‘हृदयविकार’ यावर घरबसल्या नैसर्गिक उपचार.
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ज्ञ)
आधुनिक जगामध्ये झपाट्याने वाढलेला हा आजार आहे. हृदयाकडील रक्तवाहिनी कडक आणि अरुंद होते. त्यामुळे रक्ताची गाठ बनते व ती रक्तवाहिनीत अडकून रक्तप्रवाह बंद होतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयस्नायू मृत होऊन हृदयक्रिया बंद होते आणि माणसाचा मृत्यू ओढवतो.
या हृदयाच्या सर्व प्रकारच्या आजारांना वैद्यकीय संज्ञेत ‘अंजायना पेक्ट्रोरीस’, कोरोनरी थ्रोम्बोसिस’ या हृद्रोग असे म्हटले जाते.
यामागची कारणे आणि लक्षणे काय ?
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे श्वास अडकल्यासारखा होतो. छातीत कळ येते ती खांद्यापर्यंत जाते. छातीत धडधडते, चक्कर येते, मानसिक अस्वस्थता वाटते, हात-पाय गार पडतात, खूप घाम येतो. थकवा जाणवतो.
चुकीची आहार-विहार पद्धती आणि तऱ्हेतऱ्हेचे ताणतणाव या कारणांनी हृदयरोग होतो. मॅसॅच्युसेट्स येथी नॅशनल ‘हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूट’ च्या सुविख्यात ‘फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडी’ मध्ये हृदयविकाराची सात महत्वाची कारणे सांगितली आहेत.
१) कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराईड्स आणि इतर मेदयुक्त पदार्थ यांनी रक्तवाहिन्या अरुंद होणे.
२) उच्च रक्तदाब
३) रक्तातील युरिक आम्लाची वाढलेली पातळी.
४) मधुमेहासारखे आजार.
५) लठ्ठपणा.
६) धूम्रपान.
७) व्यायामाचा अभाव.
या प्रत्येक कारणांमुळे किंवा दोन-तीन कारणांचा एकत्रित परिणाम होऊन हृदयविकार होतो. यातील वारीचं कारणे आपल्या आहाराशी निगडित आहेत. सतत काळजी आणि ती वाढवणारे विचार करण्यामुळे अड्रेनल ग्रंथींना जास्त प्रमाणात अड्रेनलाईन आणि कोर्टिसोन हि द्रव्ये स्रवावी लागतात. त्याचा परिणाम होऊन रक्तवाहिन्या संकुचित होतात. रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे काम वाढते.
यावर उपचार काय आहेत ?
रुग्णाने काही दिवस द्राक्षे खाल्ल्याने किंवा द्राक्षांचा रस प्यायल्याने हृदयविकार नियंत्रणाखाली आणता येतो. छातीतील वेदना आणि हृदयाचे धडधडणे कमी करण्यासाठी द्राक्षे उत्तम गुणकारी आहेत.
द्राक्षांमुळे हृदयाची स्थिती पूर्ववत करता येते. एखादी व्यक्ती हृदयविकाराने आजारी असेल तर तिला द्राक्षांचा रस जरूर पाजावा.
सफरचंद :
हृदयाचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असणारे घटक सफरचंदात आहेत. हृदयाचे काम क्षीण झालेल्या व्यक्तीने भरपूर सफरचंदे आणि त्यापासून बनविलेला जॅम खावा.
आवळा :
आवळा हे फळ फार गुणकारी आहे. शरीरातील सर्व संस्थांचे कार्य उत्तम रीतीने चालविण्यासाठी आवळा जरूर खावा. हृद्यविकारामध्ये गेलेली ताकद त्याने परत येते. तसेच शरीरात तयार झालेले विभिन्न अनिष्ट पदार्थ आवळ्यामुळे नष्ट केले जातात.
आवळ्यांचा हंगाम असताना रोज एक मध्यम आकाराचा आवळा थोड्या मिठाबरोबर खावा. इतर वेळी आवळ्याचे वळविलेले तुकडे किंवा आवळा सुपारी चघळावी.
कांदा :
कांद्यामुळे रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे विघटन होते आणि रक्तातील त्याची पातळी सर्वसाधारण होते. हृदयविकारात अनशेपोटी कच्च्या कांद्याचा एक चमचा रस प्यावा. उपयुक्त ठरतो.
