Skip to content

पती-पत्नीने पैशांच्या मुद्यांवर एकमेकांशी बोलायला हवं !!

पती-पत्नीने पैशाच्या मुद्यावर एकमेकांशी बोलायला हवं !!


टीम आपलं मानसशास्त्र


सामान्यतः पती-पत्नींना परस्परांच्या छोट्या-मोठ्या गोष्टी माहित असतात. एवढेच नव्हे, तर परस्परांची मेडिकल हिस्ट्रीही माहित असते, पण आर्थिक बाबतीत किती माहिती असते ?

जर याबद्दल संशोधन केल्यास आजही पुष्कळ पुरुष आपल्या भविष्यासाठी एक सेफ्टी म्हणून कोणाच्याही नकळत बँकमध्ये एफडी असेल, एखादी घेतलेली प्रॉपर्टी असेल किंवा मुच्युअल फंड असेल, अशा ठिकाणी छुप्या पद्धतीने पैसे गुंतवत असतात.

अगदी त्याच प्रमाणे महिला सुद्धा आर्थिकतेबद्दल आपल्या पतीशी मोकळ्या पद्धतीने संवाद साधत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो कि कुटुंबाला कोणत्या आर्थिक विकासाच्या दिशेने आणि गतीने घेऊन जायचे आहे याबद्दल मनमोकळ्या चर्चा होत नाहीत.

कदाचित जगातील ७८ टक्के लोक आर्थिक बाबींव्यतिरिक्त एकमेकांशी दिवसभराच्या निरर्थक गोष्टीच बोलत असतात. उत्तम नात्यासाठी आर्थिक मुद्यांवर बोलणे का आवश्यक आहे ते जाणून घेऊया..

गैरसमज व भांडणे टाळता येतात :

आपला जोडीदार पैसा कसा सांभाळतो व वापरतो, हि व्यावहारिक गोष्ट समजून घेऊन अनेक गैरसमज व भांडण टाळता येऊ शकतात. आर्थिकतेबद्दल मागासलेपण असणे किंवा त्याबद्दल जोडीदाराशी किंवा अत्यंत जवळच्या लोकांशी मनमोकळेपणाने न बोलता येणे हे भांडणाचे आणि घटस्फोटाचे खूप मोठे कारण आहे.

प्रत्येकाला याविषयी बोलण्याची गरज वाटत नाही. कारण पैशासंबंधित जे काही व्यवहार असतील किंवा जो काही खर्च करण्याची आणि करायला लावण्याची प्रक्रिया आहे याबद्दल आपणच मुख्य असल्याने कित्येकांना या उलाढालींबद्दल कशासाठी बोलायचं हा एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो.

२०१८ मध्ये झालेल्या एका अध्ययनानुसार दोघांपैकी जी व्यक्ती आर्थिक जबाबदारी घेत असते किंवा पूर्ण आर्थिक व्यवस्था पाहत असते ती बदलत्या काळासोबत आणखीन प्रोफेशनल होत जाते.

त्याचप्रमाणे दुसरी व्यक्ती जिने पूर्ण जबाबदारी सोडलेली असते, त्या व्यक्तीची आर्थिक योग्यता कमकुवत होऊ लागते. त्यामुळे आर्थिक जीवनाबद्दल ती व्यक्ती परावलंबित्व स्वीकारते.

अशा स्थिती जर ब्रेकअप किंवा घटस्फोटाची वेळ आली किंवा अकाली निधन झाले तर जोडीदाराची स्थिती पूर्ण बिघडून जाते. तसेच आर्थिक वा मानसिक कमकुवतपणा आल्यामुळे आणि दिवसभराची वेळ रिकामी असल्यामुळे अनेक नकारार्थी विचार त्या व्यक्तीला छळण्याची शक्यता वाढते.

ज्याचा परिणाम हा केवळ तिलाच होत नसून तर आपल्याही अंगलट येऊ शकते.

एकमेकांमधील विश्वास वाढतो :

आपल्या आर्थिकतेबद्दल जितके आपण आपल्या जोडीदाराशी योग्य पद्धतीने संवाद साधू तर त्याचे दूरगामी फायदे सुद्धा आहेत. आर्थिक बाबी एकमेकांशी बोलल्यामुळे परस्परांमधील विश्वास कायम राहण्यास आणि टिकण्यास मदत मिळते.

नात्यांमध्ये सहयोग व आत्मीयता वाढते. आपण आपल्या जोडीदाराला खालील हे ३ प्रश्न विचारायला हवेत, याउलट आपण सुद्धा आपल्या जोडीदाराला या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत.

१) आपल्या कुटुंबाचे दीर्घकालीन आर्थिक ध्येय नेमके काय आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाला नेमकं कोणत्या आर्थिक स्टेटस पर्यंत न्यायचे आहे. आपली पुढची आर्थिक आव्हाने कोणती ? त्यासाठी पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं ?

२) आपण आपले आर्थिक यश कसे मोजू शकतो ? म्हणजे आपल्याकडे आपल्या नावाचं घर आहे म्हणून, आपल्याकडे कार आहे म्हणून कि आपल्या मूलभूत गरज भागात आहेत म्हणून आपण आर्थिकतेबद्दल समाधानी आहोत, याची स्पष्ट व्याख्या एकमेकांना विचारून पुढे मार्गक्रमण करता येते.

३) आपल्याकडे सध्या मोजून आपली किती प्रॉपर्टी आहे आणि किती बॅंकबॅलन्स आहे ? जेणेकरून आपण जे काही जॉब करत असू किंवा एखादा व्यवसाय करतअसू, तर याहीपेक्षा पुढचं आर्थिक नियोजन सुव्यवस्थित होण्यासाठी आणखीन काही वेगळा मार्ग अवलंबता येईल का, हे कळेल. तसेच खूप जास्तीचा साठा असल्यास आणखीनची गरज नसल्याने एकमेकांना वेळ देणे जरुरीचे आहे याबद्दल जोडीदारांना एकमेकांशी बोलता येईल.

वरील पैकी ३ प्रश्न प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला विचारले आणि याबद्दल दोघांचीही सुयोग्य आणि समर्पक चर्चा घडून आल्यास दोघांचेही आर्थिक नाते आणखीन समृद्ध होण्यास मदत मिळेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!