मत लादणाऱ्यांसोबतही ठामपणे उभे राहण्याच्या काही टिप्स !!
मिनल वरपे | ९३०७८६७०६७
बहुतांश लोकांची एक सवय असते कोणताही निर्णय तसेच आपली मते दुसऱ्यांवर लादण्याची मग ते घरातील माणसं असो, मित्रपरिवार. मी म्हणेल तेच खरं अस समजून आणि दुसऱ्यांच्या मताची दखल न घेता प्रत्येक वेळी स्वतःला हवे तसे निर्णय घेऊन त्यातच आनंद मानणारे व्यक्ती असे वागून स्वतःची प्रतिमा बरोबर करून दुसऱ्यांना दुखावत पुढे जात असतात.
पण अशा व्यक्तिमत्वामुळे आजूबाजूच्या सर्वच लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगले मत राहत नाही. या व्यक्तिमत्वाचा त्रास हा इतरांना होतोच शिवाय त्याचे परिणाम त्या व्यक्तीला सुद्धा पुढे अनुभवाला येऊ शकतात.
स्वतःच मत दुसऱ्यांवर लादणारे व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील तर अशा व्यक्तीमुळे आपल्याला होणारा त्रास टाळायचा असेल तर काय करावे:
१) दुर्लक्ष करणे:
जर आपल्यावर मत लादणारे व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांनी घेतलेला निर्णय हा शेवटचा निर्णय आहे असा विचार न करता आपण त्या मताकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायची की त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्य आहे असा त्याचा समज चुकीचा आहे.
कारण योग्य निर्णयांना स्वीकारणे अवघड नसते पण चुकीच्या निर्णयांना साथ देणे म्हणजे आपल्याला जे सांगितलं जाईल तस आपण ऐकणार असा स्वभाव समोरच्या व्यक्तीला दाखवून देणे अस होते.
२) आपल्या कामाकडे लक्ष देणे:
समोरची व्यक्ती माझ्या मताचा विचार करत नाही. ती व्यक्ती अस का वागते, त्या व्यक्तीच्या अशा वागण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्या विचाराची वेळ आपल्या कामाकडे दिली तर आपली वेळ सत्कारणी लागेल.
३) जास्त विचार करू नये:
कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य काय आहेत हे ओळखून ती पूर्ण करून बाजूला व्हायचं यामुळे आपल्याला कोणताच त्रास होत नाही. कोण कसं आणि का वागतेय हा विचार करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ राहत नाही.
४) जे आपल्याला योग्य वाटेल तसेच करणे:
समोरच्या व्यक्तीने निर्णय घेतलेले आपल्याला पटत नसेल तर वाद घालण्यापेक्षा शांत राहून, सर्व भावनिक विचारांना बाजूला सारून, आपण आपले निर्णय घेऊन जे आपल्याला योग्य वाटते तेच करावे. म्हणतात ना ऐकावे जनाचे पण करावे मनाचे.
५) स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची सवय लावणे:
व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाच आहे. आपली मतं आपले विचार यांना आपण स्वतःच प्राधान्य द्यायला हवं. समोरचा कधी ठरवेल, काय निर्णय घेईल, घेतलेला निर्णय आपल्याला मान्य झाला नाही तर काय करायचं एवढं करत बसण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊन मार्गी लागलेलं केव्हाही उत्तम.
यामुळे आपली निर्णयक्षमता चांगली होते. शिवाय येणाऱ्या अनुभवातून योग्य ते निर्णय घेण्याची सवय आपल्याला लागते. आणि स्वतःचे महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेऊन वेळ वाया न जाता घेता येतात.
६) आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व निर्माण करणे:
कोणीही आपल्यावर मत लादेल असा आपला स्वभाव ठेवायचा नाही. पटत नसेल तरी समोरच्या व्यक्तीच्या मताला स्वीकारणे, समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये, ती दुखावल्या जाऊ नये, वाद निर्माण होऊ नये म्हणून स्वतःवर मत लादून घेणे असा विचार केल्यामुळे आपल्यावर कोणीही मते लादू शकतो.
पण अशा वागण्यापेक्षा कोणी कितीही सांगितलं, बोललं, मत लादायचा प्रयत्न केला तरी जे मला योग्य वाटेल तेच मी करतो अस स्वतःच व्यक्तिमत्त्व आपण तयार केलं तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही.
