Skip to content

नसतेस घरी तू जेंव्हा….

नसतेस घरी तू जेंव्हा..


सौ.सीमा ऋषिकेश मराठे


रोजच्याप्रमाणे सकाळी सहा वाजता गजर झाला,सायली लगेच उठली,फ्रेश झाली आणि आपल्या कामाला लागली..गॅसवर तिने दूध तापत ठेवले..आणि तन्वी ला उठवायला गेली..ठीक आठ वाजता तिची स्कूल बस येणार होती..तिच्या कलेकलेने घेत तिला शाळेत जाण्यासठी तयर करायचं होतं..सायली ने तिला छान तयार करून शाळेत पाठवले…
तोपर्यंत इकडे पराग उठून आपली ऑफिस ला जायची तयारी करत होता..सायली ने पराग साठी पोळी भाजी चा डबा केला..नाष्यासाठी उपमा केला होता..दोघांनी मिळून छान नाश्ता केला..आणि ९ वाजता पराग ऑफिस ला गेला…

आता निवांतपणे सायली सोफ्यावर बसून आपला मोबाईल चेक करू लागली.. मोबाईलमध्ये तिच्या लाडक्या मैत्रिणीचा ,नितूच msg दिसला..खूप दिवसात तिचे आणि नीतू च बोलंच झालं नव्हत..जवळपास चार पाच वर्षात त्या दोघी भेटल्या देखील नव्हत्या..बराच वेळ दोघींचे चॅट झाले..नितुने सायलीला फोन च केला..नीतू चा गोड आवाज ऐकून सायलीला खूप छान वाटल..नीतू दोन दिवसांसाठी तिच्या soc.मधल्या मैत्रिणींसोबत ट्रीपला जाणार होती..तू ही आम्हाला join होशील का असे नितुने सायलीला विचारले..परंतु आपण गेल्यावर पराग आणि तन्वी चे कसे होणार? पराग एकटा सर्व कसे करेल याचे विचार तिच्या डोक्यात आले..पराग ऑफिस मधून आला की त्याला विचारून सांगते असे सायलिने नितुला सांगितलं…

संध्याकाळी पराग ऑफिस मधून आला रात्रीचं जेवण झाल्यावर सायली ने आपल्या मैत्रिणीचा फोन आला होता..तिने नितुच विषय काढला..आज खूप दिवसांनी तिचा फोन आला..आम्ही खूप गप्पा मारल्या.असे ती त्याला सांगत होती..तिची अशी इच्छा आहे की मी तिच्या सोबत दोन दिवस ट्रीपला जावं..मी जाऊ का रे? असे तिने पराग ला विचारलं..पराग म्हणाला,अग त्यात विचारायचं काय..बिनधास्त जा..घरचे मी बघेन..तन्वी पण म्हणाली,आई तू जरूर जा ट्रीपला..तुलाही थोडा बदल होईल..सायलीला खूप आनंद झाला..तिने लगेच नितुला मी ट्रीपला येते असे कळविले..
दोन दिवसांनी ठरल्याप्रमाणे सायली रात्री ची बसने ट्रीपला गेली..
पहाटे नेहमी सारखा गजर झाला..तो बंद करून परगचा पुन्हा एकदा डोळा लागला..आणि एकदम त्याला जाग आली तेव्हा सात वाजले होते..बापरे!!!आज सायली घरी नाही आपल्याला सर्व करायचं आहे..त्याने गॅसवर दूध तापत ठेवले होते..आणि तन्वी चे दप्तर भरायला घेतले..तोपर्यंत इकडे दूध उतू गेलं होतं..अरे देवा!!! मग त्यानं तन्वी चे दोन बो बांधायला घेतले..त्याने ते कसे बसे बांधले.. तनविला डब्यात देण्यासाठी सँडविच ची तयारी करू लागला..’ बाबा मला टोमॅटो हवा काकडी नको असे फर्मान तन्वी ने सोडले..आणि त्यावर चीज खिसून घाला..

सायली तन्वी चे कसे हट्ट पुरवते हे आज पराग ला समजले..दोन सँडविच आणि केक असे पराग ने तन्वी ला डब्यात दिले..तिची waterbag भरली..बूट घातले..तेवढ्यात स्कूल बस आलीच..बसमध्ये बसल्यावर तन्वी ने आपण icard विसरलो आहोत असे तिच्या बाबांना सांगितलं..पराग ने धावत जाऊन तिला ते आणून दिले..

एकंदर सायली घरी नसताना परगची खूप धांदल उडाली होती..
स्वतःचं आवरून तो ऑफिसमध्ये जायला निघाला.. हातात रुमाल मोबाईल द्यायला आज सायली घरी नसताना..तिची अनुपस्थती त्याला पदोपदी जाणवत होती..तो सायली ला खूप miss कर त होता…

तन्वी ची शाळा सुटली तिने शेजारच्या काकू कडून किल्ली घेतली आणि आपल्या घरी येऊन बसली..आज शाळेत काय काय मज्जा केली हे विचारायला आज आपली आई घरी नव्हती..म्हणून तन्वी ख्ट्टु झाली..
रात्री पराग ऑफिस मधून आला.आल्यावर लगेच त्याने मुगाची खिचडी करण्याचा प्लॅन केला..आणि खिचडी केली..जेवायला बसल्यावर खिचडीत पाणी जास्त झाले होते..तन्वी म्हणाली बाबा ही तर पेज च झालीय..पराग ला खूप वाईट वाटले..दोन दिवस सुध्धा आपण सायली शिवाय काढू शकत नाही हे त्याला चांगलच जाणवलं..

घराची संपूर्ण जबाबदारी सायली किती यशस्वीपणे पार पाडते हे पराग ला उमगले..तन्वी ला उत्तम रित्या सांभाळते..तिचे हट्ट पुरवते..तिला हवे नको ते बघते..दोन दिवस पराग ला सायलिशिवय खूप उदास वाटत होते..
दोन दिवसांनी सायली ट्रीप वरून आली..आल्यावर तन्वी ने तिला गच्च मिठी मारली..आणि म्हणाली,आई तुझी खूप आठवण येत होती ग….
पराग ला तिला पाहून सलील कुलकर्णी चे गाणे आठवले..
” नसतेस घरी तू जेंव्हा,जीव तुटका तुटका होतो…
जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!