Skip to content

घरच्या घरी दारू सोडण्याचे काही नैसर्गिक उपाय पाहूया !!

घरच्या घरी दारू सोडण्याचे काही नैसर्गिक उपाय पाहूया !!


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


दारूचे व्यसन हा एक जुनाट विकार आहे . ह्यामध्ये वारंवार आणि जास्त प्रमाणात दारू पिण्याची सवय माणसाला लागते. हे व्यसन एकदा लागले की त्यापासून त्या व्यक्तीला परावृत्त करणे फार अवघड असते.

कारणे आणि लक्षणे

दारू पिणाऱ्या माणसाचा चेहरा सुमारलेला, डोळे नेहमी लाल, तांबारलेले आणि आवाज घोगरा झालेला असतो. त्याच्या नाडीचे ठोके जलद गतीने पडतात. त्याची वागणूक संशय घेण्याजोगी असते , तर इतर लोकांना त्याचा तिरस्कार वाटतो. ही माणसे खूपच भावनाप्रधान होतात.

मधून मधून उलट्या होणे, असंबंध वागणे सवरणे, चुकीचे अंदाज आणि अस्वस्थ झोप ही मद्यपी माणसाची इतर लक्षणे आहेत. जास्त दारू प्यायल्याने त्या व्यक्तीच्या यकृतात बिघाड होतो आणि हळुहळू  ते कठीण आणि लहान होते.पोट आणि आतडीही कमजोर होतात. मेंदूच्या पेशींची हानी होते. तसेच हृदय कमकुवत होते, शिवाय त्याचा आकार वाढतो.

मुळात कधीतरी एखादा घोट पिऊन दारूची सवय जडते. हळुहळू दारूचा अंमल माणसावर चढतो आणि तो दारूशिवाय बैचेन होतो. सामाजिक दबावापुढे उच्चभ्रू मंडळींच्या वर्तुळात काही लोक दारू प्यायला सुरवात करतात. काही लोक आयुष्यातील जबाबदाऱ्या आणि ताणतणावांपासून मुक्तता मिळण्यासाठी दारू पिऊ लागतात.

उपचार

द्राक्षे :

एक महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ केवळ द्राक्षाहार घेणे हा दारूच्या व्यसनावर सर्वात महत्वाचा, घरगुती उपाय आहे. कारण द्राक्षांमध्ये अत्यंत शुद्ध स्वरूपात मद्यार्क असतो. दारूऐवजी द्राक्ष खाणे हे शरीराला पोषक तसेच ताकद देणारे आहे.

पाच तासांच्या अंतराने दिवसातून तीन वेळा ताजी द्राक्ष खावी. व्यसनी माणसाच्या दारू सोडण्याच्या इच्छाशक्तीवर या उपचार पद्धतीचे यश अवलंबून असते.

सफरचंद :

दारूच्या व्यसनावर अजून एक उपचार म्हणजे मोठ्या प्रमाणात सफरचंदे खाणे. सफरचंदामुळे व्यसनी माणसाची गुंगी उतरवली जाते. तसेच मद्य किंवा इतर अंमली पदार्थांची हाव कमी केली जाते.

खजूर :

खजूरही व्यसनी माणसाच्या उपचार पद्धतीत लाभदायक आहे. चार ते पाच खजूर बियांचा गर अर्धा पेला पाण्यात मिसळावा आणि असे पाणी दिवसातून दोनदा असे साधारणपणे महिनाभर प्यायल्याने योग्य ते बदल दिसू लागतात.

कारले :

दारूचा अंमल कमी करण्यासाठी कारल्याच्या पानांचा रस उपयोगी पडतो. व्यसनामुळे बिघडलेल्या यकृतासाठीही हा उपचार फार चांगला आहे. एक महिनाभर रोज सकाळी एक पेला ताकातून तीन चहाचे चमचे कारल्याचा रस घ्यावा.

सेलरीची ( अज्वानाची ) पाने:

दारूचे व्यसन कमी करण्यासाठी सेलरीच्या हिरव्या पानांचा रस उपयोगी पडतो. दारूचा कैफ उतरवण्यासाठी आणि दारूला प्रतिकारक म्हणून हा रस पिणे फायद्याचे ठरते. महिनाभर दिवसातून एक पेला सेलरीचा रस आणि अर्धा पेला पाणी एकत्र करून प्यावे.

आहार

व्यसनाधीन माणसाचा आहार हा शरीराच्या सर्व गरजा भागविणारा म्हणजेच पौष्टिक असला पाहिजे. त्यामुळे दारू पिण्याची तल्लफ कमी होईल. सुरवातीला पहिले दहा दिवस रोग्याला केवळ शरीर शुद्ध करण्यासाठी रसाचा आहार द्यावा.

रसपानाच्या आहारामुळे रोग्याची मद्द्य पिण्याची सवय हळुहळू कमी होईल. मद्य पिण्याची सवय मोडण्यासाठी अशा उपचार पद्धतीने केलेली सुरवात फायदेशीर ठरते. या आहारानंतर रोग्याला तृणधान्ये, मोड आलेली कडधान्ये, सूका मेवा, फळे, भाज्या असे पौष्टिक जेवण द्यावे.

सुरवातीला रोग्याची मद्य पिण्याची इच्छा जबरदस्त असते. त्यासाठी उपचार पद्धतीत मद्याला पूरक असे दुसरे पेय द्यावे. एक पेला ताज्या फळांचा रस दारूऐवजी द्यावा.

मद्य पिण्याची अनिवार इच्छा कमी करण्यासाठी रोग्याने फळांचा रस किंवा कॅंडी वा आइस्क्रिम किंवा इतर फराळाचे पदार्थ खावे. साखर, मैदा, अतिशुद्ध केलेले तांदूळ, मांस , मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत.

दोनदा किंवा तीनदा पोटभर जेवण्यापेक्षा रोग्याने दिवसातून थोड्या थोड्या वेळाने म्हणजेच जास्त वेळा थोडे थोडे खावे. भरपूर विश्रांती आणि मोकळ्या मैदानावरील शारीरिक खेळ, कवायती ही रोग्याला आवश्यक असतात.

इतर उपाय

दारूची सवय घालविण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनाची तयारी किंवा इच्छा फार महत्वाची असतेच. त्याने दारू सोडण्याचा पक्का निर्णय केला पाहिजे. टप्प्याटप्प्याने व्यसन सोडू असे म्हणणारी व्यसनी माणसे यातून बाहेर पडणं अवघड असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “घरच्या घरी दारू सोडण्याचे काही नैसर्गिक उपाय पाहूया !!”

  1. अतिशय छान माहिती मिळाली धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!