विवाहित स्त्री वा विवाहित पुरुष यांच्यातील मैत्री : एक दृष्टिक्षेप


सौ. भारती गाडगिलवार


साधारणपणे ८० ते ९० च्या दशकापर्यंत स्त्रीयांची पुरुषां सोबत मैत्री म्हटले की, लोकांच्या भुवया ताणल्या जायच्या. अशी मैत्री केवळ चित्रपट किंवा दुरदर्शन वरील मालिकेतच चांगली वाटायची. आज काळ बदलला आहे, प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर आहे.

अशावेळेस पुरुषांशी कोणत्या न कोणत्या संदर्भात संपर्क येतोच. नोकरी, व्यवसाय निमित्ताने स्त्री पुरुषांमध्ये संवाद घडतात. परंतु संवादापलिकडे जर त्यांच्यात मैत्री असेल तर आजही या विषयावर मतमतांतरे आहेत.

Advertisement

काही व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमात तर मुलींची संख्या अगदीच बोटावर मोजण्या इतकीच असते. उदा. सिविल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग. काही लोकं लग्नानंतर शिक्षण पूर्ण करतात. यात प्रामुख्याने स्त्रीयांचा समावेश होतो.

अभ्यासक्रम किचकट स्वरुपाचा असल्याने मित्रांची गरज पडतेच. काही घरांमध्ये आधुनिक विचारांमुळे अशी मैत्री मान्य केली जाते. परंतू काही घरात विवाहित पुरुष वा स्त्रीयांशी मैत्री आहे ही बाब लपवली जाते.

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा गरजेपुरती असलेली ओळख म्हणजेच मैत्री ही परिभाषा असते मैत्रीची. असे चित्र असण्याचे कारणही तसेच आहे. पुर्वी पासूनच स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा ‘एक उपभोगाची वस्तू’ असा राहिला आहे. समाज कोणताही असो प्रगत वा अप्रगत स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन कायम तसाच. यात सध्याच्या काळात बदल होताना दिसतो आहे.

Advertisement

आजच्या या आधुनिक काळात स्त्रीया देखील पुरुषांना फसवण्यात, त्यांचा फायदा घेण्यात अग्रेसर आहेत. आपल्या सौंदर्याने भुरळ घालत पुरुषांना आकर्षित करणे, नंतर त्यांची संपत्ती हस्तगत करणे यामुळे आता स्त्री ही सोशिक आहे ही संकल्पना अंशतः बदलत आहे.

हे देखील सत्य आहे की, काही मोजक्या लोकांच्या वागण्याने संपूर्ण स्त्री वा पुरुष जातीला गालबोट लागले आहे.

यात सर्वात महत्वाची भूमिका बजावते, ते म्हणजे आपली चित्रपट सृष्टी आणि दूरदर्शन वरील मालिका.

Advertisement

चित्रपट सृष्टी ही लोकांच्या मनोरंजनासाठी आहे हा विचार आता कालबाह्य होत आहे. चित्रपटातील सर्वच कथानक काल्पनिक असते असे नाही काहींना सत्याची झालर देखील असतेच. परंतू चित्रपटाचा अधिकाधिक खप व्हावा, अधिक कमाई व्हावी या हेतूने त्यात बिभत्सपणा, स्त्रीयांची अगतिकता, हिंसक वृत्ती, स्त्रीयांसाठी असलेला दृष्टीकोन व्यापक स्वरुपात दाखवला जातो.

स्त्रीयां सोबतच पुरुषांच्याही स्वभावाच्या छटा दाखवल्या जातात. या सर्वांचा चित्रपटांच्या प्रेक्षक वर्गावर देखील प्रभाव पडतोच.
क्राईम पट्रोल, सावधान इंडिया सारख्या टि.व्ही. मालिका या सत्य घटनेवर आधारित आहे. यात हेच दाखविले जाते की, नवऱ्याचा मित्र वा पत्नीचा मित्र, बाॅस कशी एकमेकांची फसवणूक करतात. अशा कार्यक्रमातून सावध होण्याचे संकेत दिले जाते.

आता आणखी पुढचा प्रकार म्हणजे सोशल मिडिया वरील फेसबुकवर असलेली मैत्री होय. फेसबुकवर अनेक ग्रुप उदयाला आले आहेत. या ग्रुपचा उद्देश म्हणजे ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हा आहे. विविध ग्रुपमध्ये सक्रिय असलेल्या लोकांच्या पोस्ट वरुन किंवा त्यांच्या प्रोफाईल फोटो वरुन अनेक लोकं आपापसात मित्र होतात. प्रोफाईल फोटो वरुन ती व्यक्ती विवाहित आहे किंवा नाही हे लक्षात येत नाही.

Advertisement

काही स्त्रीया व पुरुष देखील एकमेकांना friend request पाठवतात. त्या स्विकारल्या जातात. त्यानंतरचा टप्पा म्हणजे आपापसांतील मेसेजेस मधून होणारा संवाद होय. यातून सुरु झालेला संवाद सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यावरून व्यक्तीगत बाबींवर होऊ लागतो.

काही स्त्रीया किंवा काही पुरुष देखील बोलणे झाले की, त्यांच्यातील संवाद डिलिट करतात. परंतू समोरचा देखील डिलिट करेलच असे नाही. त्या संवादाच्या आधारावर तो किंवा ती एकमेकांना ब्लॅकमेल देखील करु शकतात. हा प्रकार सायबर क्राईम मध्ये मोडतो.

म्हणूनच समाज कितीही प्रगत झाला तरीही मानवी विकृतीत बदल होणे सहज शक्य नाही. फरक इतकाच आहे की, पुर्वी फक्त स्त्रीयांचे शोषण होत होते आता पुरुषांचे देखील होत आहेत.

Advertisement

पुर्वी आणि आजही स्त्रीया हळव्या समजल्या जातात. परंतू आज अनेक पुरुषांची उदाहरणे समाजात दिसून येत आहेत ज्यांना स्त्रीयांमुळे त्रास सहन करावा लागला आहे.

सारांश असा की, मैत्री सारखी पवित्र भावना डागाळते आहे. मैत्रीला देखील मर्यादा असायलाच हव्यात मग ती स्त्री असो की पुरुष!!

Advertisement

2 Replies to “विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुष यांच्यातील मैत्री !

Leave a Reply

Your email address will not be published.