Skip to content

अतिकोलेस्टेरॉल म्हणजे काय? यावर घरगुती उपाय वाचा!

अतिकोलेस्टेरॉल म्हणजे काय? यावर घरगुती उपाय वाचा!


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


कोलेस्टेरॉल हा एक पिवळसर चरबीयुक्त पदार्थ आपल्या रक्तात असतो. पण तो एक अत्यंत महत्वाचा घटक असूनही त्याची दुष्कीर्ती झालेली आहे. जणू काही हृद्यरोगामध्ये कोलेस्टेरॉल म्हणजे खलनायक असे मानले जाते. ज्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असते, त्या व्यक्तीला ‘हार्ट अटॅक’ येण्याची शक्यता जास्त असते.

शरीरातील बहुतांश कोलेस्टेरॉल यकृतात तयार होते. तर २० ते ३० टक्के कोलेस्टेरॉल आपण जे अन्न खातो त्यातून मिळते. १०० मिली रक्तात किती मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल आहे, हे मोजले जाते. साधारणपणे कोलेस्टेरॉल बरोबर काही विशिष्ट मेद असतात, त्यांना लिपोप्रोटिन्स असे म्हणतात.

या लिपोप्रोटिन्सचे दोन प्रकार आहेत.

१) लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स (एल, डी. एल.) हि शरीराला घातक असून रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतात. एकूण कोलोस्टेरॊल आणि एल.डी.एल. यांचे गुणोत्तर जास्त असेल तर रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याचे आणि त्यातून हृद्रोगाचे धोके अधिक असतात.

२) हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन्स (एच.डी.एल.) हि लिपोप्रोटिन्स कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कारणे आणि लक्षणे

अनुवंशिकता हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे मुख्य कारण आहे. खूप तळलेले पौष्टिक [पदार्थ खाण्यामुळे तसेच जास्त दूध प्यायल्याने, दुधापासून बनवलेले तूप, लोणी, साय असे पदार्थ जास्त खाल्ल्याने तसेच केक, बिस्किटे, आयस्क्रीम, मांसाहारी पदार्थ यांच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते.

खाण्यापिण्यातील अनियमितता, धूम्रपान, मद्यपान यांमुळे सुद्धा हा आजार होतो. मानसिक ताणतणावामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नक्कीच वाढते.

उपचार

लेसिथीन :

अंड्यातील पिवळा बलक, वनस्पतीजन्य तेले, डाळी, सोयाबीन आणि प्रक्रियामुक्त दूध या पदार्थांमध्ये लेसिथीन भरपूर असते. लेसिथीन हा मेदयुक्त पदार्थ असून त्यात फॉस्फोलिपिडस भरपूर असतात. या लिपिड्समुळे कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी खाली आणण्यास मदत होते.

शरीरात पुरेसे लेसिथीन असले कि रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तरात कोलेस्टेरॉल साचत नाही. लेसिथीनमुळे शरीरात पित्ताम्ल जास्त तयार केले जाते. त्यासाठी कोलेस्टेरॉल वापरले जाते आणि आपोआपच कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

आपल्या शरीरात ब जीवनसत्वाचा पुरेसा साठा असेल तर गरज पडल्यास शरीरातील पेशी सुद्धा लेसिथीन तयार करतात.

जीवनसत्वे :

ब जीवनसत्व, ब जीवनसत्वाचे भाग असलेले कोलाईन आणि इनॉसिटॉल हि जीवनसत्वे रक्तातील वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. व्हीटजर्म, यीस्ट किंवा धान्याचा कोंढा याध्येही जीवनसत्वे असतात. ई जीवनसत्वेही रक्तातील लेसिथिनला कार्यरत करते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.

रुग्णाने सूर्यफुलाच्या बिया, करडई, सोयाबीन यांचे तेल, लोणी आणि मोड आलेली कडधान्य मुद्दाम खावीत.

सूर्यफुलाच्या बिया :

वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या बिया खाव्यात. कारण बियांमध्ये लिनोलेनिक आम्ल असते, ते कोलेस्टेरॉल कमी करते. सूर्यफुलाच्या बियांऐवजी लोणी आणि साय खाल्ली तरी उपयोग होतो.

धने :

नियमितपणे धान्याचे पाणी प्यावे. ते मूत्रल असून पित्रपिंडाच्या कार्याला चालना देते. दोन चमचे धने एक पेला पाण्यात घालून चांगले उकळवावे. पाणी गार करून गाळावे. दिवसातून दोनदा हा काढा प्यावा.

इसबगोल :

कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीवरील उपचारात इसबगोल या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो.याच्या बियांचे तेल ती पातळी खाली आणण्याचे काम करतात. ह्यात ५० टक्के लिनोलिक आम्ल असते. हे तेल सूर्यफुलाच्या तेलापेक्षा जास्त परिणामकारी तेल असते. हे तेल चहाचे दोन चमचे दररोज पोटात घ्यावे .

तंतुमय पदार्थ :

गहू, तांदूळ, बार्ली आदी धान्यांमध्ये कोंडा , तूस, धान्याचे साल आणि दाना असतो. ही धान्ये कोंडा न काढता खावीत. तसेच बटाटा , गाजर , बिट , सलगम इ . कंद आंबा पेरू यांसारखी फळे, कोबी, भेंडी, लेट्यूस आणि सेलरी या भाज्या यांमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. ओट आणि मक्याचा कोंडा यांच्यामुळे कोलेस्टेरॉलमधील एल.डील .एल कमी होते.

आहार :

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी एल.डी.एल ची पातळी कमी करणे आणि एच.डी .एल ची पातळी वाढविणे आवश्यक असते. आपला आहार आणि जीवनशैली यांमध्ये हे बदल करून साध्य करता येते. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढविणारे आणि साठलेला मेद असलेले पदार्थ सर्वात कमी करावे.

अंडी मांस चीज , लोणी , बेकन, बीफ आणि पूर्णांश दूध हे पदार्थ कमी खावे. मांसाहार तसेच खोबरेल आणि पाम तेल यात खूपच मेद असतो. त्यावर मका, करडई , सोयाबीन आणि तिळाचे तेल वापरावे. त्यामुळे एल.डी .एल ची पातळी कमी होते.

कोलेस्टेरॉल वाढलेल्या व्यक्तींनी दिवसातून आठ ते दहा पेले पाणी जरूर प्यावे . त्यामुळे त्वचा आणि मूत्र यांचे कार्य चांगले चालते. शरीरातील जास्तीचे कोलेस्टेरॉल बाहेर टाकण्यास मदत होते.

इतर उपाय :

नियमित व्यायाम करावा त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील प्रत्येक भागापर्यंत रक्त पोहोचते. जॉगिंग, पोहणे, चालणे , सायकल चालविणे आणि बॅडमिंटन खेळणे या व्यायाम प्रकारांचा फार उपयोग होतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!