Skip to content

छातीत धडधडत असल्यास हे घरगुती उपाय करून पहा!

छातीत धडधडत असल्यास हे घरगुती उपाय करून पहा!


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


हृदयाचे ठोके जोरात आणि अनियमितपणे पडू लागले कि आपल्याला छातीत धडधडल्याची जाणीव होते. एरव्ही छातीचे ठोके पडताना आपल्या लक्षात येत नाहीत. परंतु छातीत धडधड होऊ लागली कि, ते जाणवतात. आपल्याला थोडेसे घाबरल्यासारखे वाटते. परंतु हि हृदयाची धडधड नेहमीच गंभीर असते असे नाही.

का धडधडते आणि लक्षणे काय ?

छातीत ठोस मारल्यासारखे होऊ लागते. रोग्याला छातीच्या पुढच्या भागात अस्वस्थ वाटते. नेहमीच्या पेक्षा नदीचा वेग वाढू शकतो.

छातीत धडधडते याचा अर्थ हृदयावरील कामाचा भार वाढतो. काही लोकांना डाव्या कुशीवर झोपले असता छातीत धडधडते. कारण या अवस्थेत हृद्य छातीच्या भीतीजवळ असते.

निराश व्यक्तींना धडधडण्याचा त्रास वरचेवर होतो. हृदयाच्या गंभीर आजारांमध्ये छातीत धडधडणे हे अनेक लक्षणांपैकी एक लक्षण असू शकते. परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये काळजी किंवा चिंता या कारणांमुळे मुख्यतः हा त्रास होतो आणि हृदयाच्या कोणत्याही रोगाशी याचा थेट संबंध नसतो.

पोट फार भरणे, पोटात वाट होणे किंवा पोट साफ नसणे या कारणांनी सुद्धा छातीत धडधडते.सिगारेट किंवा विड्या ओढणाऱ्या व्यक्ती छातीत धडधडण्याची तक्रार करतात.

यावर उपचार काय ?

द्राक्षे :

छातीत धडधडण्याच्या आजारावर द्राक्षे खाणे हा एक चांगला घरगुती उपाय आहे. द्राक्षांचा रस मधून-मधून प्यायल्याने आराम मिळतो.

पेरू :

मन निराश झाल्याने किंवा अशक्तपणामुळे एखाद्या व्यक्तीला छातीत धडधडण्याचा त्रास होतो. अशा वेळी अनशेपोटी एक पिकलेला पेरू रोज खावा. चांगला गुण येतो.

पडवळ :

पडवळाच्या पानांचा रस काढावा आणि दिवसातून ३ वेळा १ ते २ चमचे प्यावा. छातीत धडधड कमी होते.

मध :

रात्री झोपण्यापूर्वी एक पेला पाणी, एक मोठा चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस असे मिश्रण प्यावे. हृदयाच्या तक्रारींसाठी मध हे उत्तम अन्न असून तो सहज पचतो आणि रक्तात एकजीव होऊन जातो.

जटामुन्शी :

हि एक वनस्पती आहे. २ ते ३ ग्राम जटामुन्शीत चिमूटभर कापूर आणि दालचिनी घालावी आणि दिवसातून दोन किंवा तीन वेळा हे मिश्रण खावे किंवा या मिश्रणाचा काढा करून प्यावा. जटामुन्शी या वनस्पतीमुळे हृदयाच्या कार्याला चालना मिळते. छातीतील धडधड कमी होते.

बडीशेप व धने :

कुटलेली बडीशेप, धने आणि गूळ एकत्र करून रोज जेवणानंतर खावे. छातीत धडधड कमी होईपर्यंत हा उपचार करावा.

आहार कसा असावा ?

ज्याला छातीत धडधडण्याचा त्रास होतो, त्या मनुष्याने नैसर्गिक स्वरूपातील साधा आहार घ्यावा. चहा, कॉफी, मद्य, शीतपेय, चॉकलेट, मैद्याचे व साखरेचे पदार्थ, मसालेदार, चमचमीत पदार्थ असे खाणे टाळावे.

तसेच कृत्रिम रंग घातलेले पदार्थ सुद्धा खाऊ नयेत. ताजी फळे, दूध आणि सुका मेवा हे पदार्थ न्याहरीला खावे, तर दुपारच्या जेवणात वाफवलेल्या भाज्या, गव्हाची पोळी, ताक हे पदार्थ खावे. रात्री ताज्या हिरव्या पालेभाज्यांची कोशिंबीर, मोड आलेले मूग, लोणी किंवा एक पेला ताक असा आहार घ्यावा.

इतर उपाय सांगा.

छातीत धडधडण्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करावे. आसनांपैकी शवासन नियमितपणे केल्याने चांगला उपयोग होतो. रोग्याने भरभर चालणे, पोहणे, दोरीवरच्या उद्या मारणे, सायकल चालवणे असे अंगचापल्याचे व्यायाम दररोज करावे.

अनुवाद : कविता भालेराव.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “छातीत धडधडत असल्यास हे घरगुती उपाय करून पहा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!