मध :
सर्व प्रकारच्या हृदयरोगांवर मध फार बहुगुणी आहे. मधामुळे हृदयाची स्थिती सुधारते आणि रक्ताभिसरणही चांगले होते. मधामुळे हृदयातील वेदना आणि हृदयाची धडधड हि कमी होतात. जेवणानंतर रोज एक चमचा मध खावा.
शतावरी :
हा भाजीचा प्रकार हृदयमजबुतीला अतिशय उपयुक्त आहे. या भाजीचा रस आणि मध यांचे अनुक्रमे दोनास एक या प्रमाणात मिश्रण करून दरवेळी एक चमचा याप्रमाणे दिवसातून तीनदा ते घ्यावे. याची वाफवलेली भाजीही हृद्रोगावर गुणकारी आहे.
हृदयाची ताकद वाढवणारी हि वनस्पती आहे. हृद्य कमकुवत झालेल्या किंवा हृदयाचा आकार वाढलेल्या रुग्णांसाठी शतावरीचा ताजा रस दोन चमचे आणि मध एक चमचा एकत्र करून हे मिश्रण दिवसातून तीनदा असे काही दिवस घ्यावे. शतावरी वनस्पती वाफेवर शिजवून खाल्ल्यानेही उपयोग होतो.
लसूणपात :
रक्तवाहिन्या आणि हृदयविकार यांच्याशी निगडित असलेल्या बऱ्याच त्रासांवर लसूणपातीचा रस उपयुक्त आहे. हा रस फार तीव्र असतो. त्यासाठी लसूणपतीचा रस पाऊण कप आणि तेवढाच गाजराचा रस एकत्र करून रोज दोनदा प्यावा. दोन्ही रसांच्या मिश्रणात प्रत्येक रसाचे असणारे विशेष गुणधर्म पुष्कळ उपयोगी पडतात.
करडई तेल :
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यासाठी करडई तेलाचा वापर करावा. हृद्यासंबंधीचा तक्रारी असणाऱ्या व्यक्तींनी करडई तेलाचा जास्त प्रमाणात उपयोग करावा. करडई पासून बनविलेले ‘सॅफ्लोक्सीन-सिप्ला’ या नावाचे बाजारात मिळणारे तेल उच्च रक्तदाब बी हृदयविकार यांवर नेहमी वापरतात.
ई जीवनसत्व :
या जीवनसत्वामुळे शरीरातील पेशींचा ऑक्सिजनशी संयोग वाढतो. त्यासाठी हृदयविकाराच्या रुग्णांनी ई जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचे आहारातील प्रमाण वाढवावे. हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. रक्ताभिसरण आणि स्नायूंची ताकद वाढते. कोंडायुक्त धान्यपीठे, हिरव्या पालेभाज्या, कोबीची विशेषत्वाने बाहेरची पाने यांत हे जीवनसत्वे भरपूर असते.
क जीवनसत्व :
काही वेळा सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील भितींना अचानक भगदाड पडून हार्ट अटॅक येतो. यावर उपचार म्हणू क जीवनसत्व उपयोगी पडते. या जीवनसत्वामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणाखाली राहते.
राग, भीती, निराशा या भावनांमधून आलेल्या ताणामुळे रक्तातील मेद आणि कोलेस्टेरॉल यांची पातळी अचानक वाढते. परंतु शरीरात पुरेसे क जीवनसत्व आणि पँटोथिनिक आम्ल असेल तर त्याचे हृदयावर कमी दुष्परिणाम होतात. संत्री, मोसंबी, लिंबू हि क जीवनसत्त्वयुक्त फळे यावर मुद्दाम खावी.
आहारात काय घावे ?
हृदयविकाराच्या रुग्णाचा आहार कमी उष्मांकांचा आणि दुधयुक्त, शाकाहारी असावा. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. पूर्णांश धान्ये, कडधान्ये, ताजी फळे आणि भाज्या सुद्धा खावेत.
मैदाचे पदार्थ, चॉकलेट, मिठाई, शीत पेये, डबाबंद पदार्थ व रस, मांसाहारी पदार्थ, लोणी, साय हि टाळावी. चहा, कॉफी, मद्य, तंबाखू हि वर्ज्य करावी. आहारातून मीठ आणि साखर यांचे प्रमाण हळूहळू कमी करावे.
इतर उपाय पाहूया..
रुग्णाने आपली तब्येत सुधारण्यासाठी माफक व्यायाम करावा. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्यावी.



Excellent article giving detailed information about heart disease