Skip to content

लग्न झालेल्या स्त्रियांना मित्र असावा की नाही ??

लग्न झालेल्या स्त्री ला मित्र असावा की नाही?


लालचंद कुंवर | ९६५७८३५७७१


नसेल तर का नको ? आणि असेल तर त्यांची मैत्री ही काय पद्धतीची असावी ? खर तर या प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांनी हैराण केलं. ..पण

शेवट पर्यंत प्रश्ने तशीच अनुत्तरित राहीली. का ? तर बायकोचा मित्र किंवा नवर्याची मैत्रीण ‘ हे नातं एखाद्या चित्रपटात, नाटकात , मालिकेत किंबहूना कथा कादंबरी मध्ये आम्ही जेव्हा अनुभवतो. तेव्हा त्यातील पात्रं एक निखळ मैत्रीचा आदर्श आपल्या पुढे ठेवत असतात . पण,

प्रत्यक्ष जीवनात असं possible असू शकतं ?

सोनल गोडबोले लिखित, ‘ बियान्ड सेक्स ‘

हि कादंबरी वाचत असतांना विजेच्या कडकडाट व्हावा तसे काही विचार कडकडाट करत मनात चमकून गेलेत. त्यातलाच एक विचार, ‘ पती पत्नीच नातं ‘

किती कांगोरे असतात ना , या नात्याला ! जेव्हा लग्ना सारख्या पवित्र बंधनात मैत्रिच्या धाग्याने पदराला साताजन्माची गाठ बांधून पती पत्नी सप्तपती घेत असतात तेव्हा पेटवलेल्या अग्नी भोवती फेरे घेत असतांना मनातील बोचत असणार एखादं शल्यं , विकार , भुतकाळातल्या नको असलेल्या आठवणी तेथेच त्या अग्नी कुंडात जाळून फिनिक्स पक्षा प्रमाणे त्या राखेतून नव दांपत्याचा नवीन जन्म व्हावा ,

जणुकाही प्रगल्भ विचारचा अंकुर त्याला संवेदनेचं जीवामृत……. !
यासारखा भुतलावरचा दुसरा स्वर्ग नाही. पण
उभ्या आयुष्यात दोन मन जर एकरूप झालीच नाहीत तर
त्या सारखा दुसरा ज्वालामुखीचा उद्रेक नाही.
सारखे च हादरे बसत राहणार आयुष्यभर !

म्हणून,

नवरा बायकोच्या नात्यात ‘ आधी दोन मन जुळलीच पाहीजेत
नाहीतर आजही अविरतपणे सुरु आहेत नवर्याकडून बायकोवर होणार बलात्कार लकलकलकक तेही समाजमान्य , कधी शरीरावर तर कधी मनावर.

मग आयुष्याच्या रंगमंचावर फक्त कर्तव्यपुर्ती म्हणून भुमिका पार पाडायची ,नवरा बायकोची या नात्याची. एकदम भावनाविरहीत पात्रचं ती… ! म्हणून कादंबरीचे एक एक पान उलगडतांना ‘ सेक्स च्या पलीकडे पाहण्याची ही दृष्टी असते ‘

जशी दृष्टी तशी स्रष्टी !

हि जाणीव सतत मनात पिंगा घालत होती.

पती पत्नी च नातं सदाहरित टवटवीत तेव्हाच राहू शकतं जेव्हा ते एकमेकांचे Best Friend असतील.

मैत्री हे असं हक्काचं व्यासपीठ आहे तिथं मनातलं गुपितं , हितगुज , द्वंद्व बिनदिक्कतपणे व्यक्त होता येतं . आणि पती पत्नी यांच्यात निकोप मैत्री चा झरा जर खळखळून वाहत असेल , मंजुळ असा आवाज येत असेल तर त्या घरासारखं या भुलोकावर दुसरं नंदनवन नाही. पण…

समजून घेणारं मनं आणि विश्वासाने कधीही डोकं टेकवता येईल असा खांदा , नवरा बायकोच्या नात्यात दुबळा ठरला
तर ……… ?

