Skip to content

आजारांच्या भितीनेच पुष्कळ आजार हे वाढत आहेत.

आजारांची भिती हेच आजार वाढण्याचे मुख्य कारण!


मिनल वरपे


आजार म्हंटले की आपल्या मनात सर्वात आधी येते ती म्हणजे भिती.. आत्ताचं आपल्यासमोर असलेलं अगदी ताज उदाहरण ..कोरोना नावाची भिती..

खरं बघायला गेलं तर आजार कोणताही असो त्या आजाराची लक्षण काय, कारणे काय, त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील या सगळ्याचा विचार मनात आधी यायला हवा पण आपल्याकडे मनात पहिली येते ती भिती..

आणि या भितीमुळेच आपला असलेला आजार आणखीन वाढतो. जर एखाद्यास सामान्य घसा दुखत असल्यास तर पुढे ताप येईल की काय, असा विचार करूनच मनातली भीती वाढते. वाढलेल्या भीतीमुळे त्यावर काय उपचार करावे हा विचार न करता आपला आजार आपण स्वतः वाढवून घेतो.

तेच जर मनात भीती न बाळगता आपण घसा दुखण्यावर योग्य उपचार घेतले तर पुढे होणाऱ्या आजाराचा धोका संभावणारच नाही.

आपल्याला जेव्हा कोणताही आजार होतो..आपली तब्येत बिघडते त्यावेळी मला काय झालंय ?? अस काय होत आहे?? आता काय करायचं?? माझं आता कस होणार?? आता या आजारपणात माझी वेळ अशीच वाया जाणार?? जॉब करत असणारे सुट्टीचा विचार करतात तर घरी असणारे घरच्या जबाबदाऱ्याचा..

हे सगळे विचार येणं काही चुकीचं नाहीच साहजिकच कोणाच्याही मनात हे सर्व प्रश्न उभे राहणारच..

पण फक्त प्रश्न निर्माण झाले की त्यात अडकून बसायचं आणि मनात भिती निर्माण करायची..अस बहुतेकांचे होत असते.

आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आपण दवाखान्यात जातो डॉक्टर कडे गेले की आपल्याकडे जास्त सकारात्मकता येते ती कशामुळे तर त्यांच्या सकारात्मक आणि बिनधास्त बोलण्यातून..

डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि काही पथ्य पाळा अस सांगितल तरी मनात असणारी आजाराची भिती निम्मी कमी होते…

काही महिन्यांपूर्वी अर्थात एक वर्ष आधी सुरू झालेल्या नवीन आजाराने सुद्धा असच काहीस झालंय.. मुळात हा आजार गंभीर ठरुही शकतो पण योग्य ती काळजी घेतली तर कोणताही आजार जितका भयंकर दिसतो तेवढा तो जाणवत नाही..

पूर्वीचे लोक योग्य ती काळजी घ्यायचे. म्हणजे काही सवयी त्यांच्या अगदी अंगवळणी होत्या म्हणून त्यावेळी कितीही वाईट किंवा जीवघेणा आजार जरी झाला तरी त्याला न घाबरता सामोरे जाऊन त्यातून बर होण्याची क्षमता त्या लोकांमधे होती.

बाहेरून आल की हातपाय धुणे.. रोज लवकर उठणे..वेळेत झोपणे.. बाहेरचं खाणं टाळून जास्तीत जास्त घरचा पौष्टिक आहार घेणे.. स्वतंत्र टॉवेल वापरणे.. यासारख्या अनेक चांगल्या सवयी त्यांना होत्या ज्या आपण आज पाळत आहोत.

याच सवयी जर आपल्याला आधीच असत्या तर आज जी भिती बाळगून आपण जगतोय तस न जगता आपण येणाऱ्या कोणत्याही आजाराला सामोरे जाऊन त्या आजाराला हरवून सहज त्यावर मात आपण केली असती.

आता तर सर्वच आजारांवर सहज माहिती मिळवता येते. नवनवीन सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. कोणत्याही आजाराचे निदान सहज उपलब्ध होते. जरी आपल्याला बाहेर जाऊनच प्रत्येकवेळी उपचार घ्यायला जाता येत नसले तरी त्यावर आपण घरगुती उपचार सुद्धा करू शकतो.

आज सुद्धा वेळ गेलेली नाहीच.. आपण जर आपल् शरीर उत्तम राहावं यासाठी योग्य सवयी लावल्या तर आपण सुद्धा मनातील भिती बाजूला ठेवून पुन्हा नव्याने उभ राहू शकतो.

कोरोनाच्या काळामध्ये बहुतेक मृत्यू हे या आजाराच्या असणाऱ्या भितीच्या धक्क्याने गेलेत. ज्यांना हृदयविकार आहे.. शुगर आहे अशा माणसांनी तर या आजाराच्या नावानेच धसका घेऊन जीव सोडला आहे. खरं तर इतकं घाबरून त्याची मनातली भिती वाढविण्यापेक्षा त्यावर आपण काय काळजी घेऊ शकतो..

आपल्याकडे सकारात्मकता कशी वाढेल याचा विचार करून आणि तसं वागून आपण स्वतःला सकारात्मक आणि सक्षम बनवू शकतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!