लैंगिक दौर्बल्य आणि घरगुती नैसर्गिक उपचार !
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ज्ञ)
लैंगिक संबंध हि माणसाची भुकेइतकीच मूलभूत, साहजिक प्रवृत्ती आहे. अर्थात लैंगिक इच्छा पूर्ण करून घेताना मनाची एकाग्रता आणि स्वस्थता फार आवश्यक असते.
हि गोष्ट घाईघाईत, दडपणाखाली उरकता येण्यासारखी नसते. अर्थात ज्या व्यक्ती नेहमीच काळजीत, धास्तीत आणि कामात व्यग्र असतात त्यांना हे नियम पाळता येणे शक्य नसते.
त्यामुळे अनेकांना लैंगिक सुख मिळवता येत नाही. त्यासाठी असलेले अवयव व्यवस्थितपणे आपले कार्य पार पाडू शकत नाहीत. पुरुषांमधील या विषयातील सर्वात जास्त आढळणारी तक्रार म्हणजे लैंगिक दौर्बल्य.
याची कारणे आणि लक्षणे काय ?
लैंगिक कमजोरी तीन प्रकारची असू शकते. पुरुषांचे शिश्न ताठ होणे ही लैंगिक प्रक्रियेची सुरुवात म्हणता येईल. परंतु हि गोष्ट सध्या होत नसेल तर त्याला प्राथमिक लैंगिक दौर्बल्य किंवा कमजोरी म्हणतात. शिश्न ताठ होते.
परंतु त्याचा ताठपणा लवकर कमी होतो. त्यामुळे स्त्री-पुरुष संबंधात अडथळा निर्माण होतो. ही दुसऱ्या प्रकारची कमजोरी अनेक पुरुषांमध्ये आढळते. तिसरी कमजोरी हि वाढत्या वयाशी निगडित असते.
नैराश्यासारख्या मानसिक आजारातून लैंगीक कमजोरी उद्भवू शकते. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी पडते. त्याचा परिणाम जननेंद्रियावर म्हणजेच शिश्नावर होतो. त्याचे काम व्यवस्थित होत नाही.
अतिशय थकवा, दारूचा अंमल, ऑस्ट्रेजिन्सचा औषधातील वापर, औषधांमुळे चेतासंस्थेच्या काही चेतांना आलेला लुळेपणा आणि मधुमेह या कारणांनी तसेच जननेंद्रियांच्या सर्वसाधारण कमजोरीमुळे लैंगिक दुर्बलता येते.
दुसऱ्या प्रकारची लैंगिक कमजोरी हि आधीच्या असफलतेतून येते. कारण त्यामुळे एक प्रकारची भीती मनात ठाण मांडून बसते. त्यातूनच स्वतःबद्दलचे चुकीचे ग्रह करून घेतले जातात.
मग यावर उपचार काय ?
लसूण :
लैंगिक कमजोरी घालविण्याचा लसूण हा उत्तम घरगुती उपाय आहे. लसूण नैसर्गिक आणि अपाय न करणारी कामोत्तेजक आहे. अमेरिकेतील लैंगिक तज्ज्ञांनीही लसणीच्या विषय वासनेला उत्तेजन देण्याच्या गुणधर्माला दुजोरा दिला आहे.
अति कामवासना आणि मानसिक थकवा अशा किंवा इतर कोणत्याही कारणांनी लैंगीक शक्ती कमी झाली असली तरीही लसूण खाल्ल्याने ती पूर्ववत होते. रोज लसणीच्या दोन किंवा तीन कच्च्या पाकळ्या अवश्य खाव्या.
कांदा :
लसणीनंतर कामोत्तेजक म्हणून कांद्याचा नंबर लागतो. कांद्यामुळे लैंगीक इच्छा वाढते, तसेच जननेंद्रियांना बळकटी येते. पांढरा कांदा यासाठी जास्त उपयुक्त आहे.
गाजर :
लैंगिक ताकद वाढविण्यासाठी गाजर खावे. १५० ग्राम गाजर किसून त्यात अर्थवट उकडलेले अंडे मधात बुडवून खावे. हा उपचार एक ते दोन महिने रोज करावा.