जर दुसऱ्यांवर मत लादण्याचा आपला स्वभाव असेल तर अशा स्वभावामुळे कधी ना कधी आपण सुद्धा दुखावले जाऊ शकतो. निर्णय घेण्यात जरी तात्पुरता आनंद मिळत असला तरी त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व कायमच चांगलं राहतं नाही. अशा स्वभावाचे दुष्परिणाम सुद्धा खूप आहेत. जर आपला स्वभाव अगदी असाच असेल तर आपण काय करावे:
१) सर्व बाजूंनी विचार करणे:
कोणताही निर्णय घेताना मला जे योग्य वाटेल तेच खर हा विचार बाजूला ठेवून सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावे. आपल्या घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांना समाधान मिळेल हा महत्त्वाचा विचार आपल्या जवळ असावा. कोणताही निर्णय घेताना एकतर्फी विचार न करता सर्व बाजूंनी विचार केल्यास निर्णय योग्य ठरेल. जास्तीत जास्त स्वतः चेच निर्णय घ्यावे.
२) इतरांच्या मताची दखल घेणे:
कोणताही निर्णय घेताना हमखास आपण चर्चा करतोच. पण या चर्चेत आपण आपल्याला काय वाटते आणि तेच कितपर्यंत योग्य आहे हेच ठासून सांगतो, दुसऱ्यांना त्याबद्दल काय वाटते याचा आपण अजिबात विचार करत नाही. आणि कोणी मध्ये बोलायला गेलं की त्याकडे दुर्लक्ष करणे अशामुळे घेतलेला निर्णय म्हणजे स्वतःच मत लादणे होते. यापेक्षा आपण इतरांच्या मताची दखल घ्यावी.
३) आपल्या वागण्याचा कोणाला त्रास होत नाहीना याची काळजी घेणे:
नेहमीच जर आपण आपली मते इतरांवर लादत असू तर कुठे ना कुठे आपल्याला दुखावांयला नको, तसेच आपल्याला दिलेल्या मनाचा विचार करून, वाद नको म्हणून समोरची माणसं आपले लादलेले मत स्वीकारतात.
पण याचा सर्वांना किती त्रास होत असेल याचासुद्धा आपण विचार करून यापुढे ते जितका आपला विचार करतात आणि आपले मत स्विकारतात हा विचार लक्षात घेऊन कोणालाही न दुखावता मिळून निर्णय घ्यावे.
४) निर्णय घेण्यासाठी इतरांना सुद्धा संधी देणे:
प्रत्येक वेळी निर्णय घ्यायची वेळ आल्यावर स्वतःच्या मताला प्राधान्य देऊन स्वतःच निर्णय घेण्यापेक्षा तीच निर्णय घेण्याची संधी इतर व्यक्तींना सुद्धा द्यावी. कुटुंब असो अथवा मित्र परिवार प्रत्येक सदस्याला महत्त्व दिलं की कुठेच कोणी दुखावल्या जात नाही. सतत जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतले, स्वतःच्या मताला महत्त्व दिलं तर एकजुटीपणा राहत नाही. म्हणून प्रत्येकाला निर्णय घेण्यासाठी संधी दिली तर उत्तमच.
५) स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे निरीक्षण करणे:
जेव्हा आपण आपल तेच खरं करतो.. आपल्यापुरते मर्यादित विचार करून निर्णय घेतो तेव्हा आपण कितपर्यंत योग्य वागतोय याच आपण स्वतःच निरीक्षण करणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती ऐकून घेते, स्वीकारते म्हणजे आपण योग्य आहोत असा गैरसमज करून स्वतःला योग्य ठरवणे चुकीचं आहे.
स्वतःच निरीक्षण केल्यामुळे आपण घेतलेले चुकीचे निर्णय, आपण लादलेली मत आपल्या लक्षात येतात. याच बरोबर जर सर्वांना आपण निर्णय घेण्याची संधी दिली तर त्यावेळी किती योग्य निर्णय होतात हे सुद्धा आपल्या लक्षात येते.
६) स्वतःच खरं म्हणण्यापेक्षा त्याच्या परिणामांचा सुद्धा विचार करणे
स्वतःच खरं करून घेतलं तर आपल्याला जरी आनंद मिळत असला तरी ज्यांच्यावर आपण आपली मतं लादतो ते सर्व काही काळानंतर आपल्या मतांना आपल्या विचारांना जुमानत नाहीत.
सतत स्वतः निर्णय घेण्यामुळे दुसऱ्यांची मत स्वीकारणे आपल्याला खूप अवघड जाते. यामुळे ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आधीच आपण काळजी घेतलेली योग्य
तसेच घरात सुद्धा अनेक वडीलधारे व्यक्ती असतात. त्यांच्यावर सुद्धा आपली एकेरी मते लादून काहीच उपयोग नसतो. वडीलधारे जरी असले तरी खुपश्या गोष्टी त्यांना शाब्दिक स्वरूपात स्पष्टपणे सांगता येत नसल्या तरी तुमच्याप्रती असणारी त्यांची वागणूक बदललेली असेल, हे मात्र नक्की.
म्हणून मते लादण्याआधी कुटुंबातील प्रत्येकाची मते तुम्हाला स्विकारता येत आहेत का, आधी याचा सखोल विचार व्हायला हवा.



लेख आवडला