
तुम्ही खरच प्रेमात आहात का…की नुसतंच दिवस ढकलत आहात !!!
एखादी व्यक्ती तिच्या दिसण्याने बोलण्याने आपल्याला मोहात पाडते . ओळख होते . सुरुवातीला आपण स्वतःबद्दल अगदी सगळेच गोड गोड सांगतो . एकदिवस जरी ती व्यक्ती दिसली नाही तरी आपला जीव कासावीस होतो . कशातच लक्ष लागत नाही . नाते तयार झालं की सहवास वाढतो , सहवासातून व्यक्तिच्या खटकणान्या गोष्टीदेखील समोर येतात . सुरुवातीला गोड वाटणा-याया सगळ्या गोष्टी नंतर नंतर बंधणे वाटू लागतात . जोडीदार आपल्या चांगल्यासाठी सांगत ! असेल तरी आपल्याला ते खटकू लागतं . ओढ कमी होते . लपवाछपवी वाढते . गैरसमज वाढीस लागतात . आपण आपली स्पेस शोधू लागतो . जीव घुसमटतो….
जोडीदाराची प्रत्येक गोष्टच नकोशी वाटते समोरच्या व्यक्तिवर आपण हक्क गाजवू लागतो , त्या व्यक्तीकडे कोणी दुसरी आकर्षित होत असेल तर ते सहन होत नाही . जोडीदाराला प्रोटेक्ट करु पाहतो . इकडे जाऊ नको , अमुक ड्रेस घालू नको, तमुक माणसाशी बोलू नको . मतभेद , वाद होतात , आपल्याला नवीन मांडणी करायची असते. स्वतःला हवं तसं जगायचं असतं . स्वतःची मर्जी चालवायची असते . कोणतंही तडजोड़ नको असते . स्वतंत्र होऊ वाटतं . बंधने झुगारायची असतात….
एका क्षणी आपण नातं तोडण्याचा निर्णय घेऊन टाकतो व मुक्त होतो . हे प्रेम होतं का ? अजिबात नाही . ही तुम्हाला त्या व्यक्तीची लागलेली सवय . प्रेम तुम्हाला हात कधीच सोडू देत नाही प्रेम संवाद घडवून आणण्यासाठी इगोला देखील झुकवतं . जिथे मतभेद माणसापासून तोडत असेल तिथे प्रेम कधीच नव्हतं . तुम्ही स्वतःची आणि समोरच्याची देखील फसवणूक करत आलेला असता , जिथे तुम्हाला तुमचा स्वतंत्र मार्ग दिसतो प्रेम तिथेच हारलेलं असतं . . .
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


Nice