जपूया मनाचं सौंदर्य
स्मिता क्षीरसागर
आपण सुंदर असावं सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. सुंदर दिसण्याला आपण जितकं महत्त्व देतो तितकं महत्त्व आपल मन सुंदर ठेवण्यासाठी देतो का?
अर्थातच नाही…मानवी मन नेहमी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षढरिपूंनी व्यापलेले आहे. आपण इतके सुशिक्षित आहोत की आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणिव आहे.
तरी पण मनात येणाऱ्या षढरिपूंना आपण थांबवत नाही. परिणामी आपल्या नकळत विचारांचे कृतीत परिवर्तन होते. जसे विचार…तशी कृती!
आयुष्यात सर्व माझ्या मनासारखं झालं पाहिजे ही अपेक्षा… दुसऱ्याने आपल्याशी चांगलंच वागायला हवं हा अट्टाहास… हेच मानवी मनाच्या दोषाचं मूळ कारण आहे. ज्या प्रकारच्या विचारांना आपण खत पाणी घालतो तसेच विचार वाढ़त जातात आणि ते विचार कृतीमधून व्यक्त होतात.
मनाला चांगला विचार करण्याची सवय लावणं हे पूर्णतः आपल्या हातात आहे.
यामुळे जीवनातील सकारात्मकता वाढत जाते आणि ज्याला आपण खरं सुख समाधान म्हणतो त्याचा अनुभव आपण घेऊ लागतो.
आपण नेहमी ऐकतो वाचतो की सुख समाधान हे बाह्य गोष्टीमधे नसून आपल्या अंतर्मनात आहे. हे सुख समाधान मिळवण्याचा मार्ग आपल्या चांगल्या विचारात आहे. मुळात आयुष्य जगण्याचं मूळ ध्येयच सुखी समाधानी आयुष्य जगणं हे आहे.
हे सगळं साधं सोपं असताना आपणच विचारांचा गुंता करुन त्यात स्वतःला गुरफटून घेतो आणि आपला यावर ठाम विश्वास असतो की आपण यातून बाहेर पडू शकत नाही.
नकारात्मक गोष्टींवरचा अधिकचा विश्वास सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडू देत नाही. मनाला चांगल्या विचारांचं वळण लावणं अवघड वाटलं तरी अशक्य नाही.
शेवटी स्वतःच्या सुख समाधानासाठी चांगल्या विचारांची कसरत करायला काय हरकत आहे…? हो की नाही?



लेख खुप छान आहे
???
Ma’am your article is too good .How to turn our mind to positive side, this is very nice though. Keep it up & keep writing .
Very nice