नवनवीन ठिकाणी गेल्यामुळे आपले व्यक्तिमत्व बहरते !!
मिनल वरपे | ९३०७८६७०६७
आपण रोज आपल्या कामात, गडबडीत असतो. कोणाला शाळेला सुट्टी नाही तर कोणाला जॉब वर सुट्टी मिळत नाही.. त्यामुळे रोजच तीच माणसं, तेच कार्यालय, तेच वातावरण आणि बाहेरून काम करून आलो की घराच्या चार भिंतीत असलेले आपण.
या तोचतोपणा मुळे आपल्यात चिडचिड होणे, सहज कोणत्याही कारणामुळे समोरच्या व्यक्तीवर रागवणे, सतत डोकं दुखणे तसेच इतर शारीरिक तक्रारी निर्माण होणे,लहानसहान गोष्टींवरून वैतागणे या सारख्या समस्यांच प्रमाण वाढते.
पण तेच जर आपण आणि आपल्या कुटुंबातील व्यक्ती तसेच मित्रपरिवार जस वेळ मिळेल तस नवनविन ठिकाणी भेट दिली तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच जाणवतील..
नविन माणसांची ओळख: आपलं दैनंदिन जीवनात रोज जी माणसं भेटतात ती नक्कीच आपल्या कायम सोबत असतात.आपल्या गरजेला उपयोगी येतात. आपण आनंदात जस एकमेकांसोबत असतो तशीच दुःखात एकमेकांची साथ देतो.
पण जेव्हा आपण नवनविन ठिकाणी भेट देतो तेव्हा तिथे नविन माणसं आपल्याला भेटतात, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात,ओळख असो वा नसो पण पण त्यांच्या वागण्या बोलण्याच आपण निरीक्षण करत असतो आणि त्यातून आपल्याला नवनविन गोष्टी शिकायला मिळतात.
मनातल्या दुःखांचा विसर पडतो
नवनविन माणस, नवीन ठिकाण यामुळे आपल्याला आपल दुःखाची जाणिव राहत नाही. सतत तोचतोपणा असेल तर दुःखाची जाणिव चालूच राहते पण नव्या ठिकाणी गेल्यावर तिकडचा निसर्ग यामधे आपलं मन पूर्णपणे गुंतू लागते. सगळीकडेच का दुःखी राहायचं अस सहज आपल्या मनाला वाटते आणि आपण त्या ठिकाणचा आनंद अनुभवतो.
शारीरिक आणि मानसिक तक्रारी
बहुतेक डॉक्टर आपल्या रुग्णांना मोकळ्या ठिकाणी राहायचा सल्ला देतात. कोणत्याही नैसर्गिक, शांत, प्रसन्न ठिकाणी गेलं की मन प्रसन्न राहते.फक्त औषध गोळ्या घेऊनच आजार दूर होतात अस नाही तर नवनव्या ओळखी, नवीन जागा, वेगळं वातावरण यामुळे मनात उत्साह निर्माण होतो आणि शारीरिक समस्या सुद्धा जाणवत नाही.
नविन कल्पना सुचतात
आपलं रोजचं काम म्हणजेच आपला ठरलेला दिनक्रम यामुळे आपली कुठेतरी घुसमट होत असते. घर ऑफिस घर यामुळे आपण कंटाळून जातो.त्यामुळे वेगळं वातावरण मिळालं की नवनविन कल्पना सुचतात मग त्या कामाच्या असो किंवा मन ताजतवान कस ठेवता येईल यासाठी.
मुलांचं अभ्यासात मन रमते
आपण मोठी माणस जस रोजच्या दिनक्रमात कंटाळतो तसच लहान मुलांचं सुद्धा होते. रोज रोज शाळा अभ्यास वेळ मिळालाच तर खेळ यामुळे त्यांना सुध्दा कंटाळा येऊ लागतो. आपल्यासारखीच त्यांची सुद्धा घुसमट होते.
आणि कधीकधी घरचे ओरडतील, शाळेत उत्तर द्यावी लागतील यामुळे करायचं म्हणून अभ्यास करतात. पण तेच त्यांना अधूनमधून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेलं तर त्यांचा सुद्धा उत्साह वाढतो ते आनंदी होतात आणि मन प्रसन्न असेल तर त्यांचं अभ्यासात सुद्धा मन रमते.
घरातलं वातावरण उत्तम राहते
रोजच्या आपल्या कामाच्या गडबडीत असताना आपण घरी, घरच्या माणसांना वेळ देत नाहीत.आपण घरच्या माणसांवर कामाचा राग काढतो. आणि त्यामुळे घरात तणाव निर्माण होतात. पण आपण सर्वांना घेऊन बाहेर फिरलो तर घरातल्या माणसांना सुद्धा प्रफुल्लित वाटते.त्यामुळे घरचं वातावरण उत्तम राहण्यास फायदाच होतो.