कालांतराने हाच खांदा शोधण्यासाठी तिचं किंवा त्याचं मन घिरट्या घालत असत …. आवती भवती.

भावना एकच ….. !

कोणीतरी माझी बडबड फक्त ऐकावी……

कधीतरी झालेल्या आळणी भाजी च ही कौतुक कराव…..
‘काळजी करु नको’ मी आहे ना , ….. ! हा विश्वास निर्माण करणारा कुणीतरी हक्काचा Best Buddy असावा…..

कारण’ I Love You ‘हा शब्द तसा फार फसवा पण ‘ मी आहे ना ! ‘ ह्या शब्दात खरचं खुप जादू आहे. असा एखादा जादुगार जर माझा विश्वासू , जीवाचा जीवलग असेल तर … !

तर पावसाळ्यात च नव्हे तर तिन्ही ऋतूत आकाशात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण होईल. पण दुर्दैव हेच कि … हो दुर्दैवच .. ! आजही किती वैवाहिक स्री या वैवाहिक षुरुषाबरोबर किंबहुना
वैवाहिक षुरुष हा वैवाहिक स्री बरोबर मैत्रीचं नातं मैत्रं म्हणून फुलवू शकतात… ? अगदी शेवट पर्यंत ….. !

बापरे !
वैवाहीक स्त्री-पुरुषांची मैत्री !

खरचं पुरुष प्रधान मानसिकतेचं जोखडं शतकानुशतके बायकांच्या मानेवर लादुन आणि स्वतः मी मात्र वैचारिक आणि कृतीशील समाजाचे वारसदार असा टेंभा मिरवणार्यां नवर्यांना, माझ्या अंगणी नांदतो ‘ माझ्या बायकोचा मित्र ‘ हे वास्तव कितपत रुचेल ?

नवरे मंडळी तेवढा मनाचा मोठेपणा खरच दाखवतील का ?
काही अपवाद असतीलही,
पण बाकी च्या नवरोबांच काय ?

बाकीच्यांच सोडा हो !
मी एक नवरा म्हणून , माझ्या बायकोला तिचा कोणीतरी मित्र आहे….. ! ती त्याच्याशी वाटेल तेव्हा फोनवर बोलू शकते …. ! पाहिजे तेव्हा भेटू शकते …. निसंकोचपणे फिरायला जावू शकते……. ! अगदी One night stand पर्यंत मैत्री !

खरं तर, नवरा म्हणून मी माझ्या बायकोला ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ऐवढे स्वतंत्र देवू शकतो ?

तीलाही तिचं स्व अस्तित्व आहे……. मन आहे…… भावना आहेत…….हे मान्य करु शकतो …. ?

उदार मनाने मी एक नवरा या नात्याने हे सर्व बहाल करु शकतो ?

हे वास्तव पचवता येण्यासाठी, माझी वैचारिक प्रगल्भता तेवढी निकोप निर्मळ असेल ? शंकेखोर विरहित माझी दृष्टी असेल ?

‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरी ‘

या वाक्य सारखं , मी एखाद्या वैवाहिक स्री चा मित्र म्हणून समाजात वावरतांना मला चालेल. पण माझ्या बायकोला तिचा एखादा मित्र असणं म्हणजे माझ्या आन बान शान चा प्रश्न !

नाही तर नेहमीच माझी भुमिका मात्र सर्कशीतला रिंगमास्टर सारखी !
माझ्याच तालावर बायको ने नाचावं, डोलावं ! मी ठरवेल तीच पुर्व दिशा ! अस आचरण असावं.

थोडं जरी वाकडं पाऊलं……. !
मग आहेतचं शब्दांचे आसुड तिच्या नशिबी ! पाचवीला पुजलेले …. !

कारण आजही माझा मध्यमवर्गीय समाज हा एक झापडबंद मानसिकतेत होरपळतोय. बाहेर पडण्यासाठी धडपड करतोय पण पावलोपावली का कुणास ठाऊक कसला Ego अडसर ठरतोय ?

खरं तर !
ज्या विधानाची चीड आली पाहिजे, ते वाक्य आजही अभिमानाने उच्चारलं जातं ,

‘पायतलं पायताण कसं पायातचं शोभून दिसतं ‘
अर्धांगिनी म्हणजे पायतलं पायताण !

