Skip to content

मरता तर कधीही येतं, जगता यायला हवं!!

मरता कधीही येतं, जगता यायला हवं!


शिवाजी भोसले | 9689964143


आजच्या घडीला माणूस कधी नव्हे तो इतका ताण तणाव, टेन्शन, निराशा, नैराश्य व अडचणीमध्ये अडकला आहे. यातून त्याला मुक्त होणं खूप कठीण जात आहे. मानवाचं सातत्याने टेन्शन व तणावामुळे मनमुराद हसून जगणे सुद्धा हरवून आणि हिरावून घेतले गेले.

जगण्याची दुर्दम्य आशा आणि आकांशा प्रत्येकाच्या मनात प्रकट होते. पण स्वतः सह कुटुंब आणि समाजासमोरील उभे राहिलेले प्रश्न हे त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे ठरतात.

एकीकडे जगण्याची, जीवनाची स्वप्न व सगळं असं जवळ असताना दुसरीकडे मरणाची आस सुद्धा बघितली जाते. असं मानवी जीवनात का होत असावं? हे ज्याचं त्यालाच माहिती असावं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं… अशी एक म्हण प्रचलित आहे. ही म्हण कदाचित उगाच म्हणून समोर आलेली नसावी. त्यामागे खूप मोठे लॉजिक असावं. ते समजून घेता यायला हवं.

निर्मिकाने प्रत्येक माणसाला जन्म दिलाय तो आनंदाने उत्साहाने व मनमुरादपणे जगण्यासाठी दिलाय. मरणासाठी नव्हेच.. माणूस हेच विसरून गेलाय. मनुष्य जगणं विसरून मरण का स्वीकारतोय? याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचं ठरतं.

निर्मिकाने आपला जन्म दिलाय तरी कशासाठी ? त्यानं आपल्यालाच का जन्माला घातलं असावं ? याचा शोध आणि बोध अद्यापही माणसाला झालेला नाही. तो केव्हा होईल? हेही मानवाला माहिती नसावं.

निर्मिकाने दिलेला जन्म हा उगाच दिला नाही तर त्यामागे खूप काही औचित्य असावं. तो जन्म सकारात्मक जगण्यासाठी व नवनिर्मितीसाठी दिला असावा. मनुष्याच्या हातून चांगलं काहीतरी घडावं अशीच प्रेरणा त्यामागे असावी.

जन्म आणि मृत्यू हे मानवाच्या हातात नसतात, असं पूर्वी म्हटलं जायचं. मात्र आता हे वचन सर्रासपणे खोटं ठरवलं जातं. जन्म आणि मृत्यू हे आता मानवाच्या हातात आहेत आणि मधातलं जीवनसुद्धा मानवी हातातच असतं. हे ही विसरायला नको.

जन्म, जगणं आणि मरण हे पूर्णता आता मानवी हातातच आलेल आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. सिजरियन पद्धत हे जन्माचं तर आत्महत्या हे मृत्यूचं द्योतक म्हणावं लागेल. मानवाला जन्माला घालणं आणि मृत्यूला कवटाळणं हे मानवी अधिपत्याखाली येऊन बसलेय.

जन्माला यायचं तर अनेकांचं ठरवून जन्माला घातलं जातं. हवेत त्या क्षणाला आणि हवे त्या दिवसाला आता अर्भकाला जन्मास आणले जातं. एखाद्याला जन्मास घालायचं तर आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने ते सहज शक्य होत आहे. यासोबत मृत्यूला कवटाळायचं तेही शक्य होतंय.

थोडंस टेंशन नैराश्य, चिंता वाढली की माणूस आत्महत्येला जवळ करतो. एखाद्या लहान संकट आलं की त्या संकटाला घाबरतो. घरगुती भांडण, कौटुंबिक हिंसाचार, तंटा यातून स्वतःचं जीवन संपवतो. खरंच जीवनात आलेली शुल्लक कारण सुद्धा जीवन संपावी एवढी मोठी का ठरतात ?

मनावर झालेला आघात आणि भावनेनं मानवी मनावर केलेला अत्याचार शेवटी आत्महत्येकडेच वळतो. आयुष्य हे सुखदुःखाचा मेळ असतं. दुःख येत.. जात.. सुख येत.. जातं.. सुखदुःखाच्या या शापात आयुष्य जगायचंच राहून जातं. जीवनात आलेल्या संकटाला घाबरायचं नसतं. संकटावर मात करून पुढे चालायचं असतं.

एखाद्या क्षणिक नैराश्य, संकट व चिंतेने आयुष्याला संपवायचं नसतं. आयुष्य संपवन खूप सोपं असतं. पण जगणं तेवढेच कठीण असतं. आयुष्य संपवावं एवढं छोटं नाही तर ते मनमुरादपणे जगावं इतकं मोठं आहे. मरता कधीही येतं जगता यायला हवं.

जीवनात आलेली संकट, समस्या, चिंता ही तात्पुरती असतात. ती जेवढ्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने निघून जातात. आपण त्या संकटात खंबीर असायचं असतं. ‘यह भी दिन निकल जायेगा’ असच स्वतःच्या मनाला म्हणायचं आणि संकटाच्या समोर छातीठोकपणे उभ रहायचं, हेच जीवन असतं.

जगता आलं की जीवनाचा आनंदही लुटता येतो. भावनेच्या भरात वाहवत न जाता एकटक नजरेनं संकटाकडे पाहून त्यावर मात करणं. मनाशी दृढनिश्चय बांधणं आणि जगण्याला सुबद्ध आकार देणे हेच जीवनाचे सार असतं. आपले जग नाही इतरांना प्रेरणा देणारा ठराव असं स्वतःच्या जीवनात काहीतरी साकारायला यायला हवं.

स्वतःचं आयुष्य आणि भविष्य आकारायला स्वतःचा सकारात्मक असणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. जगणं आणि वागणं हे आनंदी होण्यासाठी स्वतःच्या मनाला आणि मेंदूला आपल्या कवेत घ्यावे आणि जिवनाचं सार साकाराव.

स्वतःचं जगणं जगता यावं इतकंच माणसाच्या आयुष्यात असावं. जगाव असं की मागे काहीतरी ठेवून जावं. स्वतःच स्वतःला स्वतःच्या जगण्याचं आत्मबळ द्यावं.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!