५) जबाबदाऱ्या.

घरातील कर्ता जो असतो त्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे ,आणि सर्वच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.नोकरी करताना असलेल्या जबाबदाऱ्या असे प्रत्येक कर्तव्य पार पाडावे लागतात.पण ही कर्तव्य ओझ न समजता जबाबदारी म्हणून स्वीकारली तर नक्कीच आपलं लक्ष भरकटणार नाही.

६) दुर्लक्ष करणे.

आपण आपली काम करताना कायम एकाग्र होऊन आणि जास्तीत जास्त मन लावून केले तर कोण काय बोलतेय याकडे आपलं लक्ष जाणार नाही. म्हणतात ना की केलं तरी लोक नाव ठेवणार आणि नाही केलं तरी लोक नाव ठेवणार.म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार अजिबात मनात न आणता आपली कामे आपण चोख करावीत.

७) वेळापत्रक.

वेळापत्रक हा शब्द म्हंटला तर अस वाटेल हे लहान मुलांचं काम पण तस नसून वेळापत्रक हे लहान असो वा मोठे सर्वांना अगदी गरजेचं असते. आपल्या रोजच्या कामाचं एक पद्धतशीर वेळापत्रक तयार करायचं. त्यामुळे आपण त्या ठरलेल्या वेळेनुसार ठरलेली काम नक्कीच करतो.आपल्या कामांचा आपल्याला विसर पडत नाही.

८) तुलना करणे.

आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत तसेच जे यशस्वी आहेत त्यांच्याशी तुलना करतो आणि स्वतःला कमी लेखतो. पण अशावेळी आपल्यातील चांगले गुण, चांगल्या सवयी ओळखाव्या आणि त्यावर भर देऊन प्रगती करावी तसेच जो यशस्वी आहे त्यांच्यातील चांगले गुण आपण सुद्धा आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!