Skip to content

मनातल्या दुःखांचा निचरा कसा कराल ?? वाचा थोडक्यात !

मनातल्या दुःखांचा निचरा कसा कराल ?? वाचा थोडक्यात !


पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.


मनाविरुद्ध गोष्ट घडली की वाईट वाटतं.. दुःख होतं आणि दुःख हे नेहमी माझ्याच वाट्याला का? इतरांना का नाही? असं वाटत रहातं. मग आपण आपल्या दैवाला, नशीबाला, आपल्या जवळच्यांना कोसत रहातो. पण या अशा वागणुकीने दुःख कमी न होता उलट आणखीनच वाढतच जातं.

दुःख जर संपवायचं असेल तर ते मुळात निर्माण का झालं? आपली कोणती चूक झाली? आपण कुठे कमी पडलो? आपलं मन नेमकं का दुखावलं? की आपल्या वागणुकीने ते आपण दुखावून घेतलं? हे इतर कोणालाही दोष न देता निरपेक्षपणे शोधायला हवं..

या गोष्टींचा शोध ज्या क्षणी लागला त्याक्षणी दुःख तिथल्या तिथेच संपतं. दुःख संपलं की आपोआपच सुख येतं. पण आलेल्या सुखात नुसतं लोळत न पडता ते टिकवता कसं येईल याचा विचार सतत करायला हवा व त्या विचारानुसार आचार ही ठेवायला हवा. विचाराविना आचार व आचाराविना नुसते विचार काहीही उपयोगाचे नाहीत. उलट नुकसानकारकच आहेत. यांची सांगड घातली तर मात्र सुखदुःखाचा प्रश्न कायमचाच निकालात निघतो.

हा प्रश्न एकदाचा सुटला की उन्नतीच्या महामार्गावर वेगवान गाडीचे मार्गक्रमण सुरू होते. मात्र या वेगवान गाडीला विचाराचं फ्युल व आचाराचं सातत्य नाॅनस्टाॅप द्यायला हवं तर आणि तरचं निश्चित डेस्टिनेशन योग्य वेळेत गाठता येतं.


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

3 thoughts on “मनातल्या दुःखांचा निचरा कसा कराल ?? वाचा थोडक्यात !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!