Skip to content

आभासी भीतीच्या छायेतून बाहेर येण्यासाठी हे करा.

आभासी भीतीच्या छायेतून बाहेर येण्यासाठी हे करा.


अनेकदा आपल्याला उगाचच कशाची ना कशाची तरी भीती वाटत राहते आणि ही भीती हळूहळू मन पोखरत राहते. त्याचा आपल्याला कामगिरीवर आणि कार्यक्षमतेवर फार मोठा परिणाम हा पडत असतो.

अशा या अवास्तव किंवा आभासी भीतीमधून बाहेर पडण्यासाठीचे हे उपाय करून पहा..

आभासी गोष्टींमध्ये अडकू नका.

जेव्हा भीती वाटण्यासारखे ठोस काहीही नसते तेव्हा उगीच कल्पना करत बसू नका. तुमच्याकडे स्पष्टता नसते तेव्हा उगीच नसलेल्या गोष्टींमध्ये हरवून जाऊ नका. अशा वेळी चिंता किंवा भीती निर्माण करणाऱ्या परिस्थितीविषयी नेमकेपणाने जाणून घ्या.

अशा परिस्थितीत स्वतःला प्रामाणिक आणि व्यावहारिक प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर शांतपणे फॉलोअप घ्या. ती नको असलेली घटना घडलीच तर तुम्ही काय कराल हे ठरवा.

अनेकदा अशी घटना प्रत्यक्षात घडते तेव्हा तुम्हाला वाटते तितकी ती भीतीदायक नसते. स्पष्टता मिळविण्यासाठी काही मिनिटे घालवून तुम्ही नंतर होणारा त्रास आणि वाया जाणारी ऊर्जा टाळू शकता.

विचारात खेळत बसू नका.

दुसऱ्याच मन जाणून घेण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा अयशस्वी ठरतो.त्यापेक्षा तुमच्या मनात तयार झालेल्या भीतीदायक प्रसंगाला तोंड देणे परवडते. त्यामुळे चिंतेकडे न नेणारा मार्ग निवडा. दुसऱ्याला जे काही विचारायचे आहे ते थेट विसरा. त्याने असे केले तर,आपण तसे करू , तो असा म्हणाला तर असल्या विचारात खेळत बसू नका. त्यातून अनेक अनावश्यक वाद टाळता येतील आणि तुम्ही आनंदी राहाल.

न घडणाऱ्या घटनांची काळजी

आतापर्यंत मला ज्या गोष्टींची आयुष्यात भीती वाटली त्यापैकी किती प्रत्यक्षात घडल्या? अनेकदा चिंता म्हणजे  आपणच आपल्या मनात निर्माण केलेला राक्षस असतो. त्यामुळे हा प्रश्न स्वतःला नेहमी विचारत रहा आणि विचार करा प्रत्यक्षात किती चिंता आपल्याला झेलाव्या लागतात.

जग काय म्हणेल याचीच काळजी

लोक काय म्हणतील या विचारांनी अनेकांच्या डोक्याचा भुगा पडलेला असतो. लोकांपेक्षा आपल्या जवळचे म्हणजे भाऊ- बहीण, आईबाबा, आजीआजोबा, घरातील पाळीव प्राणी काय म्हणतो आहे याकडे थोडे लक्ष दिले तरी आपल्या जगण्यात मोठा आनंद निर्माण होईल. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण लोकांना तुमच्या आयुष्याबद्दल म्हणायला वेळच नाही. आणि जे म्हणणार आहेत ते कुणी कसेही वागले तरी बोलतच राहणार आहेत कारण त्यांना आयुष्यात दुसरे कामच उरलेले नसते.

तुमच्या चिंता उजेडात आणा

तुमच्या मनात जी सगळ्यात मोठी चिंता आहे ती एकदा उजेडात येऊ दे. तुमच्या जवळच्या मित्राला, मैत्रिणीला, आईला ती सांगून टाका. म्हणजे तुमच्या मनावरचे ओझे हलके होईल. एकतर तुमची चिंता किती व्यर्थ आहे ही बाब तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या लक्षात आणून देईल.कारण तुम्ही तुमच्याच नजरेतून सगळ्या जगाकडे बघत असता.

सौजन्य – संध्यानंद



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!