Skip to content

लग्न म्हणजे फक्त शारीरिक सुख नसतं !!

लग्न म्हणजे फक्त शारीरिक सुख नसतं !!


मिनल वरपे


कोणतंही नातं म्हंटल की दोन्हीकडून सारखा प्रतिसाद हवा. एकमेकांनी एकमेकांसाठी कोणतीही गोष्ट करताना त्याबद्दल मनात कोणताच हेतू न ठेवता निर्मळ मनाने केले तर नक्कीच नात्यात हेवेदावे राहत नाहीत. हे सगळं आपण ऐकून आहोतच.कोणत्याही नात्यात जाणीव असणे खूप महत्त्वाचे…

आज त्याच्याबद्दल अजून कौतुक वाटलं.. आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याची निवड अगदी योग्य ठरली.

त्यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं. माहेर आणि सासर दोन्हीकडचे माणसं खूप चांगली. सर्वांचे स्वभाव प्रेमळ, सांभाळून घेणारे..घरातले माणसं तर महत्त्वाची असतातच. पण ज्या नात्याला हळुवारपणे जपायच असते ते म्हणजे नवरा बायकोचं नात..

कारण नवरा बायको एकमेकांची काळजी घेत असतील तर घरच्यांना आपल्या मुलाची काळजी राहत नाही. पण तेच जर त्यांच्यात सारखे वाद होत असतील तर मात्र घरातल्या माणसांना चिंता लागून राहते.

सर्व काही उत्तम चालू होत पण अचानक तिला खूप त्रास होऊ लागला. आणि तिला नक्की कोणता आजार झालाय याचे निदान लागतच नव्हते. ती सतत अंथरुणात पडायची कारण तिच्यात काहीच करण्याची ताकद राहिली नव्हती. काही केलं तरी तिला लगेच त्रास व्हायचा.

लग्न नुकतेच झाले होते आणि काही महिने होत नाहीत तर तिचा हा त्रास .. तिला बघून, तिचा त्रास बघून सर्वांनाच अतिशय काळजी वाटायची. घरातली सगळीच माणसं खूप काळजी घेत होती.पण अशावेळी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती नवऱ्याची..

म्हणतात ना की आपला जोडीदार आपल्या सोबत असेल तर आपल्यासमोर कोणतीही आव्हान आली तरी सहज त्यांचा सामना करता येतो. नवरा बायको हे नात सुखदुःखात एकमेकांची साथ देण्यासाठी असते.आणि एकमेकांची साथ असेल तर जी हिम्मत आपल्यात असते तिला कसलीच तोड नाही.

तीच सुद्धा अगदी असच झालं.. त्यावेळी तिचा त्रास सहन करण्या पलीकडे होता. सतत दवाखाने चालूच होते. उपचार चालू होते. पण या सगळ्या काळात तिला तिच्या नवऱ्याने खूप साथ दिली.

आजारपणात काळजी घेणे म्हणजे इतकीच काळजी नसून..तिच्या आजाराला अजिबात वैतागला नाही तो. वेळेत तिला औषध गोळ्या देणे, फळ खायला देणे आणि यापेक्षा वेगळी काळजी वेगळा समजुतदरपणा म्हणजे या परिस्थितीत त्याने त्याच्या भावणांवर खूप संयम ठेवला होता.

नविन लग्न म्हटल की मनात सतत एकमेकांना वेळ द्यावासा वाटतो. फिरायला जाणे, प्रेमाच्या गप्पा, संसाराची स्वप्न पाहणे हे सगळं आलंच. पण त्याने पटवून दिलं की लग्न हे फक्त शारीरिक सुखासाठी नसते.

कारण बहुतेकांचे असतेना की शारीरिक सुख मिळत नसेल तर चिडचिड करणे, आपल्या जोडीदारावर नाराज राहणे, आणि नवीनच लग्न म्हटल तर त्यावेळी या सुखाची अपेक्षा तर प्रत्येकालाच असते.

बायका ज्यावेळी गरोदर राहतात त्यावेळी त्यांच्यापासून अंतर ठेवून वागणे हा भाग वेगळा आहे. पण आत्ताच लग्न झालंय आणि तिच्या या दुखण्यामुळे तिच्यापासून अंतर जपायच म्हणजे खरंच खूप संयम लागतो. आणि हाच संयम तिला तिच्या जोडीदाराकडे दिसला.

म्हणूनच तिच्या जोडीदाराचा तिला खूप अभिमान वाटला. कारण काही महिन्यांच्या या नविन नात्यात त्याने खूपच समजदारपणे त्याची भूमिका निभावली.

शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुख प्रत्येकाला गरजेचं आहेच. पण त्या सुखाची हाव न करता संयम ठेवून वागणं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे.बहुतेक नाती ही शारीरिक सुख मिळत नाही म्हणून तुटतात.

आणि लग्न म्हणजे फक्त शारीरिक सुखासाठी जवळ आलेले दोन व्यक्ती नसून आयुष्यभर एकमेकांना समजून एकमेकांची काळजी घेऊन आणि एकमेकांना साथ देत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बनवलेलं एक सुंदर नात असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “लग्न म्हणजे फक्त शारीरिक सुख नसतं !!”

  1. Deepak Kshirsagar

    लग्न करायला हवे का ? कारण माझं लग्न 8 वर्ष पूर्वी झालं होतं माझी काही चूक नसताना केवळ माझा आई आणि बहिणीच्या स्वाभावामूळे माझी पत्नी ने मला
    Divorced दिला आता दूसरे लग्नाची ईच्छा च ऊरली नाही मला एकच बहीण आहे भाऊ नाही कृपया मार्गदर्शन करावे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!