Skip to content

Weight Loss साठी सोप्पे घरगुती उपचार!

Weight Loss साठी सोप्पे घरगुती उपचार!


आशा शेलार


वेळी अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे टाइप २ मधुमेह आणि कॅन्सर होण्याचाही धोका असतो. या गंभीर आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जिऱ्याचं पाणी उकळून त्यामध्ये गुळ मिक्स करा. वजन कमी करण्यासाठी या पेयाचे सेवन करणे हा उत्तम तसंच प्रभावी उपाय आहे. याऐवजी तुम्ही जिऱ्याची पावडर करून ती गुळासोबतही खाऊ शकता.

शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यास अ‍ॅनिमिया धोका निर्माण होऊ शकतो. ही समस्या मुख्यतः गर्भवती महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. अ‍ॅनिमिया आजाराला दूर ठेवण्यासाठी गूळ आणि जिऱ्याचे सेवन करावे.

गुळामध्ये जास्त प्रमाणात लोहाचे घटक असतात. शरीराला पुरेशा प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो. तर जिऱ्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.

लवंग…

स्वयंपाकघरातील लवंगचे सेवन केल्यास कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? लवंगच्या पाण्यामुळे आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होत नाहीत. जाणून घ्या कसे करायचे लवंगच्या पाण्याचे सेवन.

लवंगमधील औषधी गुणधर्मामुळे शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. शरीरातील विषारी पदार्थ तसंच अतिरिक्त चरबी घटण्यास मदत मिळते. यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये लवंगचा (Cloves To Reduce Weight) समावेश करू शकता.

यामध्ये अँटी कोलेस्टेरिक आणि अँटी लिपिड हे गुणधर्म आहेत. जर तुम्ही काळी मिरी, दालचिनी आणि जिऱ्यासह लवंगचे सेवन केल्यास तुमची चयापचयाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.

याव्यतिरिक्त लवंगमध्ये अँटी ऑक्सिडेंट (Anti Oxidant) देखील आहेत, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्‍ट्रेस देखील कमी होतो. ऑक्सिडेटिव्ह स्‍ट्रेस (Oxidative stress) मुळे जुन्या आजारांचा धोका निर्माण होतो. ही समस्या टाळण्यासाठी लवंगचा आहारामध्ये समावेश करा.

लवंगमुळे रक्तातील शर्करा देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. लवंगमुळे दातदुखीचा त्रास देखील कमी होतो. वजन घटवण्यासह अन्य आरोग्यदायी लाभ मिळवण्यासाठी हे पेय कसे तयार करायचे ? जाणून घेऊया याची माहिती

याव्यतिरिक्त लवंगमध्ये अँटी ऑक्सिडेंट (Anti Oxidant) देखील आहेत, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्‍ट्रेस देखील कमी होतो. ऑक्सिडेटिव्ह स्‍ट्रेस (Oxidative stress) मुळे जुन्या आजारांचा धोका निर्माण होतो.

ही समस्या टाळण्यासाठी लवंगचा आहारामध्ये समावेश करा. लवंगमुळे रक्तातील शर्करा देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. लवंगमुळे दातदुखीचा त्रास देखील कमी होतो. वजन घटवण्यासह अन्य आरोग्यदायी लाभ मिळवण्यासाठी हे पेय कसे तयार करायचे ? जाणून घेऊया याची माहिती

सामग्री-५० ग्रॅम लवंग, ५० ग्रॅम दालचिनी, ५० ग्रॅम जिरे

असे तयार करा पेय

एका पॅनमध्ये ही सर्व सामग्री चांगल्या पद्धतीनं भाजून घ्या. सुगंध येईपर्यंत हे सर्व मसाले भाजत राहा. यानंतर भाजलेल्या गरम मसल्याची मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा.या पेस्टचा तुम्ही महिनाभर वापर करू शकता.

कसे करावे सेवन?

एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मिश्रण मिक्स करा आणि ते पाणी गॅसवर उकळत ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्या.

लवंगमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास देखील कमी होतो. हा त्रास कमी करण्यासाठी लवंगचा चहा फायदेशीर ठरू शकतो. लवंगमध्ये असणारे अँटी ऑक्सिडेंट आपले त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यास पोषक आहेत.

लवंगमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. तसंच लवंगमधील पोषण तत्त्वांमुळे पोटातील सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.

आज काकडी, लिंबु, कोथंबिर आणि….
आलं,मधाचा चहा…..

काकडीमध्ये फॅट्स अजिबात नसतात. तसंच कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. पण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या घटकामुळे पोटावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. तर कोथिंबीरमध्ये नैसर्गिक स्वरुपात डाययुरेटिक असतात.

यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चे प्रमाण अधिक असते. रात्री झोपण्यापूर्वी काकडी, लिंबू आणि कोथिंबिरीपासून तयार केलेले पेय प्यायल्यास आपली पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे बेली फॅट देखील घटण्यास सुरुवात होते.

थायराॅईड डिसिज मधे आवश्य सेवन करावे.

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी रात्री घेवु नये

एक कप पाण्यामध्ये अर्धा चमचा किसलेले आले आणि एक चमचा मध मिसळा. हे पाणी आता कमीत कमी १० मिनिटांसाठी गॅसवर उकळा. यानंतर यात लिंबू रस देखील मिक्स करा. चहा उकळल्यानंतर तो गाळून प्या.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे पेय अतिशय फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी या पेयाचं सेवन केल्यास काही महिन्यांत वजन कमी होण्यास मदत मिळेल.

पोटावरील चरबी होते कमी – पोटावरील चरबी शारीरिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक आजारांचे शिकार होऊ शकता, त्यामुळे नारळातील मलाई फार उपयोगी ठरते.

ही २०० ग्रॅम मलाई नियमित खाल्ल्याने कंबरेवरील आणि पोटावरील चरबी कमी करता येते. चांगल्या रिझल्टसाठी याचा वापर १२ आठवडे रोज करू शकता.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!