वा रे वा !

मान्य आहे, काळ बदलत आहे…
काही बायकांचं केवळ चुल अन मुलं , ऐवढचं अस्तित्व न राहता .
पदर खोचून घराचा उंबरठा कधीच ओलांडला आहे.

To fly beyond the horizontal.
म्हणजेच, आजची स्री आकाशाला गवसणी घालतेय एवढेच नव्हे तर क्षितिजा पलीकडे भरारी ही घेतेय .पण दोर मात्र आजही पुरुषांच्याच हातात कसा राहील ?

अशी समाजाने लक्ष्मण रेषा जणूकाही आखुन ठेवली आहे तिच्या नशिबी ……. ! पण एक जळजळीत वास्तव हे ही आहे की, एकविसाव्या शतकातील शिक्षित आधुनिक स्री , मनाला भावलेली एखाद्यी गोष्ट बुध्दीच्या कसोटीवर घासून आपलीशी करण्यासाठी सामाजिक बंधन झुगारुन नवी स्वतः ची पाऊलवाट निर्माण करेल?
स्वतः च्या आवडी निवडी जपेल ?

नवराच्या संमतीसह किंवा संमतीशिवाय ! अर्थातच स्वतः चं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर किंमत ही मोजावीच लागेल….

किंबहुना आजची पत्नी क्षणोक्षणी किंमत हि मोजत आहेच म्हणा !
आणि स्री ला ही वर्षानुवर्षे चालत आलेला अनिष्ट रुढी ,परंपरा नावाच्या बोक्याशी लढायचं म्हटल्यावर बोचकारल्या जाण्याची तयारी ठेवावी लागेलच.

आजही बायकोचा मोबाईल ‘ बघू जरा ‘ या नावाखाली नवर्याकडून Whatsapp, email, call history इ. न चुकता चेक करण्यासाठी घेतला जातो. घरा घरात नाही पण

एका घरा आड , एक घर सोडून .. तर नक्कीच .
हे सत्य ही नाकारता येणार नाही.

बैलांना जसं आजुबाजुचं दिसू नये त्यासाठी मुस्क आणि झापडं बांंधली जातात अगदी त्याचप्रमाणे घरदांज , खाणदाणी या गोंडस नावाची आजही मुस्क आणि झापडं स्रियांच्या माथी मारली जातात.

मग अशा परिस्थितीत दोन वैवाहिक पुरुष , दोन वैवाहिक स्रीया एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात अगदी शोले चित्रपटातील विरु आणि जय सारखे .

पण लग्न झालेले स्री आणि पुरुष यांची मैत्री ! Non acceptable.

का ? मी का accept करु शकतं नाही ? बायकोवरच तर विश्वास नाही ना … ? का अजूनही बायकोलाच समजू शकलो नाही ?
लग्न मंडपात तर वाजतगाजत पोहचू शकलो तिला जीवनसंगीनी बनविण्यासाठी पण तीच्या ह्रदयापर्यंत हळूवारपणे अगदी अलगद का होईना अजूनही खरच पोहचता आल नाही…. ?

आणि कसातरी पोहचलोच तर ………का धृवतारा सारखं अढळ स्थान निर्माण करता आल नाही ?

का ? माझ्या बायकोला एक परपुरुष तिचा मित्र आहे हे सत्यच नवरा म्हणून मला पचवताच येत नाही .

का ? मैत्रीच्या आड त्या दोघांमध्ये तसले काही संबंध तर नसतील ना ? हा प्रश्न सतत घोंघावत असतो.

बापरे ! किती हे प्रश्न ! अक्षरशः डोकं फुटायची वेळ आली.

त्याक्षणी कादंबरीत मिराने विचारलेला एक प्रश्न खरच अंतर्मुख करुन टाकतो .

तो संवाद असा आहे,

‘” एक विचारु, राधाला मित्रं आहेत का ? आणि नसले तर तिला मित्र असलेले तुला आवडेल का ?

किती अवघड कोड्यात टाकलंस मला.

