यशासाठीच्या १० सर्वोत्कृष्ट सवयी कोणत्या ??
कोणतंही यश हे आपल्या समाधानावर अवलंबून असतं. समाधानाची पातळी हि जितकी उच्च तेवढ्या प्रमाणात आपण यशाचे आनंदी भाव अनुभवू शकतो. ज्याठिकाणी समाधान नाही, तेथे यश आणि आनंद स्पर्श होत नाही. म्हणजेच समाधानाशिवाय सुख आणि यश यांची व्याख्या करणे खूप कठीण आहे.
एखाद्याकडे मूलभूत गरज भागविणाऱ्या सर्व सुख-सोयी असूनही तो मोठ्या बंगल्याची-गाडीची तीव्र अपेक्षा ठेऊन असलेले सुख अनुभवू शकत नाही, तर दुसऱ्या बाजूला निव्वळ मूलभूत गरजाच भागविणारा संसार असूनही कित्येक जोडप्यांना आपण समाधानी असलेले पाहतो.
आणि यापेक्षा यश आणि सुखाची व्याख्या दुसरी कोणती असेल…
काही मोजक्या महत्वपूर्ण सवयी पुढीलप्रमाणे पाहूया…
१) सुस्पष्ट कारण आणि ध्येय
अनेक लोकांना कुठेतरी पोहोचायचे असते, परंतु ते तिथे पोहोचू शकत नाहीत कारण त्यांनाच माहिती नसते कि त्यांना नेमके कुठे जायचे आहे. त्यामुळे आपले पुढचे ५-१० वर्षाचे ध्येय निवडायला हवे. तसेच त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आचरणात आणण्याची नितांत गरज आहे याबद्दल अभ्यास करायला हवा.
२) पकड
तुमचे कारण आणि ध्येय यामधल्या कशालाही येऊ देऊ नका. अपयश हा काही पर्याय नसतो. म्हणजेच एखादा अडथळा जरी तुमच्या ध्येयात शिरला तरी फार वेळ गोंधळून न जाता त्याकडे पर्याय म्हणून पाहता आलं पाहिजे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुमची पकड हि जितकी मजबूत तितकी तुम्हाला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी तुमच्याजवळ फार काळ टिकणार नाहीत.
३) कृतज्ञता
सतत आयुष्यातील चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि मग त्या बाबी दहा पटीने वाढतील. रोजच्या दिवसातील काही वेळ शांत बसून आपण नेमके काय काय केले याचे अवलोकन करा. जेव्हा अवलोकनातून किंवा ध्यानधारणेतून आपले मन शांत असते, तेव्हाच आपल्यातील सर्वोच्च सृजनशीलता प्रकटते.
४) दृष्टी
तुमच्या दृष्टीने आदर्श जगणे म्हणजे काय हे निश्चित करा आणि रोज सतत मनात त्याचे चित्र तयार करून तसे मनातल्या मनात जगायला सुरुवात करा. काही दिवसाने ते प्रत्यक्षात येऊ लागेल.
५) मनमोकळेपणा
कुठल्याही घटना व्यक्ती यांच्याबद्दल पूर्वग्रह मनात ठेऊन विचार करू नका. नव्या कल्पना, विचार, व्यक्ती यांच्याबद्दल खुल्या मानाने विचार करा. तुम्हाला निसर्गाकडून काय अपेक्षित आहे याबद्दल अत्यंत मोकळेपणाने विचार मांडा, वर्तन बदला आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त सामाजिक ठिकाणी मिसळण्याचा प्रयत्न करा.
६) श्रवण
जास्त एक आणि कमी बोला. लोकांकडे खूप कल्पना असतात. त्या जाणून घ्या. त्यासाठी त्यांना बोलण्याची संधी द्या. दुसऱ्याचे जास्तीत जास्त ऐकून घेण्याची सवय स्वतःला लावा.
७) अहंकार सोडा
आपण चांगले दिसण्यासाठी स्वतः वर इतका वेळ घालवतो कि त्यामुळे समोरच्याला नेमके काय हवे आहे याबद्दल स्पष्टता येत नाही. समाधान म्हणजे दुसऱ्याचे दुःख, अडचणी कमी करण्यासाठी उपाय शोधून देणे.
८) गॉसिपिंगमध्ये अडकू नका.
पूर्वग्रह आणि गॉसिपिंगमुळे तुमची ध्येयाप्रतीची वाटचाल कमी होते. जास्तीत जास्त तुम्ही जितकं बडबड करत बसाल तितकी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा हि कमी होत जाते. म्हणून संवाद आणि प्रत्यक्षात केलेली कृती यांचा योग्य मेळ जुळवायला हवा.
९) प्रयत्न सोडू नका
जेव्हा अडचणी व अडथळे उभे ठाकतात तेव्हा प्रयत्न सोडू नका. कोणतीही मोठी गोष्ट हि सोपी नसते. तुमचे प्रयत्न कधीही कमी पडू देऊ नका. एकवेळेस काम करण्याची पद्धत आणि शैली बदला परंतु प्रयत्नांशिवाय तुम्हाला पुढे सरकता येणार नाही.
१०) सकारात्मकता निवड
शेवटी निसर्गातील बहुतेक गोष्टी या निरपेक्ष असतात. आपण त्यांना सकारात्मक किंवा नकारात्मक बनवायचे असते. शक्य तिथे सकारात्मतेची निवड करा. एखादा नकारात्मक विषय सुद्धा सकारात्मक रीतीने हाताळता यायला हवा. म्हणजे केवळ सकारात्मकच वातावरणातला आत्मविश्वास वाढणार नाही.


