मनातली अशांतता दूर करण्याचे सोप्पे उपाय !!
टीम आपलं मानसशास्त्र
मनातली अशांतता यावर काम करणे हे फार मोठे आव्हान आहे. सद्याच्या महामारीच्या काळात तर आपल्या अगदी जवळील व्यक्ती सुद्धा अशांततेच्या गर्तेत सापडतीये कि काय, हा धोका उद्भवू लागलाय. किंबहुना आपण स्वतः देखील अशांत असल्यासारखे वाटतोय. असेही अशांत भास होत असतात.
आपले बाहेरील समस्यांवर नियंत्रण नसते. तथापि, अधिकांश शिक्षित लोकांना भविष्यातील जगासाठी बदलांची अपेक्षा असते आणि ते स्वतःला यासाठी तयार करत असतात. पण हे विकासाविषयी, बदलांपर्यंत जास्त मर्यादित आहे आणि महामारीसारख्या विनाश करणाऱ्या बदलांवर नाही.
काही लोकं हि त्यांच्या पलीकडे गेले, तर काही चुकले. जसे हैदराबादचे नृत्य शिक्षक इसमपल्ली (२७) ज्यांची महामारीदरम्यान नोकरी गेली. त्यानंतर तो ड्रग्स विकू लागला. त्याला काही दिवसांपूर्वीच ९१ किलोग्रॅम गांजा ठेवण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
पण कोलकत्याच्या शुभंकर कोले (२५) याचीही महामारीत नोकरी गेली. पण तो वन्यजीव एनजीओशी स्वयंसेवक म्हणून निगडित झाला आणि त्याने स्वतःला कार्यमग्न ठेवले. त्याने काही दिवसांपूर्वी खारी आणि कांडेचोर किंवा काळमांजर यांच्या शिकाऱ्यांच्या गॅंगला पकडण्यात वन अधिकाऱ्यांना मदत केली. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी या वर्षी असे ३०० शिकारी समूह पहिले. तरीही या वाढीसाठी महामारी प्रत्यक्ष दोषी नाही.
पुष्कळ लोकं या महामारीमुळे आलेल्या तणावाला मानवी वागण्यात आलेल्या बदलाचे कारण मनात आहेत. यामुळे मानसिक आरोग्याशी निगडित असंख्य समस्या निर्माण होत आहेत. तसेच काही बाबतीत लोकं शिवशंकर सारखा चुकीचा मार्गही निवडत आहेत.
इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीने महामारीच्या परिणामाला समजण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे केला. त्यामध्ये सुमारे ४०% उत्तर देणाऱ्यांनी चिंता किंवा नैराश्य अशी लक्षणे असल्याचे सांगितले. इतरांनी हलका तणाव असल्याचे सांगितले.
परिणाम म्हणून लोकं निरोगीपणासाठी उत्तर शोधात आहेत. जानेवारी २०२० च्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये वेलनेस ऍप २० लाखांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड झाले. ‘काम’ आणि ‘हेड्सपेस’ सारख्या आंतरराष्ट्रीय ऍपचा ऑनलाईन मेडिटेशनमध्ये दबदबा राहिला. तसेच असे अनेक भारतीय ऍप सुद्धा आहेत, जे लोकांना समाधान देत आहेत.
तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सुमारे ८ राज्यांमध्ये वाढत्या कोविड केसेसची स्थिती पाहता युवकांमध्ये एक नवीन भीती आहे. मानले जात आहे कि, बेरोजगारी, निराशा, नशा आणि हिंसेची जोखीम वाढवत आहे.
आयुष्यात समस्या आल्या तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधणे आवश्यक आहे. महामारीमुळे असंख्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागला, पण काहींनी त्यावरही मात केली. अशीच स्थिती आपली असेल तर त्यावर पुढील टिप्स उपयोगी पडतील.
१) स्वतःची काळजी स्वतः घ्या.
जर असे वाटत असेल कि मेंदूने चांगले काम करावे, तर शरीराची काळजी घ्या. चांगली झोप घ्या, सकस आहार घ्या आणि शरीराचा-मनाचा व्यायाम करा.
२) सामाजिक ताळमेळ कायम ठेवा.
सकारात्मक सामाजिक ताळमेळ यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. एकमेकांच्या संपर्कात राहा. पण नकारात्मक गोष्टींपासून चार हात लांबच राहा.
३) दैनंदिनी निश्चित करा.
सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री लवकर झोपण्यापर्यंत निश्चित दैनंदिनी तयार करा. यामध्ये मनाला चालना देणाऱ्या काही कृती आवश्यक असाव्या.
४) शारीरिक सक्रियता.
शरीरात आळस आणि स्थूलता येऊ देऊ नका. शरीराला वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवून ठेवायला हवं. तसेच अशी कामे किंवा कृती प्रकर्षाने टाळा ज्याठिकाणी शारीरिक ऊर्जा वाया जात असेल.
५) दडलेल्या भावना मोकळ्या करा.
जवळच्या स्नेहींबरोबर मन मोकळ्या गप्पा मारा. तसेच तणाव सहन करण्याची पातळी वाढवा. ध्यान, मेडिटेशन, डायरी लिहिणे आणि योग्य हे तणाव कमी करण्याचे काही आरोग्यसंपन्न मार्ग आहेत.


