बायकोपासून चुकूनही या गोष्टी लपवू नका !!


टीम आपलं मानसशास्त्र


असे पुष्कळ प्रसंग असतात. जे पती-पत्नींना मनाने अत्यंत जवळ आणतात, तर असेही पुष्कळ प्रसंग पती-पत्नींना मनाने कायमचे दूर ढकलतात. बहुतेक गोष्टी आपल्या कळत-नकळत घडत असतात. काही वेळा आपल्या मनातही नसते, पण एखादी गोष्ट समोरच्याच्या मनात संशयाची ठिणगी निर्माण करू शकतात.

त्यामुळे अशा अनेक गोष्टी जरी आता तुम्ही कॅज्युली घेत असाल किंवा कदाचित तुम्हांला त्या गोष्टींची कल्पना सुद्धा नसेल तरीही पुढे जाऊन समोरच्या व्यक्तीच्या मनातली खदखद वाढून तुमचा वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च होणारच असतो.

Advertisement

म्हणून आत्ताच जर काही गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक अवधान दिले तर संसाराला हानी पोहोचविणाऱ्या अशा बऱ्याचशा निरर्थक गोष्टी या टाळता येतील.

१) बायकोला तिचा वेळ द्या.

आपण दिवसभर नोकरी निमित्ताने बाहेर असल्यामुळे एक गृहिणी म्हणून स्त्रियांच्या ठिकाणी घरात अशा अनेक गोष्टी घडत असतात. काही गोष्टी तिला कौतुकाने सांगायच्या असतात तर काही गोष्टी या तक्रारी स्वरूपात व्यक्त करायच्या असतात.

Advertisement

आपला नवरा सायंकाळी घरी येईन, तेव्हा मनसोक्तपणे त्याला सांगता येईल, यासाठी ती तुमची वाट पाहत असते. पण जेव्हा तिला समजते कि तुम्ही ऑफिसमधून थकलेल्या अवस्थेत आला आहेत, तेव्हा शक्यतो तिला मोकळेपणाने बोलता येत नाही. ४-५ दिवस या प्रसंगाशी तडजोड होऊ शकते.

परंतु जर व्यक्त होण्यासाठी वेळच मिळत नसल्यास तिच्या भावनांचा निचरा न होऊ शकल्याने मानसिक संघर्ष निर्माण होतो.

२) मोबाईलबद्दल ट्रान्सपरंट.

Advertisement

तुम्हाला येणाऱ्या अननोन फोन कॉल संदर्भात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच येणारे मॅसेज, फ्रेंड्स रिक्वेस्ट, व्हाट्सएप मॅसेज याबद्दल जास्तीत जास्त ट्रान्सपरंट राहणे केव्हाही उत्तम. कारण या अशा गोष्टी आहेत, ज्या कधीना कधी भांडणांमध्ये निघतच असतात.

३) बायकोसमोर मैत्रिणीचं कौतुक नको.

आपल्या मनातही नसेल अशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बायकोसमोर कोणत्याही मैत्रिणींचं भलंमोठं कौतुक करू नका. तुम्ही कौतुक सामान्यपणे करत असाल पण समोरच्या घेणाऱ्या व्यक्तीने ती गोष्ट सामान्यपणे घ्याल हवी. पुष्कळ वेळ या गोष्टी ऐकल्याने एक प्रकारची तुलना घडून येण्याची शक्यता जास्त असते.

Advertisement

४) व्यवहार लपवू नका.

तुमच्याठिकाणी असणारं उत्पन्नाचं साधन, तुम्हाला मिळणारं वेतन किंवा तुमची काम करण्याची पद्धत याबद्दल तुम्ही मोकळेपणाने बायकोसोबत चर्चा घडवून आणू शकता. कदाचित तुमचा ताण रिलॅक्स होऊन नवनवीन कल्पना मिळू शकतील आणि बायकोसोबत गप्पा मारल्याने तुम्हाला सुद्धा मन हलकं झाल्यासारखे वाटेल.

५) ऑफिसच्या वेळा लपवू नका.

Advertisement

काहींच्या नोकरीच्या वेळा या ठरलेल्या असतात तर काहींच्या वेळेत अनिश्चितता असते. याबद्दल तुम्ही सुद्धा बायकोकडे सर्व चित्र वेळोवेळी स्पष्ट करायला हवेत. तिच्या मनात काहीतरी येऊ नये म्हणून नव्हे तर एक शेअरिंगचा पार्ट म्हणून सुद्धा तुम्ही तिला सांगू शकता.

६) बायकोला समजून घ्या.

तुम्ही बायकोला त्याप्रमाणे समजून घेत असालच. पण ज्या-ज्या वेळी ती आधीसारखं बोलत नसेल, वागत नसेल किंवा चेहऱ्यावरची स्मित हरवली असेल तर त्या क्षणी तिला सगळ्यात जास्त तुमची गरज असते. ती वेळच महत्वाची असते. त्या वेळेत वेळ काढून तुम्ही तिला वेळ द्यायला हवा.

Advertisement

७) गुपित ठेऊ नका.

बायको म्हटलं कि ती आपली अर्धांगिनी असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट गुपीत ठेवण्यापेक्षा ती सांगत चला. एखादी गोष्ट जेव्हा आपण गुपित ठेवतो आणि तीच गोष्ट जेव्हा काही दिवसांनी अचानक समजते तेव्हा ते संशयाचे एक कारण बनते.

वरील नमूद केलेल्या याच बाबी स्त्रियांनीसुद्धा आपल्या नवऱ्याबाबतीत लक्षात घ्यावा.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.