Skip to content

नको त्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी एक अध्यात्मिक विचार !

नको त्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी एक अध्यात्मिक विचार !


टीम आपलं मानसशास्त्र


एखाद्या मेणबत्तीचा प्रकाश अंधार दूर करतो आणि संपूर्ण खोली प्रकाशाने भरून जाते. सर्व प्रकारच्या परिस्थितीत, प्रसंगांमध्ये महान परमेश्वर शक्ती कायम आपल्यासोबत असते, आपल्याला कायम मार्गदर्शन करीत असते, सरंक्षण करीत असते हे लक्षात आले कि आपण भीतिमुक्त होण्याची शक्यता वाढते आणि हृद्य  प्रकाशाने भरून जाते.

जेव्हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याची असणारी एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जाते, तेव्हा भीतीचा जन्म होतो. परंतु खरा प्रश्न असा आहे कि “खरंच आपल्या मालकीचं काही असतं का ?” आपण रिकाम्या हाती येत असतो आणि हे जग रिकाम्या हातांनीच सोडून जात असतो.

आपल्याकडे जे काही असते ते सारे या पृथ्वीवरचेच असते. आपण इथून जाताना केवळ कर्म, आपण जे काही केले असेल ते आणि आपला आत्मा घेऊन जाते आणि त्या अनंततत्वाचा आपण भाग होऊन जातो.

आपण कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करू नये आणि केवळ गोष्टी होण्याची वाट पाहत राहावी, असे अजिबात नाही.

परमहंस योगानंद म्हणतात, ‘आपण कायमच कार्यरत राहायला हवे. आपण आतूनच अंतःप्रेरणेने भारल्याप्रमाणे आणि मार्गदर्शन मिळत असल्याप्रमाणे काम करीत राहावे आणि आपली ऊर्जा सतत गतिमान ठेवावी. अडथळे निर्माण होतीलच ;  पर्वा न करता विश्वासाने, खंबीर निर्धाराने खूप मोठी झेप घ्यावी आणि यशाला गवसणी घालावी.

भीती हि स्वतःच तयार केलेली मानसिक मर्यादा असते. आपण आपल्याला पुढे जाण्यापासून ती सतत अडवत असते. भीती, असुरक्षितता आणि आत्मविश्वासाचा अभाव यांच्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आणि श्रद्धा तसेच आपल्या आजूबाजूला नकारात्मक कंपने जन्म घेतात.

अप्रामाणिकपणा, असत्यता, कर्तव्ये यांपासून ढळल्याने आणि मनामध्ये शंका असतील, तर त्यातून भीती जन्म घेते. मानसिकदृष्ट्या गोंधळ उडाल्याने आणि सजग सतर्कतेचा अभाव असल्यामुळे भीतीचा जन्म होतो. आपल्या गतकाळात आणि वर्तमानात आपण केलेल्या कृतीमुळे भेटीचा जन्म होत असतो.

आपण आयुष्याचा हा प्रवास करत असतो, तेव्हा अनेक परिस्थितींचा, अनुभवांचा परिणाम आपल्या सुप्त मनावर होत असतो. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर आणि भावनिक स्थितीवर होत असतो.

त्यामुळेच आपली इच्छाशक्ती आणि तेज सक्षम करणे महत्वाचे असते. भीतीला आत शिरण्यासाठी कोणतीही जागा देऊ नये आणि आपल्या मनावर उत्तम पकड राखता यायला हवी. स्वतःमध्ये होत असणारे परिवर्तन त्यानंतर दररोज आपण अनुभवू लागतो.

आपल्या विचारांमध्ये, प्रवृतींमध्ये, मानसिक स्थितीमध्ये परिवर्तन होत जाते.

भीतीच्या डोळ्यात डोळे घालून पहा आणि एका सशक्त ऊर्जेने, इच्छाशक्तीने, खंबीरपणे या भीतीचे बीज मनातून काढून टाका. झापडबंद विचार आणि भीती त्या-त्या ठिकाणी अर्पण करून टाकावेत आणि अशा विचारांमधून मुक्त होऊन त्यांचं कृपाछत्र मिळवावे.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!