Skip to content

‘तूप’ : जीवघेण्या शारीरिक आजारांवर एक गुणकारी औषध !

‘तूप’ : जीवघेण्या शारीरिक आजारांवर एक गुणकारी औषध !


टीम आपलं मानसशास्त्र


‘तूप खाल्लं कि रूप येतं’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. साजूक तूप म्हटलं कि एक विशिष्ट वास आपल्याला आठवतो. दुधाची साय-सायीचं दही घुसळून ताकावर तरंगणारं पांढरंशुभ्र लोणी आणि मग हे लोणी मंद आचेवर तापवायचं. त्यातील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला कि तडतडणारा आवाज बंद होतो व तूप तयार होते.

घरी तयार केलेल्या तुपामध्ये विकतच्या तुपापेक्षा अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. हल्ली  क्रिया करत बसायला आपल्याला कंटाळा येतो, वेळही मिळत नाही अशा वेळी खात्रीचे विकत मिळणारे तूप आणावयास हरकत नाही.

तुपाचे दैनंदिन उपाययोजना

१) अपचन

सहसा नेहमीच्या वापरातील वनस्पती तूप ह्यांमुळे आपली पचनसंस्थेची पचनाची गती कमी होते. परंतु तुपाचा मात्र याच्या उलट परिणाम दिसून येतो. तूप हे पचनाची गती वाढवते. एवढेच नव्हेतर तुपाने पोटातील पाचक रसांना उत्तेजना मिळून जास्त प्रमाणात स्रवणाचे कार्य होते.

पाचक रसांच्या कमतरतेमुळे जडान्न पाचट नाही व एकाच ठिकाणी फार वेळ पडून राहते. त्यात मग फस्फसण्याची क्रिया होऊन गॅस तयार होतो. हा गॅस पोटात साठून पॉट फुगते. पोटामध्ये वेदना होतात. पोट आणि छाती जड वाटते. यालाच आपण अपचन म्हणतो.

अशावेळेला २ छोटे चमचे भरून साजूक तूप घ्यावे व वरून गरम पाणी प्यावे. खबरदारी म्हणून जड जेवणात, जसे मसाले भातावर किंवा वरणभातावर चमचा भरून तूप घ्यावे. अन्नाचे पचन सुधारते. पचनसंस्थेच्या मांसपेशींची हालचाल सुद्धा चांगली होऊन अपचनाचे त्रास टाळले जातात.

२) जखमा व फोड

लहान मुले खेळताना अनेक वेळा पडतात व त्यांना जखमा होतात. रस्त्यांमधून जाता-येताना छोटे-मोठे अपघात होतात व जखमा होतात. स्वयंपाकघरामध्ये काम करताना सुद्धा काही वेळेस लागते, कापते व जखमा होतात. विविध बांधकामांच्या ठिकाणीसुद्धा जखमांचे प्रमाण बऱ्यापैकी बघायला मिळते. अशाच काही जखमा आपल्या शरीराच्या आतल्या भागात सुद्धा होतात.

अतिप्रमाणात आणि सतत आम्लपित्त असणाऱ्यांना जठरात अशा जखमा होतात. आपल्या आतड्यांमध्येही काही प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे किंवा सततच्या शौचालयामुळे जखमा निर्माण होतात.

स्वयंपाक घरात काम करताना भाजते व त्याठिकाणी फोड तयार होते. कधी कधी काही रसायनांच्या संपर्कामुळे भाजून फोड येतात. याठिकाणी वेदना आणि आग खूप असते. वरील सर्व लक्षणांमध्ये तुपाचा वापर श्रेयस्कर ठरतो.

जखमा व फोड मोठे असल्यास पातळ तुपात भिजवलेल्या स्वच्छ कापडाच्या पट्ट्या त्यावर लावाव्या. जखमा लवकर भरून तर येतात, परंतु त्या ठिकाणची खपली मऊ होऊन कोणताही डागसुद्धा तेथे शिल्लक राहत नाही.

३) मलावष्टम्भ

याचाच अर्थ संडासला पुरेसे न होणे किंवा कडक मलप्रवृत्ती होणे. खूपदा अनेकांना समाधानकारक मलप्रवृत्ती होत नाही. जोर केल्याने पोटात दुखते. मळ पूर्णपणे बाहेर न पडल्याने आत साचून राहतो व गॅस तयार होतो. चुकीच्या आहाराच्या सवयी, वेळी – अवेळी खाणे, चौरस आहाराचा अभाव, भाज्या-फळांचे प्रमाण पुरेसे नसणे, जंकफूडचा अति वापर इ. कारणांनी शौचास जाण्यास त्रास सुरु होतो. पॉट साफ न झाल्याने भूक मंदावते. अपचनाच्या तक्रारीही उद्भवतात.

अशावेळेला साजूक तूप उपयोगी पडते. रात्री झोपताना एक मोठा चमचाभर साजूक तूप गरम दुधात घालून प्यावे. रोज हा प्रयोग केल्यास आतड्यांची शक्ती वाढते. मांसपेशींना बळ मिळून त्यांचे कार्य सुधारते. मळाला स्निग्धपणा येतो आणि हळूहळू शौचाचा त्रास दूर होतो.

