Skip to content

या सवयी लावा आणि शारीरिक समस्यांना ‘गुड बाय’ करा !

या सवयी लावा आणि शारीरिक समस्यांना ‘गुड बाय’ करा !


घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. करिअर, संसार यांमध्ये गुंतवून घेणाऱ्या महिला स्वतःच्या दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे जाऊन या महिलांना आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागतो.

खरंतर ४० नंतरचा काळ हा खास स्त्रियांच्या हक्काचा असतो. या काळात त्या स्वतःला जास्त वेळ देऊ शकतात. परंतु आयुष्यभर मेहनत केल्यामुळे ४० नंतर अनेक महिलांना शारीरिक व्याधीचा सामना करावा लागतो.

शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित झाली कि स्त्रियांना गुडघेदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्या भेडसावतात. परंतु यांकडे दुर्लक्ष न करता त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. तसंच या काळात महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे पाहुयात…

♦ संतुलित आहाराचे सेवन करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा, धान्य, कडधान्य यांचा आहारात समावेश करा.

♦ मसालेदार पदार्थ, तेलकट, जंकफूड, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा. मद्यपान तसेच धूम्रपान करू नका.

♦ दररोज व्यायाम करावा. झुंबा करणे, चालणे, एरोबिक्स, पोहणे, जॉगिंग असे व्यायाम प्रकारातील कोणताही आवडीचा व्यायाम करावा.

♦ तणावमुक्त रहा. कामाचा तणाव, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या हाताळल्यामुळे ताणतणावाचा त्रास होऊ शकतो. एकाच वेळी इतर काम केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.

♦ योग अभ्यास आणि ध्यान यासारख्या तणावमुक्त करणाऱ्या सवयी लावून घेणे फायदेशीर ठरेल.

♦ ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांनी यापेक्षा उशीर करू नका. त्याकरिता आधी योजना आखा काही वेळेस आयव्हीएफ सारख्या प्रक्रियेचा देखील आधार घ्यावा लागू शकतो.

♦ आपल्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नका. आपण जरी संतुलित आहाराचे सेवन करीत असाल आणि नियमित व्यायाम करीत असाल तरी देखील नियमित आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे.

♦ वेळोवेळी आपला रक्तदाब, थारॉईड, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासून पहा.

♦ गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे.

♦ महिलांनी नेत्र तपासणी, त्वचेची तपासणी, दंत तपासणी, मॅमोग्राम आणि पॅप स्मियर चाचणी करून घ्यावी.

♦ आपली हाडे आणि स्नायू मजबूत ठेवा. ऑस्टिओपेनिया (हाडे कमकुवत होणे पॅरिटीही सामान्य मर्यादेच्या आत) याबद्दल तपासणी करून खात्री करून घ्यावी.

♦ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असलेल्या आहाराचे सेवन करा. वजनावर नियंत्रण ठेवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!