भेंडी :
कामेच्छा वाढविण्यासाठी भेंडी खावी. एखाद्या व्यक्तीने भेंडीच्या मुळांची पूड ५ ते १० ग्राम आणि एक ग्लास दूध रोज घेतल्यास त्याची कामेच्छा कधीही कमी होत नाही, असे प्राचीन संस्कृत ग्रंथात म्हटलेले आहे.
शेवग्याच्या शेंगा :
लैंगीक शक्ती प्राप्त करण्यासाठी पाव लिटर दुधात १५ ग्राम शेवग्याच्या शेंगांची फुले उकळवावी. हे दूध रोज प्यावे. स्त्री आणि पुरुष दोघांहीमधील प्रजननशक्ती वाढविण्याचे काम हि फुले करतात.
शेवग्याच्या झाडाच्या वाळलेल्या सालीची पूडही बहुगुणी आहे. अर्ध्या लिटर पाण्यात १२० ग्राम पूड घालून हे पाणी अर्धा तास उकळवावे. तसेच ३० ग्राम पूड आणि एक मोठा चमचा मध एकत्र करून ते मिश्रण दिवसातून तीनदा खावे. हा उपचार एक महिना करावा लागतो.
आले :
अर्ध्या चमचा आल्याचा रस, अर्धवट उकडलेले एक अंडे आणि थोडा मध एकत्र करून हे मिश्रण रोज रात्री असे एक महिनाभर घ्यावे. त्यामुळे कमजोरी कमी होऊन नकळत किंवा अकाली होणारे वीर्यपतन होत नाही.
खारीक :
खारीक हे उत्तम शक्तिवर्धक खाद्य आहे. खारकेची पूड, पिस्ते आणि बेदाणे हे सम प्रमाणात एकत्र करून रोज साधारणपणे १०० ग्राम एवढे खावे. लैंगिक शक्ती वाढवण्याचे ते उत्तम औषध आहे.
मनुका :
काळ्या मनुकांमुळे लैंगीक जोम कायम राहतो. मनुका स्वच्छ पाण्याने धुवाव्या आणि दुधात घालून उकळवाव्या. त्यामुळे त्या फुगतात आणि गोडही लागतात. मनुका खाऊन त्यावर दूध प्यावे.
सुरुवातीला ३० ग्राम मनुका आणि दिड कप दूध असे दिवसातून तीनदा प्यावे. हळूहळू मनुकांचे प्रमाण दर वेळी ५० ग्राम पर्यंत वाढवावे.
योग्य आहार काय आहे ?
लैंगिक कमजोरी कमी करण्यासाठी योग्य आहार घेण्याची फार जरुरी असते. पहिले सात दिवस अशा व्यक्तीने दिवसातून तीनदा फक्त ताजी, रसाळ फळे खावी. त्यानंतर हळूहळू कडधान्ये, तृणधान्ये, सुका मेवा, भाज्या, फळे हा आहार सुरु करावा.
त्याचबरोबर पुन्हा तारुण्याचा जोम मिळवून देणारे शाळेचे दूध, दह्याची निवळी, आले, मध, यीस्ट, बाजरी हे पदार्थ मुद्दाम खावे. चहा, कोफी, मद्य, धूम्रपान टाळावे. कुठलेही साखरेचे आणि मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत. निकस अन्न वर्ज्य केल्याने परिणाम चांगला होतो.
इतर उपाय काय आहेत ?
मानसिक स्वास्थ्य आणि शक्ती मिळविण्यासाठी शरीरातील स्नायूंमध्ये जोम यावा लागतो. त्यासाठी सर्वांगाला मालिश करून घ्यावे. जननेंद्रियांमधील चेता कंबरेच्या भागामार्फत नियंत्रित केल्या जातात. या चेतांमध्ये उत्तम रक्तप्रवाह वाहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे गार पाण्यात बसावे.
उत्तम आहार, मोकळ्या हवेत वावर आणि व्यायाम यांच्या साहाय्याने उत्तम आरोग्य मिळवायचा प्रयत्न करावा. तसेच धनुरासन, सर्वांगासन आणि हलासन हि योगासने रोज केल्यानेही खूप उपयोग होतो.
अनुवाद : कविता भालेराव
Very nice information