तुम्ही ताणामध्ये जगताय का ?? हा लेख वाचून ओळखा.
टीम आपलं मानसशास्त्र
सध्याच्या जगात प्रत्येकाला अनुभवास येणारी अशी बाब म्हणजे ताण. मग तो विद्यार्थी असो, कॉर्पोरेट व्यावसायिक असो किंवा गृहिणी असो, सर्वांच्या मुखी एकाच शब्द सातत्याने दिसून येतो, तो म्हणजे, ‘मला खूप ताण आल्यासारखं वाटत आहे.’
ताण हि खरोखरच मनाची एक अवस्था आहे कि परिस्थिती लोक आणि त्यांचे काम यांनी आणीत पद्धतीने हाताळता न आल्याने परिणाम आहे ? खरेच ताण काय आहे ?
प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण खोलवर विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल कि ती एक मानसिक अवस्था आहे. परिस्थिती अथवा घटनांमुळे ताण येत नाही, तर तो आपला आपण आतमध्ये तयार करतो. ताणाचा जन्मच मुली आपल्या स्वतःमुळे होत असतो.
♦ एखादी गोष्ट करण्यास सक्षम न ठरल्याने अथवा एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसल्याने नैराश्य जन्म घेते.
♦ एखादी जबाबदारी किंवा प्रेरणा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाचा किंवा धाडसाचा अभाव कारणीभूत असतो.
♦ पुरेसे ज्ञान नसणे.
♦ सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्या ऊर्जेचे असंतुलन आणि विसंवाद.
याच गोष्टी जर तुम्ही उलट करून पाहिल्यात, तर तुम्हाला निश्चितपणे एका स्तब्धतेची, आंतरिक शांततेची आणि चिंतारहित अवस्थेची अनुभूती येईल. म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला कामाच्या ठिकाणी, घरी अथवा कोणाकडूनही कोणतीही जबाबदारी सोपवली जाईल, जेव्हा बाहेर किंवा मनामध्ये तुमची नावड, इच्छा नसल्याची भावना तातडीने उघडपणे व्यक्त करू नका.
सकारात्मक आणि आनंदी रहा. तुम्हाला लक्षात येईल कि तुमचे ध्येय तुम्ही शून्य ताण घेऊन देखील यशस्वी रीतीने पार केलेले आहे.
तुम्हाला दिलेली जबाबदारी किंवा तुमच्यासमोर असणारी परिस्थिती यांना थेट भिडा. जणू काही तिच्या डोळ्यातच डोळे घालून पहा. मग त्याची तीव्रता कमी होत जाऊन ती निष्प्रभ होईल.
तुम्हाला तुमचे ध्येय साधण्यासाठी सकारात्मक इच्छाशक्ती निश्चितपणे मदत करेल. तुमच्या मर्यादांवर मात करण्यासाठी तुमची सारी शक्ती पणाला लावा, त्यातून तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्यानंतरच तुम्हाला प्रगाढ अशा आंतरिक शांततेचा, स्वातंत्र्याचा आणि आनंदाचा अनुभव येईल.
कोणतीही परिस्थिती, कृती किंवा व्यक्ती यांमध्ये अडकून पडू नका. प्रेमाने त्यातून मुक्त व्हा. बहुतांश वेळेस ऊर्जेचे असंतुलन हे ताणाचे खरे कारण असते. त्यातूनच पुढे अस्वस्थता जन्म घेते.
सध्याच्या धकाधकीच्या या जीवनात प्रत्येक माणसाला व्यावसायिक स्तरावर असो अथवा व्यक्तिगत स्तरावर असो कुटुंब मित्रांसमवेत वेळ घालवणे, सामाजिक क्षेत्रात रमणे, एखादा छंद जोपासणे यांसारख्या बाबींमध्ये संतुलन राखता येणे आणि सुसंवाद राखता येणे फार महत्वाचे आहे.
सातत्याने आत्मपरीक्षण करत रहावे. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये त्यातील सातत्याने बदलणाऱ्या गरजांमध्ये आणि आव्हानांमध्ये इतके गुरफटून गेलेलो असतो कि, आपणच आपल्याही नकळतपणे ताणाला आपल्या सुप्त मनामध्ये घर करण्यासाठी हक्काची जागा देऊन टाकतो.
तुम्ही तुमचे आयुष्य खरोखरच ताणयुक्त किंवा ताणमुक्त जगताय हे समजून घेण्यासाठी खालील प्रयोग करून पहा. तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल.
सकाळी जाग आल्यानंतर तुमच्या पलंगावर दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसा. तुमचे विचार आणि श्वास यांचे निरीक्षण करा. तुमच्या श्वासाची गती कशी आहे ? ती शांत आणि सामान्य स्वरूपाची आहे का ? जर असेल तर तुमच्यासमोर असणारी करायची विविध कामे, त्याच्या डेडलाईन्स आणि व्यक्तिगत बाबींचा विचार सुरु करा.
आणि जर आक्रमक पद्धतीने तुम्ही तुमच्या मनात प्रतिक्रिया देत नसाल तर आंतरिक स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने सुसंवाद आणि ताणमुक्त अशी अवस्था आहे, असे समजायला हरकत नाही.
परंतु तुमचा अनुभव यापेक्षा वेगही असू शकेल. तुमची नोकरी, दिवसभरातील कामांची यादी, कालमर्यादा आणि इतर व्यक्तिगत मुद्दे यांनी तुम्ही जेव्हा मनामध्ये अस्वस्थ होत असाल आणि जर अवघी दहा मिनिटदेखील तुम्ही त्याठिकाणी शांतपणे स्वस्थ बसू शकत नसाल, तर निश्चितपणे ताण तुमच्या मनावर आरूढ होऊन बसला आहे, असे समजायला हरकत नाही.
निरोगी आणि ताणमुक्त अशा आयुष्यासाठी मनाची अवस्था ही सर्वात महत्वाची आहे. सकाळी जाग आल्यानंतर दररोज श्वासाचे काही व्यायाम नियमितपणे केल्यानंतर ते सध्या होऊ शकते.
प्राणायामाची चार किंवा पाच आवर्तने तुम्हाला संपूर्ण दिवसभरासाठी प्रसन्न, सतर्क आणि लक्ष्यकेंद्री ठेवण्यासाठी मदत करतील.
प्राणायाम, ध्यान आणि योग्य हे सारे ताण कमी करण्यासाठी अगदी मुळाशी जाऊन प्रयत्न करतात आणि त्याद्वारे तुमच्या कामाची क्षमता वृद्धिंगत होत जाते. कामावर लक्ष केंद्रित होऊन आणि एकाग्रता सध्या होऊन आपण दिवसभर ताजेतवाने राहू शकतो.
दिवस उजाडण्यापूर्वी शांतपणे एका ठिकाणी बसून रहा. तुमच्या जाणिवा आणि सर्व प्रकारचे विचार शांत झाल्यावर ध्यान करायला सुरुवात करा. तुम्हाला एका उच्च समाधानी मानसिक अवस्थेत पोहोचण्यास मदत मिळेल.



प्राणायाम व योग याचे कोणते प्रकार करायचे मंजे फायदा होईल