Skip to content

काहीवेळेस बालिशपणे वागणे फायद्याचे असते !!

काहीवेळेस बालिशपणे वागणे फायद्याचे असते !!


टीम आपलं मानसशास्त्र


असं म्हणतात कि, लहानपणी आपण जे जगलो तो आपला सगळ्यात सुवर्ण काळ होता. कसलंही टेन्शन नाही, चिंता नाही, कि कसलं डिप्रेशन नाही. जसंजसे वय वाढत गेले तसतसे असंख्य मानसिक समस्या मेंदूला चिकटायला लागल्या.

अजूनही लहान मुलांना खेळताना, रडताना पाहून, हवी ती मौज करताना पाहून क्षणार्धात मन लहानपणीच्या जुन्या बालिश कृत्यांमध्ये भरकटत जातं आणि मनाला एक अल्हाददायक अनुभव देऊन जातं.

आता आपण मोठे झालो आहोत, बालिशपणा नको आता, मोठ्यांसारखं वागायला हवं हे असं कितीही आपण ठरवलं तरी बालिशपणात जी मौज आहे, साधेपणा आहे, पटकन सोडून देऊन विसरण्याची जी वृत्ती आहे ती मोठेपणी सुद्धा आपल्याला कामी पडते.

ज्या व्यक्ती बालिशपणाकडे बालिश बुद्धीने पाहत आहेत, त्यांचं जर योग्य सर्वेक्षण झालं तर बऱ्याच अशा गोष्टी आढळतील कि हे नक्की जगत आहेत कि नुसतंच ढकलगाडी सुरु आहे.

महत्वाच्या गोष्टींचं गांभीर्य नसणे, प्रत्येक बाब हलकी घेणे, जबाबदारीची जाणीव नसणे वगैरे गोष्टी या बालिशपणाच्या व्याख्यात अजिबात येत नाहीत, तर मनाचा गुंता वाढण्यापेक्षा तो सोडून देणे, हेवेदावे न करणे, खेळकर-विनोदी स्वभाव, मैदानी खेळ खेळणे, गार्डनमध्ये जाऊन लहान मुलांसोबत खेळणे, आईसक्रीम खाणे…

म्हणजेच स्वतःच्या समस्येबद्दल अतिविचार न करता, त्यात घुटमळत न बसता आपल्या सभोवताली आनंद देणाऱ्या गोष्टी शोधून त्या पूर्ण करण्यास कृती करणे, मग त्या कोणत्याही गोष्टी असतील, ह्या साऱ्यांना आपण बालिशपणा असं नाव देऊ शकतो.

जो आपल्या फायद्याचा तर असतोच, पण आपल्यामुळे इतरांनाही तो सुखावून सोडतो.

असे कित्येक मानसिक समस्या ग्रस्त व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये बालिशपणाच्या कमतरतेमुळे त्यांना प्रत्येक गोष्टीकडे साधेपणाने पाहता नाही आले. कित्येक अवघड प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले असतात.

आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने जर बघत बसाल, तर आयुष्य सुद्धा गंभीर बनणारच आहे. अनेक सुखावणाऱ्या प्रसंगाची आपण अक्षरशः वाट लावलेली असते, याची जाणीव आपल्याला शेवटी होते. आपणही जगलो नाही आणि जगू दिलं नाही, हि भावना सदैव टोचत राहते.

त्यावेळी त्या मुद्द्यात उगाचच इतका कुरवाळत राहिलो, ह्याचा विचार नंतरही करून काहीच उपयोग नसतो. कारण तोपर्यंत बालिशपणाने जगवणारे प्रसंग केव्हाच तुम्हाला सोडून गेलेले असतात.

म्हणून एखादातरी बालिश गुण सोबत ठेवाल तर खऱ्या अर्थाने जगतोय असं फील आल्याशिवाय राहणार नाही.

नाहीतर आहेच, रोजच पाठीमागे रडगाणं….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!