म्हणजे, नाही आवडणार तुला, हो ना ?
मग तुझी मैत्रीण तिने का स्वीकारावी .'”

शेवटी ह्या कोड्याच उत्तर कादंबरी च्या शेवटी मिराला मिळालंच.

पण , माझं काय ? खर तर , हे कोडं सोडवण्याची नवरा म्हणून तेवढी पात्रता आहे माझी ? नक्कीच नसणार. कारण मैत्री या पवित्र नात्याला जपणारे मुठभर सोडले तर खर्या चेहऱ्यावर मुखवटा चढवायचा आणि मैत्री या नात्यालाच काळिमा फासायचा आणि कुठं एखादं सावज
घावताय का , याचा शोध घेत समाजात घिरट्या घालत असतात, हे ही पाहत आलोय मी.

आणि आगीत तेल ओतावं त्याप्रमाणे कोवळ्या वयापासूनच जळण घडण ही काही अंशी तशीच झाली.

‘पर स्री मातेसमान’ ह्या पवित्र वाक्याबरोबरच ‘ पर स्री-पुरुष हे पवित्र मित्रसम ‘ का नाही बिंबवलं गेलं ..?

आजही स्री पुरुष रस्त्याने जात असतील , तर त्यांच्यातलं नात काही ही असो, पण विचार आधी मनात तसलेच येणार …. गलिच्छ !

काय म्हणावं या मानसिकतेला ! पण या मानसिकतेला जबाबदार कोण ? कोण जन्माला घालतं हि मानसिकता ? अजूनही नेमकं अचूक उत्तराच्या शोधार्थ मन भटकत आहे.

बरं..संसार थोडा स्थिरस्थावर झाल्यावर, मुलं थोडी मोठी होऊ लागल्यावर , झालीच मैत्री ! एखाद्या वैवाहिक पुरुषा बरोबर किंवा लग्न झालेल्या स्री बरोबर, तर कादंबरीतील समीर आणि मिरा यांच्यात असलेल्या मैत्री एवढा आदर ‘ मैत्रीचा ‘ करता येईल ?

क्षणभर का होईना सागरच्या मनात आलेले भाव कि मिराला घट्ट मिठीत घ्यावं, केसांतुन हात फिरवावा, आणि त्याक्षणी त्याला अंतर्मनातुन आलेली हाकेने भानावर ही आणलं कि ,

“भावा, तुला मिरा मैत्रीण म्हणून हवीय ना कायम तर आवर घाल स्वतः ला…। ”

हेच ते कसोटीचे क्षण … !

जनूकाही आपली परिक्षा पाहण्यासाठीच आयुष्यात येत असतात.
पण या क्षणी तुम्ही खरे उतरलात. मनावर विजय मिळवलात.., भावनेचा गुंता अलगदपणे सोडवलात

तर ….जन्माच सार्थक आणि मैत्री या नात्याची ही लाज राखली… !
खरच असं नातं incredible ! आणि अशी मैत्री अतुलनीय !

या भुतलावर जर कुठं मला समीर , मीरा, सागर आणि राधा हि पात्र भेटलीत तर …. कदाचित नावं वेगळी असतील पण कडकडुन गळा भेट नक्की घेईन.

लेकांनो ! खरचं नशीबवान आहात तुम्ही , तुम्हाला खर्या मैत्रीचा
अर्थ तरी कळाला. …. !

नाही तर आज समाजात असेही नर मादी आहेत…! हो , जनावरचं ती ….. ! नवरा लक्ष देत नाही…कुठे बायकोकडून दुर्लक्ष होत असत…म्हणे …… ! आमच्या शरिरीक गरजा पुर्ण होत नाही…..मग
मैत्री आणि प्रेम या गोंडस नावाखाली भावनिक जवळीक साधायची आणि संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या शरीराचे लचके तोडायचेत….. !

हि कसली मैत्री…. !
हे कसलं प्रेम ….. !

हि शुद्ध प्रतारणाच .. स्वतः शीच.किंबहुना सगळ्यांचीच !

