उन्माद : या मानसिक आजारावर घरगुती उपचार पाहूया !!
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ञ)
कुठल्याही गोष्टीची अतिकाळजी किंवा चिंता करण्याच्या सवयीने उन्माद किंवा हिस्टेरिया हा आजार जडतो. मनाचा समतोल ढळल्याने हा मानसिक रोग होतो. रोग्याच्या शारीरिक हालचाली आणि भावना यांच्यावर नियंत्रण राहत नाही. भावनांचा प्रक्षोभ होऊन अशी व्यक्ती बेशुद्ध होते.
मानसिक चलबिचलतेमुळे उन्मादाचे झटके येतात. हा आजार स्रिया व पुरुष दोघांतही आढळतो. त्यातल्या त्यात १४ ते २५ या वयोगटातील तरुण स्त्रियांमध्ये उन्मादाचे प्रमाण बरेच दिसते.
कारणे आणि लक्षणे
उन्माद झालेल्या व्यक्तींमध्ये शरीर जड होणे, पायात गोळे येणे, पोटात आवळ्यासारखे वाटणे, सतत उसासे टाकणे, छाती आवळल्यासारखी वाटून श्वसनाला त्रास होणे, नाडीची ठोके जलद पडणे, घशात काहीतरी अडकले आहे असे वाटणे, मानेला सूज येणे, घुसमट वाटणे, डोके दुखणे, दातखीळ बसने इ. लक्षणे आढळतात. तर उन्मादाच्या तीव्र हृद्य अनियमितपणे व जोरात धडधडते, शारीरिक हालचालींमध्ये अस्वस्थपणा येतो, झटके येतात.
उन्माद झालेल्या व्यक्तींची इच्छाशक्ती कमी झालेली असते. तसेच त्यांना प्रेमाची आणि सहानुभूतीची गरज असते. भावनिक संतुलन बिघडण्याकडे जास्त कल असतो. मनाची प्रक्षोभक अवस्था काही दिवस किंवा काही आठवडे टिकते. रोगी कित्येकदा गाढ झोपेत असल्यासारखे भासते. परंतु त्याचे स्नायू मात्र आखडल्यासारखेच असतात.
उन्माद होण्याची नेहमी आढळणारी काही कारणे आहेत. त्यांत अशा व्यक्तींची लैंगिक इच्छा दबली गेलेली असते. तसेच त्यांना अर्थाचा अनर्थ लावण्याची, तसेच सुस्तपणे बसण्याची सवय असते. कुटुंबामधील उदासीनतेचा भावनेची पार्श्वभूमी आणि तरुण वयात चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली भावनांची शिकवणही उन्मादावस्थेला कारणीभूत ठरते. मानसिक ताण-तणाव, भीती, काळजी, नैराश्य, मानसिक आघात, हस्तमैथुनाची सवय आणि दीर्घ काळ चाललेला आजार यांमुळे हा रोग होतो.
उपचार
जांभूळ :
जांभूळ हे फळ या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी पडते. एका उभट भांड्यात तीन किलो जांभळे, मूठभर मीठ आणि पाणी एकत्र करून हे भांडे झाकण ठेवून एक आठवडाभर उन्हात ठेवावे. आजारी व्यक्तीने अनशेपोटी या भांड्यातील थोडी जांभळे खावी व भांड्यातील पाणी प्यावे.
ज्यादिवशी हा उपचार सुरु केला जातो. त्याच दिवशी दुसऱ्या उभ्या भांड्यात ३ किलो जांभळे, मूठभर मीठ व पाणी घालून ठेवावे. म्हणजे पहिल्या भांड्यातील जांभळे व पाणी संपल्याबरोबर दुसऱ्या भांड्यातील जांभळे खाण्याजोगी होतील, अर्थात उपचारात खंड पडणार नाही. हा उपचार २ आठवडे चालू ठेवावा.
मध :
उन्माद कमी करण्यासाठी मधाचा चांगला उपयोग होतो. रोज एक मोठा चमचा मध चाटावा.
