Skip to content

दैनंदिन जीवनात मानसशास्त्राचा आपल्याला काय उपयोग ?

दैनंदिन जीवनात मानसशास्त्राचा उपयोग.


प्रमोद पडघान (वाशिम)


मानसशास्त्र हे फक्त विद्यार्थी, कींवा मानसशास्त्राज्ञ यांच्या साठी च ऊपयोगा चे नाही. तर सर्व लोकांन करीता ते उपयोगा च आहे. पण या शास्त्रा विषयी पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. पण ज्या लोकांना याची माहिती आहे . त्यांना मात्र खुप फायदा आहे. तर आपणाला या शास्त्राचा कसा फायदा होईल हे बघू.

1. प्रेरित राहा.

प्रत्येक माणसाला काही ना काही समस्या आसतात च व ते त्या समस्ये ला सामोरं जात आसतात. प्रेरित राहण्या साठी मानसशास्त्र हे व्यक्तीला पुर्वसंकेत देत आसत. धुम्रपान सोडून, वजन कमी करणे. यासाठी आपण संकल्प करतो पण तो पुर्ण करीत नाही कारण आपण त्या संकल्पाला आपल्या आवचेतन मनात जाऊ देत नाही.

नुसता दर वर्षी लोक संकल्प करतात की मी आजपासून दररोज व्यायाम करणार , पण एका आठवड्या नंतर माञ विसर पडतो आणि 6 पॅक ऐवजी आपली ढेरी समोर येते.

आपले कामे करतांना कंटाळा करू नये. आपली अभिरुची ज्या कामात आहे आशा प्रकारची कामे आपण करायला पाहिजेत.आपल ध्येय ठरविने व त्या दिशेने प्रयत्न करावेत. यामुळे प्रेरणा टिकून राहते.

2. नेतृत्व कौशल्य सुधारा.

आपल्या प्रत्येका च्या जिवनात नेतृत्व कौशल्या ला खुप महत्त्वाचे स्थान आहे. कोणता ही व्यक्ती हा जन्मतंच नेतृत्व गुन घेऊन जन्म घेत नाही तर ते त्याला विकसित कराव लागत. याकरिता काही गोष्टी पाळा, जसे की, स्पष्ट मार्गदर्शन करने, इतरांना त्यांची मते मांडु देणे, समुहातील सदस्याच्या समस्या सोडविणे, संभाव्य ऊपाय सांगा, यामुळे आपली स्वतःची नेतृत्व सुधारणा होइल.

3. आधिक चांगले संप्रेषक बना.

संप्रेषन हे चांगले आसेल तर आपले संबंध हे खुप चांगले बनतात. ” तुम्ही कसे बोलता किंवा कसे लिहिता यापेक्षा खुप जास्त वेगळ असं संप्रेषना मध्ये आंतरंभुत असते. ” तुमचा संदेश परिणाम कारक रीतीने समोर च्या व्यक्ती पर्यंत पोहोचला पाहिजे .यासाठी अशाब्दीक रीतीने कसे व्यक्त करायचे ? हे शिकन्या ची आपणाला गरज आहे.

4. दुसऱ्याला अधिक चांगले समजून घ्या.

दुसऱ्या लोकांना जास्त समजून घ्यायला शिका. तुमच्या भावना आणि तुमच्या सभोवताल च्या लोकांच्या भावनांना समजून घेण्याची तुमची क्षमता तुमच्या व्यावसायिक संबंधात महत्त्वाची भुमिका पार पाडते. यामुळे आपल वाटतं व दुसरे लोक आपल्या कडे आकर्षित होतात.

5. स्मूर्ती सुधारा.

स्मूर्ती चे एकुण 3 प्रकार पडतात. जसे की,

1.वेदनिक स्मूर्ती (sensory memory) – या स्मूर्ती मध्ये आपनाला चिमटा घेने, चटका लागणे हे या स्मूर्ती ला कळते.

2 अल्पकालीक स्मूर्ती ( short term memory) – या स्मूर्ती मध्ये थोड्या वेळा साठी लक्षात राहते. एखादा मोबाईल नं. ऐकल्या नंतर तो लक्षात राहत नाही म्हणजे तो short term memory मध्ये जातो. या memory मध्ये 30 से. पेक्षा जास्त लक्षात ठेवता.येत नाही.

3. दीर्घ कालीन स्मूर्ती. (Long term memory ).- या स्मूर्ती मध्ये खुप काळ पर्यंत आपण काहीही लक्षात ठेऊ शकतो.
या प्रकारे जर आपण योग्य रीतीने स्मूर्ती च योग्य व्यवस्थापन करून तीचा वापर केला तर आपला खुप मोठा फायदा होईल.

6. आधिक चांगली श्रेणी मिळवा.

आपल्या श्रेञा मध्ये आपण खुप चांगले प्रावीण्य मिळवले पाहिजे. जेणे करून आपल्या क्षेत्रातील खुप चांगले ज्ञान आपनाला प्राप्त होइल.

7. निरोगी राहा.

आरोग्य जर चांगले नसेल तर आपण जास्त दिवस जगु शकत नाही. यामुळे आपल्या डोक्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम पडतो. यामुळे नेहमी व्यायाम करणे कधीही चांगले.. तुमच्या आरोग्यात एकंदरीत सुधारणा करण्याच एक साधन म्हणून मानसशास्त्र उपयोगी ठरू शकत.

.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!