४) कर्करोग

हल्ली कर्करोगाचे वाढते प्रमाण बघता त्या रोगाविरुद्ध लढणारी यंत्रणा कशी तयार केली जाईल हे बघितले पाहिजे. खेकड्याप्रमाणे घट्ट धरून ठेऊन अनेकांना जर्जर करून मृत्यूच्या दारात पोचवणारा अत्यंत गंभीर असा हा आजार.

आपल्या आरोग्यपूर्ण पेशी कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतरित होतात. त्या एकमेकांना चिकटून एकातून एक निर्माण होत त्याचा गोळा किंवा गाठ तयार होते, यालाच आपण कर्करोगाची गाठ असे म्हणतो.

हि गाठ वाढवण्याची प्रक्रिया किंवा कर्करोगाच्या पेशी वाढत जाण्याची जी क्रिया आहे त्याविरोधी लढणारे ब्युटिरिक आम्ल तुपामध्ये असते. कर्करोगाची वाढ थांबवण्याचे कार्य हा घटक करतो.

कर्करोग झालेल्यांनी याकरिता रोज सकाळ – संध्याकाळ एक मोठा चमचाभर तूप अवश्य प्यावे. ज्यांना अश्या या रोगाचा धोका संभवतो अशांनीही दिवसभरातून १ मोठा चमचाभर साजूक तूप प्यावे. इतरांनीही रोजच्या आहारात साजूक तुपाचा वापर केला असता पुढील आयुष्यातील धोके टाळण्याकरता याचा निश्चित उपयोग होतो.

५) स्मरणशक्ती

बुद्धी आणि स्मृतीसाठी तूप हे उत्तम. स्मरणशक्ती उत्तम होण्यासाठी गर्भावस्थेपासून प्रयत्न करणे आवश्यक असते. बाळ जेव्हा आईच्या पोटात असते त्यावेळी त्याचे विविध अवयव हळूहळू तयार होत असतात. याच दरम्यान बाळाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ होत असते.

हि वाढ योग्य रीतीने झाल्यास स्मरणशक्ती चांगली होते. यासाठी कोलिन नावाचा घटक अत्यंत आवश्यक असतो. या घटकाचे प्रमाण कमी झाल्यास किंवा या घटकाचा अभाव निर्माण झाल्यास मेंदू व चेतासंस्थेच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ह्याच घटकाची तेवढीच आवश्यकता लहान मुलांनासुद्धा जन्मल्यानंतर वाढीच्या वयात असते.

या मुलांची स्मरणशक्ती चांगली रहावी म्हणून कोलिनयुक्त आहार पुरेशा प्रमाणात असायला हवा. हे कोलिन आपल्याला साजूक तुपामध्ये मिळते. म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ जेवणामध्ये या तुपाचा वापर करायला हवा.

पोळीवर-भातावर-आमटीत आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप घालावे. उपमा. शिरा, मसालेभात इ. पदार्थांतही वापर करावा. अधून-मधून तूप-साखर पोळीही मुलांना द्यायला हरकत नाही.

६) सर्दी – सायनस

ज्यांना वारंवार सर्दी होण्याच त्रास असतो किंवा ज्यांना हि सर्दी सायनसमध्ये अडकून सूज येण्याचा त्रास असतो, अशांसाठी तूप एक वरदान आहे. नाक व कपाळ आणि डोळ्यांभोवतीची हाडे, जी स्पंजप्रमाणे असतात, यांमध्ये कफ अडकून सूज येते व मग नाकातून किंवा नाकाच्या मागील भागात घशातून हा घट्ट कफ येत राहतो.

कपाळ गरम होते. तापाची कणकण येते. नाक बंद होते. अशावेळेस या व्यक्तींनी तुपाचे नस्य करावे. नस्य म्हणजे एखादे औषध नाकामध्ये घालणे. तूप पातळ करून दोन्ही नाकपुड्यांत २-२ थेंब सकाळ-संध्याकाळ सोडावे. मान कलती करून ५ मिनिटे पडून रहावे.

कधी-कधी हे तूप घशात येते. ते नैसर्गिक आहे. यामुळे कफ बाहेर पडतो. नवीन कफ निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. सूज उतरते. हा प्रयोग नित्य करीत राहायला हवे म्हणजे नेहमीकरता फायदा होतो.

७) हृदयरोग – रक्तदाब

तुपामध्ये असणारे ओमेगा – ६ फॅटी ऍसिड हे हृदयाच्या रक्षणाकरिता उपयोगी पडतात. उच्च रक्तदाब नियंत्रणाखाली ठेवण्याकरिता याचा उपयोग होतो. हृदयाच्या मांसपेशींना बल देऊन त्यांचे इतर हानिकारक गोष्टींपासून सरंक्षण करण्याकरिता लागणारे ओमेगा – ३ फॅटिऍसिड हे सुद्धा तुपामध्ये असतात.

शिवाय हे दोन्ही जशा प्रमाणात असायला हवेत म्हणजे ओमेगा – ६ चे प्रमाण हे ओमेगा – ३ च्या जवळजवळ दुप्पट असायला हवे असते, त्या प्रमाणात साजूक तुपामध्ये असते आणि म्हणूनच माफक प्रमाणात रोज तुपाचा वापर केला असता, हृद्य सरंक्षणाकरिता त्याचा उपयोग होतो.

हा लेख कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “‘तूप’ : जीवघेण्या शारीरिक आजारांवर एक गुणकारी औषध !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!