दुधी भोपळा :
दुधी भोपळ्याचा मऊ ताजा गर रोग्याच्या डोक्याला लावावा. हा बाह्य उपचार खूप उपयोगी पडतो.
लेट्युस :
लेट्युसची पाने या आजारात चांगली गुणकारी आहेत. लेट्युसच्या पानांचा एक कप रस आणि एक चमचा आवळ्याचा रस एकत्र करून तो रोज सकाळी असा एक महिनाभर प्यावा.
सर्पगंधा :
सर्पगंधा हे औषधी झुडूप आहे. सर्पगंधाची मुले वाळवून त्यांची पूड करावी. एक कप दुधात एक ग्राम पूड घालून रोज सकाळ-संध्याकाळ हे दूध प्यावे. हा उपचार रोग पूर्णपणे बरा होईपर्यंत करावा.
हिंग :
स्वयंपाकात आपण हिंगाचा उपयोग सतत करतो. हिंगाला एक विशिष्ट वास असतो. उन्मादाचे झटके कमी करण्यास हिंगाच्या या वासाचा चांगला उपयोग होतो. रोग्याला प्रथम एवढासा हिंग सुरुवातीला खायला द्यावा व त्याची मात्र वाढवीत ती एक चमचाभरपर्यंत न्यावी. जेव्हा रोगी असा हिंग खाण्यास तयार नसतो तेव्हा पाऊण कप पाण्यात २ ग्रॅम हिंग मिसळून रोग्याला त्याचा एनिमा द्यावा.
आहार
रोग्याला उपचार चालू करताना काही दिवस केवळ फलाहार द्यावा. दिवसातून तीन वेळा संत्री, सफरचंद, द्राक्षे, पपई आणि अननस यांपैकी कोणत्याही फळाचा रस द्यावा. त्यानंतर एक महिना रोग्याला फक्त दूध प्यायला द्यावे. दुधामुळे रोग्याच्या रक्तात वाढ होते, तसेच रक्तवाहिन्याही बळकट होतात.
रोग्याला फक्त दूध देणे सोयीचे होत नसेल तर दूध आणि फळे द्यावी. त्यानंतर हळूहळू त्याच्या जेवणात कडधान्ये. भाज्या, फळे, तृणधान्ये यांचा समवेत करावा. रोग्याला दारू, चहा, कॉफी, तंबाखू यांपासून दूर ठेवावे आणि मैदा आणि साखर यांपासून तयार केलेले पदार्थ खायला देऊ नयेत.
इतर उपाय
रोग्याला स्वतःवर काबू ठेवण्यास शिकवावे, तसेच योग्य पद्धतीने विचार करण्याची सवय लावावी. तसेच त्या व्यक्तीला स्वतःत गुंतून राहण्यापासून परावृत्त करावे. त्याचे लक्ष इतर गोष्टींमध्ये रमवावे. योग्य असे लैंगिक शिक्षण द्यावे.
जर ती व्यक्ती विवाहित असेल तर तिला जोडीदाराबरोबर वैवाहिक आयुष्य आनंदाने घालविण्यासाठी उद्युक्त करावे. रोग्याने व्यायाम आणि मैदानी खेळ खेळणेही आवश्यक असते. त्यामुळे त्याचे स्वतःमध्ये गुंतलेले मन दुसऱ्या गोष्टीमध्ये वळते आणि उत्साह येतो.
रोग्याने मत्स्यसन, सर्वांगासन, धनुरासन, हालासन, योगमुद्रा, आणि शवासन ही आसने जरूर करावी. रोगी अशक्त असेल तर त्याला शारीरिक श्रमांचे व्यायाम करता येणार नाहीत. त्याने आठवड्यातून ३-४ वेळा मालिश करावे!



हो येतात. त्यासाठी तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडून निदान करून घ्यावे लागेल.
त्यासाठी आपण फोन करू शकता – ९१३७३००९२९
यावर टॅब्लेटसने उपचार घेता येतो का?