पण निसर्गमोठा किमयागार आहे . आज जे पेरत आहेत
तेच भविष्यात समोर वाढून येणार आहे… ! जेथे पती पत्नी या नात्याची मुल्येच पायदळी तुडवली जात असतील. आणि मैत्री या नात्याला काळीमा फासला जात असेल ,

तेथे आयुष्याची काळ रात्र ठरलेलीच आहे.. ! मग संसाराची आणि परिणामी मैत्रीची होळी झालीच म्हणून समजा.

पण हेही सुर्य प्रकाशासारखं तेवढच सत्य आहे. जसे स्रीलंपट किंवा पुरुष लंपट असे वासनेच्या आहारी गेलेले मनोरुग्ण काही स्री पुरुष आहेत. तसेच वैवाहिक स्री आणि पुरुष यांचा आदर करणारे
थोर विभुतीही या समाजात आहे. खरचं They are Honourable persons!

कांदबरीतील एका वाक्याने खरचं मनाचा ठाव घेतला !

” कमाल आहे मिरा तुझी.
आजपर्यंत साडीतील बाई पाहिली की तिचा कंबर पाहणारे आम्ही.
तू आमचा दृष्टिकोनच बदललास की गं. ”

म्हणून विकारविरहीत मैत्रीचं नातं जपणारे आणि एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या पैलतीरावर संसाररुपी नौका नेनारे ! या जगाचे खरेखुरे दिपस्तंभ आहेत. अनंत अडचणी आणि वादळ वार्यांशी सामना करत … ! तेच खरे लग्न झालेल्या स्री शी आणि लग्न झालेल्या पुरुषांशी मैत्री करण्यास पात्र आहेत.

कारण इतिहास जसा हिर रांझा , लैला मजनू , रोमिओ ज्युलिएट यांसारखे शुद्ध भावनेतून मनावर प्रेम करणार्यांची नोंद घेतो

तसेच या भुलोकी जे खर्या मैत्रीचे कणभर वारसदार आहेत, त्यांची हि इतिहास आज अन उद्या नोंद नक्कीच घेईल. किंबहुना घेत ही असेल.
बियान्ड सेक्स’ या नात्याच्या …. या भावनेच्या…..

पलीकडे पाहणारे ते दुर्मिळ परिसच असतात तेच मैत्रीचं अधिराज्य गाजवतील.

एवढ्या विचारांनी मनात उलथापालथ घडवून आणली पण मी अजूनही लग्न झालेल्या स्त्रीला मित्र असावा की नाही? या निष्कर्षाप्रत ठामपणे पोहचता आलं नाही.

कारण आजही मणभर ……………
………………………………….. !



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “लग्न झालेल्या स्त्रियांना मित्र असावा की नाही ??”

  1. लालचंद कुंवर

    माझ्या लिखाणाचं आपण कौतुक केलं, एक वास्तव आपल्या समोर मांडलं.
    पुढेही असेच वास्तव वादी लेखन तुमच्या प्रेरणेने सुरु राहील.

    @ लालचंद कुंवर

  2. लालचंद कुंवर

    मी लालचंद कुंवर,
    बियान्ड सेक्स या कादंबरीवर मार्मिक विवेचन आहे

  3. खूप छान लेख आहे. पण मित्र beyond sex या नात्याच्या…भावनेच्या पलीकडे मिळणे अशक्य!! कारण त्यांची अशी 1 कल्पना असते की बाईला घरात समाधान नाही म्हणून ती मित्र शोधते!!! आणि थोडक्यात मित्र म्हणून तोसुद्धा हेच गृहीत धरुन चालतो!! त्यामुळेच निखळ मैत्री दुरापास्त असते!!

  4. Khupach analytics lekha ahe!! Pan asa mitr milan & navryani to accept karan ashaky ahe! Mitr jo beyond sex ya natyachya..bhavnechya palikade pahucha shakat nahi!! He saty ahe!!
    Tyat anakhi ek bhavna asate ki tula navra je kahi deu shakat nahi mhanun tu mazyashi maitri kar……mi te sarv karin!!!

  5. dasharth jambhulkar

    Wow very nice eyes opening story
    How I can get this book.
    Mobile number 9922968704

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!