Skip to content

सकारात्मकतेने पाहिले तर हे जग आनंदाने रसरसलेले आहे.

सकारात्मकतेने पाहिले तर हे जग आनंदाने रसरसलेले आहे.


डॉ. माधुरी मिसाळ


शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना!

जगात प्रत्येक क्षणी प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. तो आनंद मिळवण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो. पण असं म्हणतात, आनंद हा मानण्यावर असतो.

सकारात्मकतेने पाहिले तर हे सर्व जग आनंदाने रसरसलेले दिसून येईल. मग या आनंदाला साजरा करण्यासाठी, त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, दर वर्षी 20 मार्चला आपण इंटरनॅशनल हॅपिनेस डे म्हणजेच जागतिक आनंदी दिन साजरा करतो.

त्या आनंदी दिनाबद्दल थोडीशी माहिती देण्याचा एक प्रयत्न करत आहे.

संयुक्त राष्ट्राने 2013 पासून त्याची सुरुवात केली. दरवर्षी 20 मार्चला “इंटरनॅशनल हॅपिनेस डे” साजरा केला जातो. दरवर्षी एक ठराव पास होतो. एक नवीन ध्येय ठेवले जाते. त्यासोबतच आनंदी देशांची यादी सुद्धा जाहीर होते.

ह्या आनंदा विषयी एवढे आपण बोलतोय तो नेमका काय? तर त्याची सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे, “आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये सकारात्मक, समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद हा सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो”.

गंमत वाटली ना..की आनंदाची पण व्याख्या असते. म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात,”आनंदाची डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे”

यावर्षी सुद्धा संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी म्हणजे 19 मार्चला आनंदी देशांची यादी जाहीर केली. ह्यावर्षी 149 देशांची नावे या यादीत आहेत. आपण म्हणजेच भारत देशाने या यादीत 139 स्थान मिळवले.सगळ्यात आनंदी देश म्हणून फिनलॅन्डने प्रथम क्रमांक ह्या यादीत मिळवला.

विशेष बाब म्हणजे फिनलॅन्ड हा देश सलग चौथ्यांदा यादीत प्रथम क्रमांकावर आहे. सगळ्यात खालचे स्थान कायम युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अफगाणिस्तानला मिळाले. विशेष म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रांनी या यादीत वरचे स्थान प्राप्त केले. तेथील लोक आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. पाकिस्तान 105 व्या क्रमांकावर, बांगलादेश 101 व्या क्रमांकावर, तर चीन 84 व्या स्थानी आहेत.

ह्या यादी सोबत दरवर्षी एक ठराव सुद्धा पास होतो. ह्यावर्षी करोना च्या धर्तीवर “हॅप्पीनेस फोर ऑल फोरेवर” – “सर्वांसाठी कायमचा आनंद” हा ठराव पारित करण्यात आला.

ह्या आनंदाला आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून घेतला आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारला की सगळे सोपे होते आणि मग आनंदाला आपल्या जीवनात कायमचे स्थान मिळते.

बालकवींची कविता आपल्याला आनंदाबद्दल खूप काही सांगून जाते…

आनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे,वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला दिशांत फिरला जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
आनंदी आनंद गडे ..

सगळ्या वाचकांना आनंदी दिनाबद्दल खूप शुभेच्छा..

“ Happy world happiness day”



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!