Skip to content

‘मूड’ जेव्हा चांगला असतो, तेव्हा सारं जगच सुंदर दिसतं!!

आपला मूड….


सुधा पाटील


माणसांच आयुष्य आनंदी असणं किंवा दु:खी असणं हे खूपदा त्याच्या मूडवरच अवलंबून असतं.पण हा मूड नावाचा प्राणी असतो तरी काय?येतो तरी कोठून?त्यांच आपल्या आयुष्यात नेमकं स्थान काय असतं? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्यातंच सापडतात.मूड….

आपल्याच मनाची एक अवस्था! आपण ठरवलं तर तो मूड सदैव चांगला आणि स्थिर राहू शकतो.आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा आपणास नको असणारी घटना घडते तेव्हा तेव्हा आपला मूड खराब होत असतो.शारिरीक आरोग्य बिघडलं तरीही मूड खराब होत असतो.

कोणाचा मूड कधी खराब होईल हे सांगता येत नाही.कारण यातही व्यक्तीपरत्वे खूप भिन्नता दिसून येते.कधीकधी उठसूट माझा मूड खराब आहे असं म्हणणारे देखील खूप भेटतात.परंतू हा मूड आपोआप चांगला होतंच नसतो.तो चांगला ठेवावा लागतो.

आपल्या आजूबाजूला रोजचं चांगल्या वाईट घटना घडतंच राहतात.त्यांचा आपल्या जीवनावर किती प्रमाणात परिणाम करून घ्यायचा हे आपल्याच हातात असतं.

जेव्हा जेव्हा मूड चांगला असतो तेव्हा तेव्हा सारं जगंच सुंदर दिसत असतं.पण जेव्हा मूड खराब असतो तेव्हा कितीही सुंदर वातावरण असलं तरीही ते नकोसं वाटतं.याचा अनुभव प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात येत असतो.

पण तो मूड नेहमी चांगलाच ठेवता येतो यावर आपलाच विश्र्वास असायला हवा.त्यासाठी उच्च पातळीवर मानसिक संतुलन राखावं लागतं.ते राखताही येतं.पण मी माझा मूड सदैव चांगला ठेवण्याचा प्रयत्न करीन असं जर एखाद्याने ठरवलं आणि त्या दिशेने प्रयत्न केला तर नक्कीच तर यश मिळू शकतं.

कारण या जगात स्वत:ला आनंदी आपण स्वत:च ठेऊ शकतो.इतर माणसं आपल्या आनंदाचं कारणं ठरू शकतात.परंतू सहनशीलता वाढवून मनाला सदैव आवडणाऱ्या गोष्टींत गुंतवून आपण आपला मूड उत्तम राखू शकतो.

आयुष्यात प्रत्येकाला हा अनुभव येत असेल की, मूड चांगला असला की, सारं जग आपणास सुंदर वाटतं.आपली कामं आनंदाने पूर्ण होतात.सगळंच गोड, छान वाटतं.पण जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा माणूस कशातही रमत नाही.

त्याची कार्यक्षमता आपोआप कमी होते.सुंदर गोष्टी देखील नकोशा वाटू लागतात.मानसिक तणाव जाणवतो.हे कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच जाणवतं असतं.पण जर का माणूस नेहमीच आनंदी राहिला तर त्याचा चांगला परिणाम त्याच्या आरोग्यावर,जगण्यावर होतो.

जगातला प्रत्येक माणूस हा काहीतरी विवंचनेत असतोच.पण जर त्यानं ठरवलं की, येणाऱ्या समस्या ह्या जाणाऱ्या असतात.त्यांचा सामना करत आनंदाने जगायचंच.तर ते शक्य होतं.यासाठी जाणिवपूर्वक आपणंच प्रयत्न करावे लागतात.

कोणंही कोणाचं ओझं घेऊ शकत नाही.पण आपण सारेच एकमेकांना आधार देऊ शकतो.थोडक्यात काय तर मनात आणलं तर आपण आपला मूड नेहमी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.जीवन सुंदर रित्या जगण्यासाठी आपणंच आपला मूड उत्तम ठेवावा.म्हणजे हे जगणं सुंदर आणि सोपं वाटेल.

आपला मूड का खराब होतो?केव्हा केव्हा खराब होतो?याची कारणं शोधून आपणंच त्यावर उपाय शोधायचा.मूड खराब करणाऱ्या गोष्टी शक्य असतील तर टाळाव्यात.आणि उगाचंच छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपला मूड खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

समोरच्याला आपण बदलू शकत नाही.परंतू आपण आपल्या सवयी बदलून स्वत:ला आनंदी ठेऊ शकतो.बऱ्याच जणांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी मूड खराब करून घेण्याची सवय असते.त्याचा परिणाम इतरांना नाही तर आपणासंच होतो.म्हणूनच आपला मूड आपणंच जपायचा….

तरंच हे जगणं सुंदर बनू शकेल…



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!